मकर संक्रांति स्पेशल बिझनेस आयडिया | Best Makar Sankranti special business ideas –

    आपल्या भारत देशामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदामध्ये साजरे केले जातात. वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांति. बरेच जणांना आपण नेहमी करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसाय सोबतच सीजनल बिजनेस करायला सुद्धा आवडते आणि त्याद्वारे चांगली कमाई सुद्धा होते. आजच्या लेखामध्ये आपण मकर संक्रांतीसाठी कोणते व्यवसाय सुरू करू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर जाणून घेऊयात मकर संक्रांति स्पेशल बिझनेस आयडिया (Makar Sankranti special business ideas)

Advertisement

– मकर संक्रांतीच्या बऱ्याच दिवस आधीपासूनच पतंग उडवली जातात.

– त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग, पतंग उडवण्यासाठी लागणारा दोरा यांसारख्या साहित्याचा स्टॉल म्हणजेच पतंगाचे दुकान आपण सुरू करू शकतो.

– बऱ्याच जणांना पतंग उडवणे फार आवडते. चांगल्या रीतीने पतंग उडवणे ही सुद्धा एक कलाच आहे, म्हणूनच अशा पतंगप्रेमींसाठी पतंग उडवण्याचे कार्यक्रम किंवा स्पर्धा आयोजित करू शकता.

– त्यासाठी काही नोंदणी फी ठेवू शकता आणि विजेत्यांस बक्षीस सुद्धा ऑफर करा.

– ज्या ठिकाणी तुम्ही पतंग उडवण्याचे कार्यक्रम घेणार आहात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वेगवेगळे स्टॉल्स उदाहरणार्थ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पतंगाचे स्टॉल्स किंवा इतर स्टॉल्स लावू शकता.

फोटोग्राफी स्टॉल सुद्धा या ठिकाणी लावू शकता म्हणजेच ज्यांना पतंग उडवताना किंवा इतरही फोटोज काढून हवे असतील त्यांना योग्य दरामध्ये फोटो काढून देऊ शकता. काही लोकांना वाटेल की सध्या मोबाईलच्या जमान्यामध्ये अशा स्टॉलवरून कोण फोटो काढून घेईल ..परंतु तसे नसून आजही कित्येक लोकांना चांगल्या क्वालिटीचे फोटोग्राफर करून फोटो काढून घेणे आवडते.

– मकर संक्रांतीच्या वेळी तिळाच्या लाडूंना त्याचबरोबर तिळाची चिक्की, तिळगुळ यांसारख्या पारंपारिक मिठाईला खूप महत्त्व आहे, थंडीचे दिवस असल्यामुळे तिळगुळ खाणे हे शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असते.

– म्हणूनच अशा पारंपारिक मिठाई तुम्ही स्वतः बनवू शकता, त्यामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटी नुसार वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करू शकता.

– तुम्ही तयार केलेले स्वीट्स किंवा इतर स्नॅक्स आकर्षक अशा बॉक्समध्ये पॅक करून विक्रीसाठी ठेवू शकता.

– अशा रीतीने हा व्यवसाय सुद्धा फायदेशीर ठरू शकतो कारण बरेच लोक स्वतः घरासाठी किंवा इतर लोकांना गिफ्ट देण्यासाठी हा पर्याय निवडू शकता.

   विविध सांस्कृतिक वर्कशॉप घेऊ शकतात मग त्यामध्ये

– पतंग कसा बनवला जातो हा वर्कशॉप

 – तुम्हाला जर उत्तम रित्या रांगोळी काढता येत असेल तर रांगोळी आर्ट वर्कशॉप घेऊ शकता

– तुम्हाला जर उत्तम रित्या स्वयंपाक बनवता येत असेल तर ट्रॅडिशनल कुकिंग क्लास

– कल्चरल क्वीज

– तुम्हाला जर उत्तमरीत्या फोटोग्राफी येत असेल तर फेस्टिवल फोटोग्राफी वर्कशॉप घेऊ शकता

– त्याचबरोबर पारंपारिक अटायर ड्रेपिंग वर्कशॉप ( यामध्ये पारंपारिक पद्धतीने साडी कशी नेसली जाते मग त्यामध्ये नऊवारी साडी किंवा इतर साड्यांचे प्रकार यांचा समावेश करू शकता )

– वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तू बनवणे ( art and craft workshop )

– आपल्याकडे प्रत्येक सणासुदीच्या वेळी सजावट हमखास केली जाते म्हणूनच सजावटीच्या सामानाचे दुकान तुम्ही लावू शकता.

– सजावटीच्या सामानामध्ये रांगोळी ,तोरण, इतर मकर संक्रांति संबंधित सजावटीचे सामान तुम्ही त्या दुकानामध्ये ठेवू शकता.

– मकर संक्रांतीच्या वेळी आपल्याकडे ” सुगड ” पुजली जातात, ती सुद्धा आपण या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवू शकतो.

– त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारे इतर सामान म्हणजे बोरं, ऊस,हरभरा…. सुद्धा विक्रीसाठी ठेवू शकता.

    अशा रीतीने मकर संक्रांतीच्या वेळी दहा ते पंधरा दिवस हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आणि त्याद्वारे चांगली कमाई करता येऊ शकते. व्यवसाय करत असताना पारंपारिक गोष्टी सोबतच काही आधुनिक वस्तू सुद्धा विक्रीसाठी ठेवू शकता. हे व्यवसाय करत असताना व्यवसायासाठी आपण योग्य ठिकाण निवडणे त्याचबरोबर योग्य होलसेलर कडून किंवा मॅन्युफॅक्चरर कडून आपण विक्री करणाऱ्या मालाची खरेदी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर थोडासा मार्केट रिसर्च करून इतर दुकानदार त्यांच्याकडील सामान किती किमतीमध्ये विकतात, ते जेवढ्या किमतीमध्ये सामान विकतात तशी सामानाची क्वालिटी आहे की नाही हे देखील बघितले पाहिजे आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये योग्य ते सामान म्हणजेच क्वालिटी असणारे सामान योग्य त्या दरामध्ये विकले पाहिजे. असे केल्यामुळे ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचे सामान योग्य त्या दरामध्ये मिळत असल्याने आपल्याकडून सामानाची खरेदी होण्याचे चान्सेस वाढतात. अशा रीतीने काही छोट्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून आपण आपला व्यवसाय यशस्वी करू शकतो.

खतांचा व्यवसाय
⭕ Fertilizer business
जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/winter-skin-care/?amp=1

Advertisement

Leave a Comment