आरोग्य विमा खरेदी करताना ह्या चुका टाळा..| Health Insurance | Avoid these 7 mistakes when buying health insurance

आरोग्य विमा खरेदी करताना ह्या चुका टाळा..| Health Insurance –

     प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेतात परंतु आपण कितीही आरोग्याची काळजी घेत असलो तरी सुद्धा अनपेक्षित पणे कधी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असणे गरजेचे आहेच त्यासोबतच आर्थिक दृष्ट्या सुद्धा मजबूत असणे गरजेचे आहे. प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती चांगली असेलच असे नाही किंवा ऐन गरजेच्या वेळी आपल्याकडे तेवढा पैसा उपलब्ध असेलच असे नाही त्यामुळेच “आरोग्य विमा” ( Health Insurance )असणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु बरेच लोक आरोग्य विमा काढत असताना काही सामान्य चुका करतात त्या चुका कोणत्याही आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत…

Advertisement

आरोग्य विमा खरेदी करताना ह्या चुका टाळा..

Health insurance

१. आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना संशोधनाचा अभाव | Lack of research while purchasing a health insurance policy –

– आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करत असताना काही व्यक्ती पॉलिसीच्या अटी आणि शर्ती पूर्णपणे माहीत करून न घेता घाई घाईने विमा पॉलिसी खरेदी करतात. 

– परंतु असे न करता विविध पॉलिसींची माहिती घेऊन त्या पॉलिसींची तुलना करून त्यानंतर पॉलिसी विकत घेणे कधीही योग्य राहते.

– आपल्या फॅमिली मध्ये किती मेंबर्स आहे यानुसार विविध आरोग्य विमा पॉलिसीची माहिती घेऊन त्यानंतरच आरोग्य विमा ( Health Insurance )पॉलिसीची निवड केली पाहिजे.

२. अपुरे पॉलिसी कव्हरेज | Inadequate policy coverage –

– आपण ज्या आरोग्य विमा पॉलिसीची निवड करत आहोत ती विमा पॉलिसी आपल्या सर्व गरजा पूर्ण करत आहे याची खात्री करून घेऊन मगच त्या पॉलिसीची निवड करणे योग्य राहील. 

– तसेच आपल्या कुटुंबाचा आकार, वैद्यकीय इतिहास, अपेक्षित असणारा वैद्यकीय खर्च, हॉस्पिटलाईजेशन खर्च, निदान चाचण्या, बाह्य आरोग्य विभागाचा खर्च यांसारख्या गोष्टींचा विचार करून आरोग्य विमा पॉलिसीची निवड केली पाहिजे. 

– तसेच इतर काही वैद्यकीय गरजा असतील तर त्या कव्हर करणारी पॉलिसी निवडणे योग्य ठरेल.

३. अचूक वैद्यकीय इतिहास लपवणे किंवा न सांगणे | Concealing or not telling accurate medical history –

– काही व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करत असताना त्यांचा किंवा त्यांच्या परिवारातील व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास लपवून ठेवतात किंवा वैद्यकीय इतिहास सांगितल्यास जास्त प्रीमियम भरावा लागू शकतो या भीतीने सांगत नाहीत, परंतु ही खूप मोठी चूक आहे. 

– तसेच धूम्रपान करणे किंवा इतर काही सवयी असणे किंवा वैद्यकीय इतिहास न सांगणे यांसारख्या सवयीमुळे ज्यावेळी विम्याचा दावा करण्याची वेळ येते त्यावेळी या सवयी विमाधारकाच्या विरोधामध्ये होऊ शकतात. 

– आणि या अशा काही कारणांमुळे आपले विमा दावे नाकारले जाण्याची सुद्धा शक्यता वाढू शकते. 

– म्हणूनच नेहमी आरोग्य विमा ( Health Insurance )खरेदी करत असताना अचूक वैद्यकीय इतिहास सांगितला पाहिजे तसेच इतर वाईट सवयी जसे की धूम्रपान करणे किंवा व्यसन असणे त्याबद्दल सुद्धा माहिती दिली पाहिजे.

– अचूक वैद्यकीय इतिहास सांगितल्यामुळे प्रीमियम थोड्याफार प्रमाणामध्ये वाढू शकतो परंतु विमा दावे नाकारण्याची शक्यता राहत नाही.

४.वैयक्तिक विमा संरक्षण न घेणे | Not taking personal insurance coverage  –

– हल्ली नोकर धारक व्यक्तीस विमा योजना दिली जाते परंतु या विमा योजनेमध्ये पुरेसे कव्हरेज आहे की नाही आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी ते विमा कवरेज उपयुक्त आहे की नाही, याचा विचार करणे आवश्यक आहे. 

– तसेच जर त्या व्यक्तीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तर अशावेळी ती विमा पॉलिसी संपुष्टात येण्याची शक्यता असते. 

– त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने या सर्व गोष्टींचा विचार करून वैयक्तिकरित्या आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे गरजेचे आहे.

५ . फाईन प्रिंटकडे दुर्लक्ष करणे | Ignoring the fine print –

– कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी फाईन प्रिंट काळजीपूर्वक वाचणे खूप महत्त्वाचे आहे.

– कारण त्यामध्ये आरोग्य विमा पॉलिसीच्या अटी आणि शर्ती, दावा सेटलमेंट प्रक्रिया व इतर महत्त्वपूर्ण बाबी जसे की अपवाद यांचा समावेश असतो, म्हणूनच हे काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

– आरोग्य विमा पॉलिसी मध्ये कोणते अपवाद आहेत तसेच आपण खरेदी करत असलेल्या पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत हे मुद्दे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे.

५ . तुमच्या पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण न करणे | Not renewing your health insurance policy on time – 

– आरोग्य विमा पॉलिसी काढल्यानंतर त्या पॉलिसीचे योग्य त्यावेळी नूतनीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

६ . वयाच्या वाढत्या काळामध्ये पॉलिसी करणे –

– काही व्यक्तींच्या मते तरुण वयामध्ये आरोग्य विमा पॉलिसी फायदेशीर नसते किंवा ज्या व्यक्तींचे असे मत आहे ते व्यक्ती तरुण वयात पॉलिसी खरेदी करत नाहीत परंतु हे पूर्णतः चुकीचे आहे.

– प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे. 

– काही व्यक्ती वयाच्या वाढत्या काळामध्ये पॉलिसी करतात परंतु तसे न करता आरोग्य विमा पॉलिसी योग्य त्या वेळेत खरेदी करणे महत्त्वाचे आहे. 

७ . आरोग्य विमा पॉलिसी संदर्भांमधील प्रश्न न विचारणे –

– काही व्यक्ती असे असतात की जे आरोग्य विमा पॉलिसी घेण्यासाठी एखाद्या कंपनीकडे जातात किंवा एखाद्या व्यक्तीकडे जातात परंतु त्यांच्या मनामध्ये आरोग्य विमा पॉलिसी संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारण्यामध्ये अडखळतात किंवा प्रश्न विचारण्यात संकोच करतात परंतु तसे न करता आरोग्य विमा पॉलिसी संदर्भामधील जी प्रश्न आपल्याला विचारायची आहेत ती प्रश्न आपण विचारली पाहिजे. 

– असे केल्यामुळे वेगवेगळ्या आरोग्य विमा पॉलिसी बद्दल आपल्याला माहिती मिळते आणि त्यातून योग्य आरोग्य विमा पॉलिसीची निवड आपल्याला करता येते.

अशा काही चुका आरोग्य विमा पॉलिसी (health insurance ) घेत असताना बरेच लोक करतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment