Ladaki Bahin loan Yojana| लाडक्या बहिणींना मिळणार 30 ते 40 हजार रुपये कर्ज | लाडकी बहीण लोन योजना | ladaki Bahin Yojana | Best Government Schemes 2025
Ladaki Bahin loan Yojana| लाडक्या बहिणींना मिळणार 30 ते 40 हजार रुपये कर्ज | लाडकी बहीण लोन योजना | ladaki Bahin Yojana | Best Government Schemes 2025
Table of Contents

मागील वर्षापासून लाडकी बहिणी योजना सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. याचा अनेक महिलांना फायदा होत असून काही महिलांनी या पैशांचा उपयोग व्यवसाय उभारणी करता तसेच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी केला आहे आणि करतही आहेत. परंतु ही रक्कम छोटी असल्याकारणाने व्यवसाय उभा करण्यासाठी अजून थोडी रक्कम जर महिलांना एकत्रित मिळाली तर महिला त्या रकमेच्या आधारे व्यवसाय सुरू करू शकतात आणि आता हे खरं देखील होऊ शकतं कारण नुकतीच अजित पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये याबद्दल घोषणा केली.
अजित पवार यांनी सांगितले की महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत एकत्रित रक्कम मिळू शकते, यासाठी काही बँका पुढे देखील आलेले आहेत आणि काही बँकांशी बोलणी सुद्धा सुरू आहे. लाडकी बहीण लोन योजनेअंतर्गत महिलांना जे 30 ते 40 हजार रुपये मिळतील त्याचे हप्ते पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या दीड हजार रुपयांमधून भरले जातील. आता याचे नक्कीच स्ट्रक्चर कशाप्रकारे असेल याबद्दल ही बाब व्यवस्थित रित्या ठरल्यानंतर समोर येईल.
तसेच अजित पवार असेही म्हणाले की विरोधी लोकांकडून कधीकधी अफवा पसरवल्या जातात की ही योजना बंद होणार आहे परंतु त्यांनी पुन्हा सांगितले की पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत राहील आणि लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही.
खरोखरच, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना फायदा झाला असून या पैशामुळे महिन्याचा किराणा, लाईट बिल, शाळेची फी, घर भाडे तसेच छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना फायदा होत आहे. आता जर लाडकी बहीण लोन ( Ladaki Bahin loan Yojana ) योजनेअंतर्गत महिलांना तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळाले तर मात्र महिला नक्कीच अजून काहीतरी चांगलं करू शकतील आणि आत्मनिर्भर बनतील.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा अकरावा हप्ता कधी मिळेल ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा अकरावा हप्ता हा 20 मे ते 25 मे यादरम्यान मिळू शकतो.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |