Mahavitran Osmanbad Recruitment 2022 | उस्मानाबाद महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा

उस्मानाबाद महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Advertisement

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या १५० जागा


संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) पदाच्या जागा

 

  • वर्ष २०२२ – २०२३ करीता आय.टी.आय. विजतंत्री (Electrician) ट्रेड ६५ पदे, तारतंत्री (Wireman) ट्रेड ६५ पदे व संगणक चालक (COPA) ट्रेड २० पदे NCVT उत्तीर्ण झालेल्या (१०+२ या आकृतीबंधामधील) उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) एकूण १५० पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत.

 

  • Apprentice Portal वरील म.रा.वि.वि.के. मर्या. मंडळ उस्मानाबाद E05202702563 या आस्थापनेवर ऑनलाइन अर्ज भरून दि. १५.११.२०२२ ते १७.११.२०२२ या कालावधीमध्ये सकाळी ११.०० ते दु.४.०० या वेळेत सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह (इयत्ता १० वी चे गुणपत्रक व सनद, आयटीआय गुणपत्रक व सनद, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, Apprentice Registration प्रत व पासपोर्ट साईज फोटो सह) प्रत्यक्ष मंडळ कार्यालय येथे वरील तारखेस सादर करावेत.

 

  • उमेदवाराची निवड आय. टी. आय. च्या ०४ सत्राच्या (Semester) मिळालेल्या एकूण गुणाच्या सरासरीनुसार, तसेच महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे असलेल्या | आरक्षणानुसार निवड करण्यात येईल.

 

  • उमेदवाराने लोकप्रतिनिधी अथवा राजकीय व्यक्तीकडून दबाव आणल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारास राहतील.

 

  •  निवड झालेल्या पात्र उमेदवारांची प्राथमिक पडताळणी यादी दि. २९.११.२०२२ रोजी मंडळ कार्यालय उस्मानाबाद येथील नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात येईल. व निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्र छाननी करिता येण्याची पुढची तारीख कळविण्यात येईल. सदर दिवशी निवड झालेला उमेदवार हजर न राहिल्यास अशा उमेदवाराचा प्रशिक्षणार्थी भरती करिता विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

 

  •  सदर प्रक्रिया हि उस्मानाबाद जिल्ह्यातीलच उमेदवारांसाठी मर्यादित आहे याची

नोंद घ्यावी.

  •  भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकारास राहील.

 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

 

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहिती साठी जाहिरात बघा – LINK 
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment