Importance of Investment | गुंतवणूक का करावी ? गुंतवणूक करणे का महत्त्वाचे आहे | गुंतवणूक करण्याचे महत्त्व | 5 Best Investment tips –

Importance of Investment | गुंतवणूक का करावी ? गुंतवणूक करणे का महत्त्वाचे आहे | गुंतवणूक करण्याचे महत्त्व | 5 Best investment tips –

   प्रत्येकाचेच आयुष्यामध्ये काही ना काही स्वप्न किंवा गोल्स असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मजबूत असणे आवश्यक असते. बऱ्याच व्यक्तींना चांगल्या पगाराची नोकरी असते किंवा चांगला व्यवसाय असतो परंतु त्यापैकी सर्वच व्यक्ती योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात असे नाही. किंवा काही व्यक्ती तर कुठेही गुंतवणूक न करता पैसे तसेच राखून ठेवता परंतु गुंतवणूक ही आपल्या आर्थिक धोरणामध्ये किती महत्त्वाचे आहे हे आजच्या ब्लॉगमध्ये ( Importance of Investment ) आपण जाणून घेणार आहोत..

Advertisement

Importance of Investment | गुंतवणूक करण्याचे महत्त्व –

Importance of Investment

Importance of Investment

1. गुंतवणूक केल्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते –

– आपण आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला या गोष्टीची खात्री असते की हे पैसे वाढणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला एक प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य मिळते.

– तसेच काही व्यक्ती असे सुद्धा असतात की ज्यांना असे वाटते की आपल्याला आर्थिक गरजांसाठी आपल्या रिटायरमेंट नंतर इतरांवर अवलंबून राहावे लागले तर ,असे होऊ नये यासाठी सुद्धा गुंतवणूक महत्त्वाची आहे. 

– नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे वृद्धापककाळामध्ये सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य टिकून राहते. 

– गुंतवणूक केल्यामुळे आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होते. 

– गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला पॅसिव्ह इनकम सुरू असल्याने रिटायरमेंट नंतर आपला मासिक खर्च तसेच इतर आर्थिक गरजा आरामात पूर्ण होतात याची खात्री आपल्याला मिळते.

2. गुंतवणूक हा पॅसिव्ह इन्कमचा चांगला स्रोत आहे, असे म्हणता येईल –

– कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच व्यक्तींना वाईट अनुभव आले ते असे की जे लोक उत्पन्नासाठी फक्त एकाच सोर्स वर अवलंबून होते त्यांचा तो सोर्स कोरोनाच्या काळामध्ये गेल्यामुळे आर्थिक खर्च किंवा मूलभूत गरजा पूर्ण करणे सुद्धा कठीण होऊन बसले होते. 

– म्हणूनच असे म्हणतात की,” एकाच मार्गाने शंभर रुपये येण्यापेक्षा 100 मार्गांनी एक एक रुपया आलेला कधीही चांगला…” ही गोष्ट जे मार्ग खात्रीशीर नाहीत त्या गोष्टींसाठी तर नक्कीच लागू होते. 

– एका सोर्स वर उत्पन्नासाठी अवलंबून न राहता उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे, त्यामध्ये गुंतवणूक हा पॅसिव्ह इनकम मिळवण्याचा चांगला स्रोत ठरू शकतो.

 – आपण गुंतवणूक मुदत ठेवी, इक्विटी, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टीज आणि इतर मालमत्तांमध्ये करू शकतो.

– या गुंतवणुकीमुळे तुमची नियमित मिळकत थांबली तरीही  परतावा मिळत राहील आणि बिकट काळामध्ये

आर्थिक परिस्थितीवर सामना करता येईल.

3.महागाईवर मात करण्यास मदत होते –

– महागाई ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि कदाचित ती टाळू शकत नाही. 

– जसजशी महागाई वाढत जाते तसतसं पैशांची परचेसिंग पावर कमी होते आणि जर आपण अशावेळी कुठेही गुंतवणूक केलेली नसेल तर आपल्याजवळ असणाऱ्या पैशांमध्ये वाढ सुद्धा होत नाही म्हणूनच वेळोवेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे महागाईवर मात करता येणे शक्य होईल आणि परचेसिंग पावर सुद्धा कमी होणार नाही.

4.कर लाभ –

 तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला कर लाभही मिळू शकतात? 

– काही ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे कर लाभ सुद्धा मिळू शकतो. 

– PPF, ELSS, टॅक्स सेव्हिंग बाँड्स आणि दीर्घकालीन मुदत ठेवी यांसारखी विविध गुंतवणूक आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलती देतात.

– हुशारीने योग्य ठिकाणी गुंतवणूक करून कराचे ओझे कमी करता येऊ शकते.

5. तुम्हाला तुमचे पॅशन फॉलो करता येते 

– बऱ्याच जणांना ट्रॅव्हलिंगची आवड असते किंवा इतर काही स्वप्न असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वप्न तरुण वयात किंवा लवकरात लवकर पूर्ण करता येत नाहीत. 

– परंतु जर अशी स्वप्न पूर्ण करायची असतील किंवा आपली जी आवड आहे ती जोपासायची असेल तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करून लवकर रिटायरमेंट घेऊन आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. 

– म्हणूनच अगदी कमी वयापासून म्हणजेच नोकरी लागल्यापासून किंवा व्यवसाय सुरू केल्यापासून जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य राहील. 

– योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर त्यावर मिळालेला परतावा किंवा पॅसिव्ह इन्कम आपली आवड पूर्ण करण्यामध्ये आपण वापरू शकतो. 

    अशाप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. या ब्लॉगमधून नक्कीच गुंतवणुकीचे महत्त्व ( Importance of Investment) समजले असेल. ही सर्व माहिती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा किंवा योग्य रीसर्च करून मगच गुंतवणूक करावी.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment