Micro SIP scheme | मायक्रो एस आय पी स्किम | SBI Launches ₹250 Micro SIP Scheme | एसबीआय ने लॉंच केली आहे 250 रुपयांची मायक्रो एसआयपी योजना | Best SIP Schemes 2025
छोटी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी SBI म्युच्युअल फंडाने एक नवीन मोठी घोषणा केली आहे. त्यांनी जननिवेश एसआयपी नावाची मायक्रो एसआयपी योजना सुरू केली आहे. या मार्फत इच्छुक गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ₹ 250 प्रमाणे सुरू करू शकतात. मर्यादित बचत असलेल्या लोकांसाठी त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्याचा हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो असे म्हणता येईल. कॉलेजमध्ये शिकत असणारे विद्यार्थी ज्यांना आपल्या पॉकेट मनी मधून बचत करायचे आहे आणि कुठेतरी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे.
Micro SIP scheme | मायक्रो एस आय पी स्किम | SBI Launches ₹250 Micro SIP Scheme | एसबीआय ने लॉंच केली आहे 250 रुपयांची मायक्रो एसआयपी योजना | Best SIP Schemes 2025
Table of Contents
मायक्रो एसआयपी (Micro SIP scheme ) म्हणजे काय?
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये नियमित अंतराने गुंतवण्याचा एक मार्ग आहे. ते दर महिन्याला किंवा प्रत्येक तिमाहीत असू शकते. एकाच वेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याचा धोका सुद्धा मायक्रो एसआयपी मुळे कमी होतो.
मायक्रो एसआयपी ही एस आय पी ची छोटी आवृत्ती आहे, असे म्हणू शकतो.
मायक्रो एसआयपी लोकांना अगदी कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्यास परवानगी देते.
SBI ची नवीन योजना इच्छुक गुंतवणूकदारांना ₹250 इतकी कमी गुंतवणूक करू देते.
सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की ₹२५० एसआयपी (Micro SIP scheme ) हे त्यांचे स्वप्न होते. या प्रकारच्या छोट्या एसआयपीमुळे अनेकांना गुंतवणूक सुरू करण्यास मदत होऊ शकते. हे विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे त्यांच्या खिशातील पैशातून लहान रक्कम वाचवतात, जसे की विद्यार्थ्यांसाठी.
SBI ची कमिटमेंट :
SBI चे अध्यक्ष C.S. सेट्टी यांनी मजबूत अशी कमिटमेंट दिली आहे. ते म्हणाले की ,ही SIP पूर्णपणे मोफत असेल. व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यांच्या ग्राहकांना मोफत सेवा देण्याचा त्यांचा हेतू आहे. हे अधिक लोकांना बचत करण्यास प्रोत्साहित करू शकेल. .
SBI मायक्रो SIP (Micro SIP scheme ) ची प्रमुख वैशिष्ट्ये :
कमी गुंतवणूक: फक्त ₹२५० पासून सुरुवात करा.
विनामूल्य: कोणतेही व्यवहार शुल्क नाही.
प्रवेशयोग्य ( Accessible ) :SBI YONO आणि पेटीएम ,grow, zerodha सारख्या इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.
सध्या यासाठी उपलब्ध: SBI बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
एस आय पी या विषयावर विविध ब्लॉग्स आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत परंतु एसआयपीचे फायदे थोडक्यात पुढील प्रमाणे आहेत :
SIP द्वारे गुंतवणुकीचे फायदे
SIP तुम्हाला नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवण्याची परवानगी देतात. जेव्हा मार्केट खाली असते तेव्हा तुम्ही अधिक युनिट्स खरेदी करता. जेव्हा मार्केट वाढते तेव्हा तुम्ही कमी युनिट्स खरेदी करता. हे तुमच्या गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढते.
कम्पाउंडिंगची पॉवर: कालांतराने तुमची गुंतवणूक वाढत जाते. तुम्ही कमावलेल्या रिटर्न्समधूनही रिटर्न मिळू लागतात. ही चक्रवाढीची शक्ती आहे, जी तुमचे पैसे जलद वाढण्यास मदत करते.
SIP तुम्हाला नियमित बचत करण्यास प्रोत्साहित करतात. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीसाठी शिस्तबद्ध दृष्टीकोन तयार करण्यात मदत होते.
SIP सेट करणे सोपे आहे. तुम्ही तुमची गुंतवणूक ऑटोमॅटिक करू शकता. नियमित अंतराने तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जातात.
वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते जसे की घर विकत घेणे असो, सेवानिवृत्तीचे नियोजन असो किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी देणे असो, SIP तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने व्यवस्थित रित्या काम करण्यास मदत करू शकते.
उदाहरण
गुंतवणूकदार 25 वर्षांच्या गुंतवणूक कालावधीसाठी 250 रुपयांच्या मासिक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करतो आणि 13% परतावा अपेक्षित आहे असे गृहीत धरू तर
अपेक्षित रक्कम : 499120 रुपये ( 5 लाख)
गुंतवणूक केलेली एकूण रक्कम : 75000 रुपये
वेल्थ गेन : 424120 रुपये (4.2 लाख)
जर ही एसआयपी 30 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर 9.4 लाख रुपये आणि 35 वर्षापर्यंत सुरू ठेवल्यास 17.5 लाख रुपये सुद्धा मिळू शकतात.