Mahila Bachat Gat Drone Yojana | महिला बचत गट ड्रोन योजना

केंद्र सरकारतर्फे तसेच राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या उद्दिष्टाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना महिला बचत गट ड्रोन योजना, या योजनेबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत…

Advertisement

 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळांने महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

– यासाठी 1261 कोटी इतका निधी सुद्धा निश्चित कालावधीसाठी मंजूर केला आहे. 

– महिला स्वयंसहायता बचत गटांना ड्रोन पुरवणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

– निश्चित केलेल्या कालावधीमध्ये म्हणजेच 2023-24 ते 2025-2026 शेतीसाठी शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन पुरवण्यात येणार असून यासाठी 15000 निवडक बचत गटांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

– या योजनेचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन मार्फत नवीन तंत्रज्ञान आणि तसेच महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे हे सुद्धा आहे

– शेतीच्या कामांचा खर्च कमी करण्यासाठी, पिक उत्पादन वाढवण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी अध्याय व तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महिला बचत गट ड्रोन योजना उपयुक्त ठरू शकते.

महिला बचत गट ड्रोन योजना उद्दिष्टे | Objectives – 

– महिला बचत गट ड्रोन योजना योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग, महिला स्वयंसहाय्यता गट आणि प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नांची सांगड घालून  करून समग्र  चालना  देते.

– या योजनेमार्फत आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य ते क्लस्टर्स  शोधून काढून,विविध राज्यांतील अशा क्लस्टर्समध्ये असलेले प्रगतीशील 15,000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल.

– ड्रोनच्या किमतीच्या 80% इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने /अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल 8 लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत.

– अहर्ताप्राप्त व 18 आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड ही राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी यांच्या द्वारे 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल .ह्या प्रशिक्षणामध्ये 5 दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण तर अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. 

– त्याच बरोबर स्वयंसहाय्यता बचत गटातील इतर सदस्य किंवा कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती, फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची आवड आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञ/सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाईल.  हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाईल.

– ड्रोन कंपन्यांद्वारे ड्रोन खरेदी करण्यात, ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस (मध्यस्थ) म्हणून एलएफसी काम करतील.

– एलएफसीज द्वारे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी यांसारख्या नॅनो खतांच्या स्वयंसहायता बचत गटांसोबत ड्रोनद्वारे वापराला प्रोत्साहन देतील.स्वयंसहाय्यता बचत गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देऊ करतील.

अधिक महितीसाठी : येथे क्लिक करा 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment