एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना | LIC Kanyadan Yojana

     बऱ्याच जणांना मुलगी झाली की तिच्या शिक्षणाची तसेच लग्नाची चिंता सतावते. काहींची तर आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असते त्यांना सुद्धा मुलींबद्दल सारखी चिंता सतावत असते परंतु आता वेगवेगळ्या योजना आहेत की ज्यामध्ये गुंतवणूक करून काही वर्षानंतर त्या बदल्यात चांगला मोबदला मिळतो आणि त्यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित होते. अशीच एक योजना आहे “एलआयसी कन्यादान योजना.” 

Advertisement
या योजनेबद्दलच अधिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत…

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना | LIC Kanyadan Policy Yojana –

– एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे.

– ही योजना सुरू करण्यासाठी मुलीचे किमान वय एक वर्ष असावे तर मुलीच्या वडिलांचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे.

– एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेचा लाभ भारतीय नागरिक येऊ शकतात.

– एलआयसी पॉलिसी ही 25 वर्षाच्या कालावधीसाठी असली तर प्रीमियम फक्त 22 वर्षापर्यंतच भरावा लागतो.

– काही ठिकाणी असे आढळते की दररोज 121 रुपये इतका प्रीमियम भरावा लागतो परंतु असेही चालेल किंवा आई-वडिलांच्या उत्पन्नाच्या नुसार प्रीमियम कमी जास्त सुद्धा करता येऊ शकतो.

– प्रीमियम हा दररोज, एक महिन्याने, चार महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वार्षिक अशा प्रकारे भरू शकतो.

– पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी विमाधारकास एकरकमी रक्कम दिली जाते.

– एलआयसी कन्यादान पॉलिसी योजने दरम्यान मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागणार नाही.

– परिपक्वता तारखेपर्यंत 50 हजार रुपये वार्षिक प्रीमियम दिला जाईल.

– जर लाभार्थीचा मृत्यू पॉलिसी दरम्यान नैसर्गिक कारणामुळे झाला तर 5,00,000 रुपये दिले जातील.

– जर लाभार्थीचा अपघातामुळे मृत्यू झाला तर कुटुंबाला 10,00,000 रुपये दिले जातात.

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेचे लाभ –

– जर दररोज 75 रुपये वाचवले आणि प्रीमियम भरला तर, पंचवीस वर्षानंतर चौदा लाख रुपये पर्यंतचा लाभ मिळू शकतो. अशाप्रकारे आपल्या उत्पन्नानुसार प्रीमियम भरू शकतो आणि त्यानुसार लाभ मिळतो.

– एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना ही पूर्णपणे करमुक्त आहे.

– सलग तीन वर्षांसाठी व्यवस्थित रित्या जर प्रीमियम भरला असेल तर कर्ज सुद्धा मिळू शकते.

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना पात्रता –

– कन्यादान पॉलिसीची मुदत तेरा ते पंचवीस वर्षांपर्यंत आहे.

– कन्यादान पॉलिसी योजनेसाठी वडिलांचे वय 18 ते 50 वर्ष असावे.

– या योजनेचा लाभ हा मुलीच्या वडिलांद्वारे मुलीला मिळतो.

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

– आधारकार्ड

– पासपोर्ट साइज फोटो

– उत्पन्नाचे प्रमाणपत्र

– रहिवासी दाखला

– मुलीचे जन्म प्रमाणपत्र

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेसाठी अर्ज –

– आपल्या ओळखीमध्ये नक्कीच एखादे का होईना एलआयसी एजंट असतात त्यांच्याशी संपर्क साधून या योजनेबाबत अधिक माहिती मिळवू शकता.

– तसेच एलआयसी ऑफिसशी सुद्धा संपर्क साधू शकता.

– त्याचबरोबर एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेसंदर्भामधील अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा जाणून घेऊ शकता.

एलआयसी योजनेसंदर्भामधील महत्त्वपूर्ण माहिती –

– जर ही योजना सुरू केल्यापासून पॉलिसीधारकाने बारा महिन्यांच्या आत जर आत्महत्या केली तर कुठलाही लाभ दिला जाणार नाही.

– पॉलिसी धारकाला पॉलिसी सुरू केल्यापासून पंधरा दिवसांचा फ्री लुक पिरेड दिला जातो म्हणजेच जर पॉलिसीधारक हा पॉलिसी संदर्भामध्ये समाधानी नसेल तर तोपर्यंत बाहेर पडू शकतो.

– मासिक रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांचा अतिरिक्त पिरेड दिला जातो तर तिमाही पेमेंट साठी तीस दिवसांचा कालावधी दिला जातो, यासाठी कुठलाही अधिक चार्ज घेतला जात नाही परंतु जर रक्कम वेळेमध्ये भरली नाही तर पॉलिसी संपुष्टात येऊ शकते.

– तीन वर्ष प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीधारकाला पॉलिसी सरेंडर करण्याची परवानगी असते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment