Low investment business idea | कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारे आणि युनिक असे काही व्यवसाय | Best business ideas 2024 –

Low investment business idea | कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारे आणि युनिक असे काही व्यवसाय | Best business ideas 2024 –

       आजच्या ब्लॉगमध्ये आपण कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता ( Low investment business idea ) येतील असे आणि युनिक तसेच सध्या ट्रेंडिंग असणारे व्यवसाय बघणार आहोत. आजच्या ब्लॉगमध्ये जे व्यवसाय बघणार आहोत त्यासाठी कुठल्याही ऑफिसची किंवा शॉपची आवश्यकता नाही तसेच हे व्यवसाय आपण पार्ट टाइम करू शकतो किंवा फुल टाइम सुद्धा करू शकतो. हे व्यवसाय करत असताना जास्त भांडवलाची आवश्यकता भासत नाही तसेच टेक्निकल नॉलेज असणे सुद्धा आवश्यक नाही त्यामुळे पार्टनरशिप करण्याची सुद्धा गरज नाही. या व्यवसायांमध्ये आपल्याला कस्टमर कडे जावे लागत नाही तर कस्टमरच आपल्याकडे येतात . या व्यवसायांमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे व्यवसायाचे ठिकाण. आपण हे व्यवसाय कुठे सुरू करत आहोत याला खूप महत्त्व आहे त्यामुळे लोकेशन अचूक निवडणे गरजेचे आहे.चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते व्यवसाय आहे…

Low investment business idea | कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारे आणि युनिक असे काही व्यवसाय  –

Low investment business idea
Low investment business idea

Low investment business idea

१ . 360 डिग्री सेल्फी बूथ बिझनेस | 360 degree selfie booth business –

  • सध्या या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. सेल्फी बूथ हा व्यवसाय सध्या ट्रेंडिंगला असून बरेच लोक या मार्फत व्हिडिओ काढू इच्छित असतात आणि हे व्हिडिओज शॉर्ट किंवा रील्स बनवण्याचा त्यांचा हेतू असतो. तर काही लोक आवड म्हणून सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओज काढण्यास इच्छुक असतात.
  • या व्यवसायामध्ये एका छोट्याशा व्हिडिओसाठी 40 ते 50 रुपये किंवा लोकेशन नुसार शंभर रुपयांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक रक्कम आकारली जाऊ शकते.
  • या व्यवसायामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक लागू शकते.

२. बॅटरी ऑपरेटेड किड्स वेहिकल बिझनेस | battery operated kids vehicle business –

  • बॅटरी द्वारे ऑपरेट होणाऱ्या गाड्या हे लहान मुलांसाठी मोठे आकर्षण असते. अशा बॅटरी ऑपरेटेड व्हेईकल्स कुठे दिसल्यास लहान मुले नक्कीच त्या गाडीची राईड करण्याचा हट्ट करतात आणि पालक सुद्धा त्यांचा तो हट्ट पुरवतात.
  • अशा बॅटरी ऑपरेटर व्हेईकल्स 6 ते 8 हजार पर्यंत मिळू शकतात. तसेच एका वेहिकल मध्ये आरामात दोन छोटी मुले बसू शकतात. दोन ते तीन मिनिट चक्कर मारण्यासाठी वीस ते पंचवीस रुपये आकारले जाऊ शकतात. असं जर रोज दोन तास जरी केले तरी चांगली कमाई होऊ शकते. हळूहळू एक वेईकलमार्फत हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो त्यानंतर जास्त वेहिकल्स आणि विविध ठिकाणे पकडून हा व्यवसाय वाढवला जाऊ शकतो.
  • ज्यावेळी हा व्यवसाय वाढवला जाईल त्यावेळी आपण स्वतः त्या ठिकाणी हजर न राहता ठीक ठिकाणी विविध लोक या व्यवसायासाठी नेमू शकतो. या व्यवसायामध्ये सुद्धा गुंतवणूक एकाच वेळी करावी लागणार आहे परंतु कमाई मात्र चांगली होऊ शकते.

३. किड्स गेम बिजनेस | kids game business –

  • विविध ठिकाणी किंवा जत्रेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे गेम्स असतात. या खेळामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी काही चार्जेस ठरवलेले असतात.
  • जम्प अँड प्ले, स्लाईड अँड सिंग, जम्पिंग या प्रकारचे निरनिराळे खेळ यामध्ये असू शकतात. अशा खेळांमध्ये ज्या मोठमोठ्या वस्तू असतात त्यामध्ये हवा भरलेली असते किंवा इतर प्रकारच्या सुद्धा काही वस्तू असू शकतात.
  • लहान मुलांना थोडा वेळ खेळण्यासाठी किंवा मिनिटानुसार यामध्ये चार्जेस ठरवले जाऊ शकतात. चाळीस ते पन्नास रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत चार्जेस या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
  • खेळानुसार या व्यवसायामध्ये गुंतवणूक ₹5,000 पासून ते लाख रुपयांपर्यंत बदलू शकते. 

४. रिमोट कंट्रोल टॉईज | Remote control toys –

  • लहान मुलांसाठी विविध रिमोट द्वारे ऑपरेट होणारे टॉईज असतात आणि त्याचे लहान मुलांना भलतेच आकर्षण असते.
  • या टॉईजमध्ये हेलिकॉप्टर, कार, जेसीपी, जीप्स असे विविध प्रकार येतात.
  • थोड्या वेळासाठी हे खेळ खेळण्यासाठी लोकेशन नुसार चार्जेस ठरवले जाऊ शकतात.
  • या व्यवसायामध्ये गुंतवणूक अगदी हजार रुपयांपासून सुरू होते, आपण ज्या प्रकारचे खेळ घेतो त्यानुसार गुंतवणूक बदलू शकते. 

   अशा रीतीने हे काही व्यवसाय आहेत जे कमी गुंतवणुकीमध्ये ( Low investment business idea ) सुरू केले जाऊ शकतात परंतु या व्यवसायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे योग्य लोकेशन निवडणे. वेगवेगळ्या लोकेशन नुसार आपण वेगवेगळे दर ठरवू शकतो. या व्यवसायामध्ये एकाच वेळी गुंतवणूक करून त्यानंतर चांगला नफा कमावला जाऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment