LIC AAO Bharti 2025 Notification Out | एलआयसी सहाय्यक प्रशासन अधिकारी (AAO) भरती 2025 | 350 पदांसाठी मोठी संधी

LIC AAO Bharti 2025 Notification Out | एलआयसी सहाय्यक प्रशासन अधिकारी (AAO) भरती 2025 | 350 पदांसाठी मोठी संधी

एलआयसी सहाय्यक प्रशासन अधिकारी (AAO) भरती 2025 – 350 पदांसाठी मोठी संधी

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (LIC of India) कडून नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. LIC ने सहाय्यक प्रशासन अधिकारी (AAO – Generalist) 32वी बॅच भरती 2025 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 350 पदे

Advertisement
भरण्यात येणार आहेत.

🔹 LIC AAO Bharti 2025 Notification Out एकूण पदांची संख्या (Vacancies)

  • एकूण पदे – 350
  • यात SC, ST, OBC, EWS व PwBD उमेदवारांसाठी आरक्षण दिलेले आहे.
  • आरक्षण हे केंद्र शासनाच्या नियमांनुसार लागू असेल.

🔹 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 ऑगस्ट 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2025
  • प्राथमिक परीक्षा (Prelims) – 03 ऑक्टोबर 2025 (तात्पुरती)
  • मुख्य परीक्षा (Mains) – 08 नोव्हेंबर 2025 (तात्पुरती)
  • प्रवेशपत्र (Call Letter) – परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल.

🔹LIC AAO Bharti 2025 Notification Out पात्रता निकष (Eligibility Criteria)

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय – 21 वर्षे (01.08.2025 रोजी पूर्ण झालेले)
  • कमाल वय – 30 वर्षे
  • जन्मतारीख – 02.08.1995 ते 01.08.2004 दरम्यान असावी.

👉 शासकीय नियमांनुसार SC/ST, OBC, PwBD, माजी सैनिक व LIC कर्मचारी यांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor’s Degree) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून असणे आवश्यक.

🔹 LIC AAO Bharti 2025 Notification Out वेतनमान व सुविधा (Salary & Benefits)

  • प्रारंभील मूलभूत पगार – ₹88,635/- प्रतिमाह
  • एकूण मासिक पगार (HRA, भत्ते समावेश) – अंदाजे ₹1,26,000/- प्रतिमाह (A वर्ग शहरात)
  • अन्य सुविधा – पेन्शन, ग्रॅच्युइटी, LTC, मेडिकल सुविधा, गट विमा, गृहनिर्माण व वाहन कर्ज, मोबाईल बिल, वृत्तपत्र भत्ता, इत्यादी.

🔹 LIC AAO Bharti 2025 Notification Out निवड प्रक्रिया (Selection Process)

LIC AAO भरती तीन टप्प्यात होणार आहे :

LIC AAO भरती 202५, Study Material बुक्स- Link

1️⃣ LIC AAO Bharti 2025 Notification Out प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)

  • ऑनलाईन परीक्षा – 100 प्रश्न / 70 गुण
  • विषय :
    • रिझनिंग – 35 प्रश्न / 35 गुण
    • क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड – 35 प्रश्न / 35 गुण
    • इंग्रजी (Qualifying) – 30 प्रश्न / 30 गुण
  • कालावधी – 1 तास
  • इंग्रजीचा पेपर फक्त पात्रतेसाठी, गुण मोजले जाणार नाहीत.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

2️⃣ मुख्य परीक्षा (Main Exam)

  • ऑनलाईन परीक्षा + वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा
  • एकूण गुण – 300 + 25
  • विषय :
    • रिझनिंग – 90 गुण
    • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – 60 गुण
    • डेटा विश्लेषण व इंटरप्रिटेशन – 90 गुण
    • विमा व वित्तीय बाजार ज्ञान – 60 गुण
    • इंग्रजी वर्णनात्मक (Qualifying) – 25 गुण
  • कालावधी – 2 तास 30 मिनिटे

3️⃣ मुलाखत (Interview)

  • एकूण गुण – 60
  • पात्रतेसाठी UR/OBC/EWS साठी – 30 गुण, SC/ST/PwBD साठी – 27 गुण आवश्यक.

👉 अंतिम निवड = मुख्य परीक्षा + मुलाखत गुण

4️⃣ वैद्यकीय तपासणी (Medical Test)

  • निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करूनच नियुक्ती केली जाईल.

🔹 अर्ज फी (Application Fees)

  • SC/ST/PwBD उमेदवार – ₹85/- + GST + Transaction Charges
  • इतर सर्व उमेदवार – ₹700/- + GST + Transaction Charges

🔹 सेवा अटी (Service Conditions)

  • निवड झाल्यानंतर उमेदवारांना किमान 5 वर्षे ग्रामीण/मॉफुसिल शाखेत काम करावे लागेल.
  • उमेदवारांना भारतातील कुठल्याही शाखेत बदली केली जाऊ शकते.

🔹 हमी बाँड (Guarantee Bond)

  • निवड झाल्यानंतर LIC मध्ये किमान 4 वर्षे सेवा करणे अनिवार्य आहे.
  • अन्यथा उमेदवाराला ₹5,00,000/- नुकसानभरपाई द्यावी लागेल.

🔹 LIC AAO Bharti 2025 Notification Out अर्ज कसा करावा? (How to Apply)

  1. LIC ची अधिकृत वेबसाईट उघडा – 👉येथे क्लिक करा
  2. “Recruitment of Assistant Administrative Officer (AAO) 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
  4. शैक्षणिक कागदपत्रे व छायाचित्र/स्वाक्षरी अपलोड करा.
  5. ऑनलाईन फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  6. प्रिंटआउट घेऊन ठेवा.

🔹 निष्कर्ष

LIC AAO भरती 2025 ही पदवीधर तरुण-तरुणींसाठी स्थिर व उच्च वेतनाची सुवर्णसंधी आहे. पगार, सुविधा आणि प्रतिष्ठा यामुळे LIC AAO ही नोकरी अत्यंत आकर्षक ठरते. इच्छुक उमेदवारांनी 8 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज करावा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version