जननी सुरक्षा योजना| Janani Suraksha Yojana

जननी सुरक्षा योजना| Janani Suraksha Yojana –

     केंद्र सरकारतर्फे तसेच राज्य सरकारतर्फे विविध उद्देशाने वेगवेगळ्या योजना राज्यभरात तसेच देशभरामध्ये राबवल्या जात असतात. गर्भवती स्त्रियांसाठी  सुद्धा योजना उपलब्ध आहे आणि ती योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना. या योजनेबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.त्यामध्ये या योजनेसाठी पात्रता काय लागेल, कोणती कागदपत्रे लागतात, तसेच अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती या लेखांमध्ये आपण बघणार आहोत.

Advertisement

जननी सुरक्षा योजना| Janani Suraksha Yojana –

– जननी सुरक्षा योजना केंद्र सरकारने १२ एप्रिल २००५ रोजी सुरू केलेली आहे.

– जननी सुरक्षा योजना ही ग्रामीण भागातील गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा आहे त्याचबरोबर शहरी भागांमधील गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा ही योजना लागू आहे.

– जननी सुरक्षा योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना घेता येणार आहे.

– महिलांची प्रसूती सुरक्षित होण्यासाठी तसेच महिलांचे आरोग्य संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य जननी सुरक्षा योजनेअंतर्गत केले जाते.

– अनुसूचित जाती आणि जमाती दारिद्रय रेषेखाली मातांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत प्रसुती सेवा तसेच काही आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाते.

– तसेच प्रसूतीनंतर आई आणि बाळ यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काही आर्थिक सहाय्य जननी सुरक्षा योजनेअंतर्गत दिले जाते.

जननी सुरक्षा योजना पात्रता | Janani Suraksha Yojana  Eligibility –

– ज्या गर्भवती महिलेला जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचे वय १९ किंवा १९ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

– शासनाने निवडलेल्या रुग्णालयामध्ये किंवा संस्थेमध्येच जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळू शकतो.

– जननी सुरक्षा योजना ही ग्रामीण तसेच शहरी भागामधील गर्भवती महिलांसाठी लागू आहे.

– जननी सुरक्षा योजनेअंतर्गत एखाद्या महिलेला तिच्या दोन अपत्यांपर्यंतच मोफत तपासणी आणि मोफत प्रसूती या सुविधा किंवा जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल.

– दारिद्र्यरेषेखालील / देशामधील गरीब कुटुंबांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल.

जननी सुरक्षा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents required for Janani Suraksha Yojana –

– आधार कार्ड

– रहिवासी पुरावा

– बीपीएल ( BPL ) रेशनकार्ड

– पासपोर्ट आकाराचा फोटो

– आयु प्रमाणपत्र आयडी

– जननी सुरक्षा कार्ड

– शासकीय रुग्णालयातून डिलिव्हरी प्रमाणपत्र

– बँक खाते पासबुक

– मोबाइल नंबर

–  MCH कार्ड

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारा लाभ –

🔸LPS ( कमी परफॉर्मन्स असलेली राज्ये ) :

ग्रामीण भाग : 

– जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागामधील महिला गर्भवती महिलांना १४०० रुपये मिळतात.

– आशा वर्करला ६०० रुपये मिळतात,ज्या मध्ये ३०० रुपये प्रसूती प्रोत्साहनासाठी आणि ३०० रुपये प्रसूतीनंतरच्या पूर्ण सेवेसाठी.

शहरी भाग :

– शहरी भागामधील गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत १००० रुपये मिळतात.

– आशा वर्करला ४०० रुपये मिळतात,ज्या मध्ये २०० रुपये प्रसूती प्रोत्साहनासाठी आणि २०० रुपये प्रसूतीनंतरच्या पूर्ण सेवा करण्यासाठी.

🔸HPS (चांगले परफॉर्मन्स असलेली राज्ये) :

ग्रामीण भाग :-

– ग्रामीण भागात राहणाऱ्या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेळी सरकारकडून ७०० रुपये मिळतात.

– आशा वर्करला ६०० रुपये मदत मिळते.

शहरी भाग :

– शहरी भागात राहणाऱ्या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेळी सरकारकडून ६०० रुपये दिले जातील. 

– आशा वर्करला ४०० रुपये मदत मिळते.

🔸सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास पात्र लाभार्थीस रु. १५००/- इतकी रक्कम मदत म्हणून देण्यात येते.

🔸जर एखाद्या महिलेची प्रसूती सरकारी रुग्णालयामध्ये झाली तर त्या महिलेला प्रधानमंत्री मेरी वंदना योजनेअंतर्गत पाच हजार रुपये मिळतात.

जननी सुरक्षा योजने अंतर्गत सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था-

ग्रामीण भागात :

– प्र‍ाथमिक आरोग्‍य केंद्रे

– ग्रामीण रुग्‍णालये

– उपकेंद्रे

– उपजिल्‍हा रुग्‍णालये

– जिल्‍हा रुग्‍णालये

– जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्‍णालये.

शहरी भागात :

– नगरपालिका व महानगरपालिका यांच्‍या कार्यक्षेञतील नागरी आरोग्‍य केंद्रे

– वैदयकीय महाविदयालये

– नागरी कुटुंब कल्‍याण केंद्रे व त्‍यांच्‍याकडील इतर रुग्‍णालये आणि शासन अनुदानित रुग्‍णालये.

जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया | application process for Janani Suraksha Yojana –

– प्रथम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

– वेबसाईटवरून अर्जाची PDF डाउनलोड करावी लागेल .

– नंतर फॉर्मची प्रिंटआउट काढावी.

– फॉर्मची प्रिंट आउट काढल्यानंतर फॉर्म व्यवस्थित रित्या भरावा.

– फॉर्म भरून झाल्यानंतर या योजनेसाठी फॉर्ममध्ये जेवढी कागदपत्रे मागितली आहे, त्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स फॉर्मला जोडाव्यात.

– आता हा फॉर्म नजीकच्या खाजगी आरोग्य केंद्रात आणि अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करा.

– त्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाईल.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment