Mahila Swayamsiddhi Vyaaj Partava Yojana

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना | Mahila Swayamsiddhi Vyaaj Partava Yojana –

     सरकारतर्फे जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात त्यापैकी काही योजना महिलांच्या विकासासाठी, त्यांना स्वावलंबी बनता यावे, स्वतःच्या पायावर उभा राहता यावे यासाठी सुद्धा असतात त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना. या योजनेबद्दलच अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत –

Advertisement

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना | Mahila Swayamsiddhi Vyaaj Partava Yojana –

–  इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिला, काम करू इच्छिणाऱ्या महिला, परितक्त्या महिलांचे आर्थिक तसेच सामाजिक दृष्ट्या सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

– महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत बचत गटामधील महिलांना वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया किंवा मूल्य आधारित उद्योगांकरता बँकेमार्फत पाच ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते आणि या कर्ज रकमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादेपर्यंतचा व्याज परतावा हा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिला जाणार आहे.

– या योजनेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (सी एम आर सी) मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटामध्ये कमीत कमी 50 टक्के महिला या इतर मागास प्रवर्गांमधील असाव्यात म्हणजेच तोच बचत गट या योजनेसाठी पात्र असेल.

– महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येते.

– महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजने अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही महिला बचत गटाच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येते.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना लाभार्थी पात्रता –

Eligibility for Mahila Swayamsiddhi Vyaaj Partava Yojana –

– अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

– महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजनेचा लाभ महिला बचत गटामधील इतर मागास प्रवर्गामधील महिलांना दिला जाईल.

– अर्जदार महिलेची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षा दरम्यान असावी.

– अर्जदार महिलेने यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले असल्यास त्या कर्जाची परतफेड केल्याचे प्रमाणपत्र / स्वयं-घोषणा /प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

– एका कुटुंबामधील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

– अर्जदार महिला ही बँक किंवा वित्त संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.

– अर्जदार महिलेला ती सुरू करू इच्छित असणाऱ्या व्यवसायाबद्दलची माहिती म्हणजेच एकंदरीत रूपरेषा असणारी माहिती सादर करणे गरजेचे आहे ,ही माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Mahila Swayamsiddhi Vyaaj Partava Yojana

– पासपोर्ट साईज फोटो

– रेशन कार्ड

– आधार कार्ड

– जातीचा दाखला

– जन्म दाखला

– रहिवासी दाखला

– बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स

– स्वयंघोषणापत्र

– मोबाईल नंबर

– बचत गटामधील महिला सदस्यांचे सी एम आर सी कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्न बाबतचे प्रमाणपत्र

– जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याची माहिती

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेसाठी अर्ज | Application for Mahila Swayamsiddhi Vyaaj Partava Yojana –

 अर्ज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा पातळीवरील  लोकसंचालित साधनकेंद्र ( CMRC – COMMUNITY MANAGED RESOURCE CENTRE )  यांच्याकडे करावा लागेल.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment