महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना | Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana –

      बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीसाठी काही अवजारे घ्यायचे असते परंतु आर्थिक अडचण असल्याने ते घेणे शक्य होत नाही तर ही योजना नक्की तुमच्या कामी येऊ शकते…ती योजना आहे ..महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना. 

Advertisement
या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती अधिक उत्तम प्रकारे करता येणे शक्य होईल. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती….

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना | Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana –

– महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेची सुरुवात 2017 मध्ये झालेली आहे.

– राज्यामधील लघु व मध्यम शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान हा लाभ मिळणार आहे.

– शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत स्वयंचलित अवजारे तसेच मनुष्यचलित अवजारे, ट्रॅक्टर,काढणी व मळणी अवजारे , पूर्व मशागत तसेच आंतरमशागत अवजारे यांसारख्या कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे.

– अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% आणि इतर शेतकऱ्यांना ४०% इतके अनुदान कृषी यांत्रिकीकरणाला  मिळणार आहे.

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेचे फायदे | Benefits –

या योजनेअंतर्गत पुढील यंत्र किंवा अवजारे घेण्यासाठी अनुदान मिळेल.

– ट्रॅक्टर

– पॉवर टिलर

– ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे

– बैल चलित यंत्र/अवजारे

– मनुष्य चलित यंत्र/अवजारे

– प्रक्रिया संच

–  काढणी पश्च्यात तंत्रज्ञान

– फलोत्पादन यंत्र/अवजारे

– वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे

– स्वयं चलित यंत्रे

अटी/पात्रता |Eligibility –

– ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी एकाच गोष्टीसाठी अनुदान मिळू शकते.

– समजा एखाद्या शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला तर तेच अवजार घेण्यासाठी पुढील त्या शेतकऱ्याला १० वर्षे अर्ज करता येणार नाही पण दुसऱ्या अवजारासाठी त्या शेतकऱ्याला अर्ज करता येईल. 

– जर कुटुंबामध्ये ट्रॅक्टर असला तर ट्रॅक्टरचलित अवजारे मिळू शकतात त्यासाठी ट्रॅक्टर नावे असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents – 

– 7/12 उतारा

– 8 अ उतारा

– आधार कार्ड

– बँक पासबुक

– अवजारांचे दर पत्रक

– आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक,

– अवजार टेस्ट रिपोर्ट

– जातीचा दाखला असल्यास

– पूर्वसंमती पत्र

– स्वयंघोषणापत्र

अर्ज | Application –

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल तर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version