Maharashtra pink e rickshaw yojana I महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना I Best Government Schemes 2024
आजच्या ब्लॉग मध्ये महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 या दिवशी अर्थ संकल्पामध्ये घोषणा केलेल्या,महिलांसाठी असणार्या महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा (Maharashtra pink e rickshaw yojana) योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Maharashtra pink e rickshaw yojana I महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना –
Table of Contents
- महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पामध्ये केली.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना ही योजना आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी आहे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना या योजनेचा लाभ 10 शहरांमधील महिलांना घेता येणार आहे, ती शहरे कोणती आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना या योजनेमुळे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यामध्ये मदत होणार आहे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना या योजनेमुळे बेरोजगार महिलांना रोजगार मिळण्यामध्ये मदत होणार आहे.
महाराष्ट्र पिंक ई – रिक्षा योजनेचे फायदे I Benefits of Maharashtra pink e rickshaw yojana
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 20 % अनुदान मिळणार आहे.
- लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत 10% रक्कम फक्त भरावी लागणार आहे तर उर्वरित 20 % अनुदान आणि 70% रक्कम बँक लोण मार्फत भरली जाणार आहे,कर्जाची परतफेड 5 वर्षे (60 महिने) मध्ये करावी लागणार आहे.ई- रिक्षाच्या किंमतीमध्ये सर्व करांच्या (GST, Registration, Road Tax, etc.) समावेश असणार आहे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना या योजनेमुळे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यामध्ये मदत होणार आहे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना या योजनेमुळे बेरोजगार महिलांना रोजगार मिळणार आहे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना ही योजना महिलांसाठी असल्याने जास्तीत जास्त महिला रिक्षा चालवतील.
- मोठ्या शहरांमधील महिलांना सुद्धा प्रवासासाठी या योजनेमुळे फायदा होणार आहे.
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना पात्रता I Eligibilty crieteria for Maharashtra pink e rickshaw yojana
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच दिला जाईल.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान असावे.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त नसावे.
- ज्या महिलेच्या कुटुंबामधील व्यक्ति सरकारी नोकरीस आहे त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार महिलेकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेचा लाभ मिळणारी शहरे I Cities to benefit from Maharashtra pink e rickshaw yojana :
शहर | लाभार्थी |
मुंबई उपनगर | 1400 |
ठाणे | 1000 |
पुणे | 1400 |
नाशिक | 700 |
नागपुर | 1400 |
कल्याण | 400 |
अहमदनगर | 400 |
नवी मुंबई | 500 |
पिंपरी | 300 |
अमरावती | 300 |
चिंचवड | 300 |
पनवेल | 300 |
छत्रपती संभाजीनगर | 400 |
डोंबिवली | 400 |
वसई-विरार | 400 |
कोल्हापुर | 200 |
सोलापुर | 200 |
एकुण | 10000 |
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेअंतर्गत लाभार्थी प्राधान्यक्रम:
- विधवा महिला
- कायद्याने घटस्फोटीत महिला
- राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित महिला
- अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती
- अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित
- दारिद्र्य रेषेखालील महिला
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना आवश्यक कागदपत्रे I Documents required for Maharashtra pink e rickshaw yojana
- अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 3 लाखापेक्षा कमी.).
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो.
- मतदार ओळखपत्र (18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला).
- रेशनकार्ड
- चालक परवाना
- सदर गुलाबी रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र.
- या योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
Maharashtra pink e rickshaw yojana लाभार्थी निवड कशी केली जाईल ?
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेची अंमलबजावणी करत असताना प्रत्येक शहरासाठी ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज जर मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाले तर प्राध्यान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी “लॉटरी” पध्दतीचा अवलंब करुन महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
पिंक ई-रिक्षाचे स्पेसिफिकेशन्स :
कोम्पोंनंट्स | स्पेसिफिकेशन्स |
किंमत (Including all Tax-s) | कमाल 4 लाख रुपये |
मोटार कॅपॅसिटि | 10 एचपी |
मायलेज /चार्ज | किमान 110 कि.मी. |
सिटर | 3+1 (Driver) |
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजनेच्या अटी व शर्ती I Terms and Conditions :
- या योजनचा लाभ महिलेला एकदाच घेता येणार आहे.
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ लाभार्थी महिलेने घेतलेला नसावा.
- अर्जदार महिला कर्जबाजारी नसणे आवश्यक आहे.
- कर्ज परतफेड करण्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजनेअंतर्गत मिळालेली रिक्षा लाभार्थी महिलेने चालवणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेस मिळालेली पिंक रिक्षा जर पुरुष चालवताना आढळला तर त्याच्यावर कारवाही करण्यात येईल.
- महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या रिक्षाची देखरेख आणि दुरुस्थी याची पूर्णतः जबाबदारी लाभार्थी महिलेची असणार आहे ,त्यासाठी राज्य शासनाकडून कुठलीच वाढीव रक्कम दिली जाणार नाही.
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत:
- अर्ज करण्यास इच्छुक असणार्या महिलेने महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजनेचा अर्ज घ्यावा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून सोबत आवश्यकत कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा शासन निर्णय : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |
Advertisement