Indoor Solar Cooking System | इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीम | आता गॅस भरण्यापासून सुटका | फॉर्म भरणे सुरू| Best Schemes 2025
पूर्वी स्वयंपाकासाठी चूल वापरली जायची तेव्हा खर्च तर वाचायचा परंतु वृक्षतोड तसेच प्रदूषण आणि महिलांना प्रदूषणामुळे होणारा त्रास यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या. आता एलपीजी सिलेंडर तसेच इतर नॅचरल गॅस पाईपलाईन , इलेक्ट्रिक शेगडी यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सुविधा चांगल्या असल्या तरी सुद्धा काही लोकांना परवडणाऱ्या नाहीत त्याऐवजी जर सोलर सिस्टिम वापरून स्वयंपाक करण्यास मदत झाली तर नक्कीच खर्चही वाचेल. आजच्या ब्लॉगमध्ये इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीम ( Indoor Solar Cooking System ) याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत…
Indoor Solar Cooking System | इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीम | आता गॅस भरण्यापासून सुटका | फॉर्म भरणे सुरू| Best Schemes 2025
Table of Contents
Indoor Solar Cooking System | इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीम
“सूर्य नूतन” इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम हा प्रोग्रॅम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेला आहे.
हा प्रोग्रॅम सौर ऊर्जा तसेच पारंपारिक ग्रीड ब्रिज दोन्ही स्वयंपाकासाठी उपलब्ध करणारा हायब्रीड सोलर इलेक्ट्रिक कुकिंग सोल्युशन आहे.
स्वयंपाक करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करावा यासाठी हा प्रोग्रॅम प्रोत्साहन देतो तसेच lpg आणि इतर जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
हा प्रोग्रॅम स्वयंपाक तयार करण्यासाठी परवडणारा असा स्वयंपाक पर्याय बनण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
सूर्य नूतन सिंगल तसेच डबल बर्नर या प्रकारांसह विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
तळणे, उकळणे, वाफवणे तसेच बेकिंग करणे अशा विविध स्वयंपाक पद्धतीसाठी हे वापरले जाऊ शकते.
Indoor Solar Cooking System Benefits | इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीमचे फायदे
१. स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि हरित ऊर्जा स्रोत
ही प्रणाली सौरऊर्जेवर चालते, ज्यामुळे प्रदूषण होत नाही.
पर्यावरणपूरक आणि हरित तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो.
२. घरामध्ये वापरण्यायोग्य (Indoor Use)
ही प्रणाली घरामध्ये वापरता येते, त्यामुळे पावसाळा, थंडी किंवा ढगाळ हवामानातही उपयोगी पडते.
पारंपरिक सौर कुकर बाहेर ठेवावे लागते, पण ही प्रणाली इनडोअर आहे.
३. एलपीजी, इंधन किंवा लाकूडफाटा यावर अवलंबित्व कमी
एलपीजी किंवा इतर इंधनाच्या किंमती वाढत असतानाही सौर कुकरमुळे खर्च वाचतो.
लाकूड किंवा कोळसा न वापरल्यामुळे जंगलतोड आणि प्रदूषण टाळता येते.
४. सुरक्षित आणि धुरविरहित (Smoke-free)
यामध्ये धूर होत नाही, त्यामुळे आरोग्यास अपाय होत नाही.
घरातील महिलांचे आणि वृद्धांचे आरोग्य टिकते.
५. दीर्घकालीन बचत (Long-Term Savings)
सुरुवातीला गुंतवणूक जास्त असली तरी नंतर इंधनाचा खर्च शून्यावर येतो.
कमी देखभाल खर्च आणि दीर्घायुषी यंत्रणा.
६. भारतात विकसित केलेली – आत्मनिर्भर भारताला हातभार
ही प्रणाली इंडियन ऑईलने विकसित केलेली असून “मेक इन इंडिया” अंतर्गत येते.
स्थानिक विकासाला प्रोत्साहन मिळते.
७. वेळेवर स्वयंपाक शक्य
ही प्रणाली थर्मल स्टोरेजसह येते – म्हणजे सौर उष्णता साठवून ठेवली जाते.
सूर्य नसतानाही (संध्याकाळी/रात्री) स्वयंपाक करता येतो.
महाराष्ट्रात उपलब्धता:
महाराष्ट्र सहित इतर काही राज्यांमध्ये सुद्धा सूर्य नूतन सहज उपलब्ध आहे.
इन डोअर सोलर कुकिंग सिस्टिम साठी इंडियन ऑइल कडे फ्री बुकिंग फॉर्म उपलब्ध आहेत जे ऑनलाईन भरता येतात.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही सिस्टीम कार्बन क्रेडिट्सद्वारे तैनात करण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
अर्जदार अधिकृत इंडियन ऑइल वेबसाइट मार्फत सूर्य नूतन सिस्टमची प्री-बुकिंग करू शकतात.
ऑनलाइन अर्ज:
प्री-बुकिंग प्रक्रियेमध्ये ऑनलाइन फॉर्म भरणे आणि आवश्यक डिटेल्स देणे या गोष्टींचा समावेश आहे.
संपर्क : तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही मदत हवी असेल तर इंडियन ऑइलची संपर्क माहिती त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, त्या ठिकाणावरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
Indoor Solar Cooking System application | इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीम मिळवण्यासाठी अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.