Income ideas 2024 | ३ जबरदस्त इन्कम आयडिया –
आपण नोकरी करत असू किंवा व्यवसाय करत असू तरीसुद्धा अजून काहीतरी साईड इन्कम हवी असे बऱ्याच जणांना वाटते, म्हणूनच बरेच व्यक्ती वेगवेगळ्या साईड ( Income Ideas) इन्कम आयडियाच्या शोधामध्ये असतात. अस म्हणतात की ,एका मार्गाने शंभर रुपये येण्यापेक्षा 100 मार्गांनी एक एक रुपया आलेला कधीही चांगले ..कारण कोरोनाच्या वेळी जवळपास सर्वांनाच अनुभव आला की आपण जर उत्पन्नासाठी एकाच मार्गावर अवलंबून असू आणि तो मार्ग जर बंद झाला तर आपले फार नुकसान होते. चला तर जाणून घेऊयात काही इन्कम आयडियाज…
Income ideas –
Table of Contents
१. रेंटल इन्कम –
– रेंटल इन्कम हा सुद्धा साईड इन्कम करण्याचा एक चांगला मार्ग ठरू शकतो, यासाठी आपल्याकडे एखादी एक्स्ट्रा रुम किंवा एक्स्ट्रा घर असणे गरजेचे आहे.
– जर आपल्या घरामध्ये एखादी जास्त रूम असेल तर ती रूम आपण रेंटने देऊ शकतो, मग ही रूम आपण कॉलेज स्टूडेंटला देऊ शकतो किंवा नोकरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो.
– जर आपल्याकडे एखादे जास्तीचे घर उपलब्ध असेल किंवा काही कारणास्तव आपण दुसऱ्या सिटीमध्ये स्थायिक झालो असू तर अशावेळी आपल्याकडे एक जास्त घर असण्याची शक्यता आहे. तर हे घर पूर्णपणे आपण रेंटने देऊ शकतो किंवा आपल्याला जास्तीचे इन्कम कमवायचे असेल तर अशावेळी ते घर आपण Airbnb सारख्या एखाद्या वेबसाईटवर रजिस्टर करू शकतो आणि जे पर्यटक किंवा इतर लोक आपल्या आसपासच्या ठिकाणी फिरण्यासाठी येतात त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो.
– अशा रीतीने rental income आपण कमावू शकतो.
२. ब्लॉगिंग किंवा वलॉगिंग करणे –
– हल्ली बरेच लोक ब्लॉगिंग किंवा वलॉगिंग करताना दिसतात किंवा जे व्यक्ती करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा साईड इन्कम मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे, साईड इन्कम म्हणण्यापेक्षा जर व्यवस्थित रित्या यामध्ये लक्ष दिले तर हा आपल्या उत्पन्नाचा मोठा मार्ग ठरू शकतो.
– ब्लॉगिंग म्हणजे वेबसाईट तयार करून त्यावर विविध विषयांवर ब्लॉग लिहिणे होय आणि वलॉगिंग म्हणजे युट्युब वर आपल्या आवडीच्या विषयावर व्हिडिओज बनवणे आणि शेअर करणे.
– ब्लॉगिंग किंवा वलॉगिंग करून आपण गुगल ॲड सेन्स, स्पॉन्सरशिप, अफिलीएट मार्केटिंग अशा विविध मार्गांनी इनकम जनरेट करू शकतो.
– ब्लॉगिंग किंवा वलॉगिंग करण्यासाठी सातत्य असणे आणि आपण जे कन्टेन्ट देत आहोत ते उत्तम असणे फार गरजेचे आहे.
– परंतु जर ब्लॉगिंग किंवा वलॉगिंग आपल्याला व्यवस्थितरित्या करता आले तर यामध्ये उत्तम करिअर घडण्याचे खूप चान्सेस असतात, त्यासोबतच काम करण्यामध्ये आपल्याला फ्लेक्सिबिलिटी मिळते तसेच आपण आपल्या वेळेनुसार काम करू शकतो.
३ . फ्रीलांसिंग –
– फ्रीलांसिंग याबद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलेले असेल परंतु याबद्दल सखोल माहिती फार कमी लोकांना असू शकते.
– फ्रीलांसिंग म्हणजे आपण आपल्याकडे असलेल्या स्किल्सचा उपयोग करून क्लाइंटला वर्क कम्प्लीट करून देणे होय.
– फ्रीलांसिंग मध्ये आपल्याला वेळेचे बंधन नसते म्हणजे दिवसभरामध्ये कधी काम करायचे यावर बंधन नसते परंतु क्लाइंटला ते काम जेव्हा करून पाहिजे आहे त्या वेळेमध्ये मात्र आपण ते काम करून देणे गरजेचे आहे.
– आपल्याकडे कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाईनिंग, प्रोग्रामिंग यांसारखे जे स्किल्स आहेत त्या स्किल्सचा उपयोग करून आपण फ्रीलांसिंग करू शकतो.
– परंतु फ्रीलांसिंग बद्दल अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही तसेच या क्षेत्रामध्ये कशा रीतीने काम करावे लागते, काम कसे मिळवायचे याबद्दल माहिती नाही परंतु फ्रीलांसिंग करून जास्तीत जास्त क्लाइंट आपण मिळवू शकतो आणि चांगली कमाई करू शकतो.
– फ्रीलांसिंग करण्यासाठी विविध वेबसाईट्स आहेत त्यावर आपली प्रोफाइल बनवून आपण आपल्या स्किल्सनुसार कामे मिळवू शकतो.
अशा रीतीने रेंटल इन्कम, ब्लॉगिंग किंवा वलॉगींग, फ्रीलान्सिंग या काही Income Ideas आहेत, या Income Ideas बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलेले असेल, यामध्ये काय नवीन आहे? असे काही लोकांना वाटू शकते परंतु या क्षेत्राबद्दल व्यवस्थित रित्या माहिती नसल्याकारणाने काही लोक या क्षेत्राकडे वळत नाहीत परंतु जर या क्षेत्राशी संबंधित आपल्याकडे स्किल्स असतील तर नक्कीच या income ideas बद्दल आपण विचार केला पाहिजे, ह्या income ideas नक्कीच इन्कमचा चांगला सोर्स ठरू शकतात.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |