Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम  | मिळवा 30 हजार रुपयांची स्कॉलरशिप… I Best scholarship for students

Kotak Life Insurance Scholarship

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम  | मिळवा 30 हजार रुपयांची स्कॉलरशिप… 

     बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकत नाही. असे विद्यार्थी जे हुशार आहेत, शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी विविध स्कॉलरशिप असतात परंतु त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते. आपल्या वेबसाईटवर अशा विविध स्कॉलरशिप बद्दल माहिती उपलब्ध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप ( Kotak Life Insurance Scholarship )बद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम –
Advertisement

– कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 हा कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा एक प्रोजेक्ट आहे, जो तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतो.

– या स्कॉलरशिप अंतर्गत तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी सध्या बी.कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकत आहेत, त्या पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे.आठ विशिष्ट महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी प्रति वर्ष ३०,००० रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळेल, त्या महाविद्यालयांची यादी पुढे बघणारच आहोत. 

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 Eligibility | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी पात्रता :

– तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील रहिवासी असलेले विद्यार्थी कोटक लाईफ इन्शुरन्स स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात. 

– अर्जदारांनी बी.कॉमच्या पहिल्या वर्षात तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आठ पुढे दिलेल्या महाविद्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी  नोंदणी केलेली पाहिजे.महाविद्यालयांची यादी पुढील प्रमाणे आहे :

– अर्जदारांनी  10 वी आणि 12 वीमध्ये 65% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. 

– अर्जदारांनी 2023-24 मध्ये इयत्ता 12वी उत्तीर्ण केलेली असावी. 

– अर्जदाराचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,60,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

टीप: कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि Buddy4Study च्या एम्प्लॉइजची मुले अर्ज करण्यास पात्र नाहीत.

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 Benefits | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅमचे फायदे :

शैक्षणिक खर्चासाठी तीन वर्षांसाठी दर वर्षी 30,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल.

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 Documents | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी लागणारे कागदपत्रे :

 – दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट

– सरकारने इशू केलेले ओळखपत्र ( आधार कार्ड/वोटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड )

– सध्याच्या वर्षाचे ऍडमिशन प्रूफ ( फी रिसीट / ऍडमिशन लेटर )

– स्टुडन्ट आयडी कार्ड किंवा संस्थेमार्फत इश्यू केलेले बोनाफाईड सर्टिफिकेट

– उत्पन्नाचा पुरावा ( फॉर्म 16A, गव्हर्मेंट ऑथॉरिटी मार्फत उत्पन्न सर्टिफिकेट, सॅलरी स्लिप इत्यादी )

– अर्जदाराचे बँक अकाउंट डिटेल्स ( बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक )

– सध्याचा पासपोर्ट साईज फोटो.

Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 Application | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज :

– कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अर्ज करण्याकरिता पुढील लिंक वर क्लिक करा.

https://www.buddy4study.com/page/kotak-life-insurance-scholarship-program

– त्यानंतर ” Apply” या बटनावर क्लिक करा. 

– जर आपण रजिस्ट्रेशन केलेले असेल तर कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल आणि रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करू शकतात त्यानंतर कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप साठी अप्लाय करण्यासाठी पेज ओपन होईल. 

– त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अप्लाय करू शकता. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version