Mobile Cover  Printing Business| मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस | Best Business Ideas 2024

Mobile Cover  Printing Business| मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस – 

   हल्ली मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे,कदाचित मोबाईल शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीणच आहे. मार्केट मध्ये नवनवीन मोबाईल्स येत असतात आणि मोबाईल प्रेमी सुद्धा मोबाईल घ्यायला अजिबात संकोच करत नाहीत. परंतु मोबाईल खरेदी केल्यानंतर त्या मोबाईलचे प्रोटेक्शन करण्यासाठी मोबाईल कव्हर मात्र नक्की आवश्यक असतो. सुरुवातीला ज्यावेळी मोबाईल कव्हर्स यायचे तेव्हा त्यामध्ये विविध टाइप्स किंवा विविध डिझाईन्स नसायच्या परंतु हल्ली अतिशय सुरेख अशा मोबाईल कव्हर डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा ज्याला हवे असेल ती व्यक्ती पर्सनलाईजड मोबाईल कव्हर्स सुद्धा डिझाईन करून घेते आणि म्हणूनच मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस ( Mobile Cover  Printing Business ) सध्या खूप डिमांडींग आहे या व्यवसायाबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement
Mobile cover printing business
Mobile cover printing business

*फायदे | Benefits –

– मोबाईल कव्हर्स हे आकाराने लहान असल्यामुळे स्टोरेज साठी अगदी कमी जागा लागते त्यामुळे घरामधून सुद्धा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

– त्याचबरोबर मोबाईल कव्हर्स जर होलसेलर कडून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केले तर कमी किमतीमध्ये आपल्याला मिळू शकतात त्यामुळे प्रॉफिट मार्जीन सुद्धा जास्त राहू शकतो.

– ऑफलाइन मार्केट सोबतच ऑनलाईन मार्केटमध्ये सुद्धा मोबाईल कव्हर जास्त डिमांडिंग असल्यामुळे या व्यवसायाला जास्त स्कोप आहे.

– सुरुवातीला कमी गुंतवणूक करून सुद्धा या व्यवसायामध्ये चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.

– हा व्यवसाय पार्ट टाइम सुद्धा सुरू केला जाऊ शकतो.

१ . मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस प्लॅन | Mobile Cover Printing Business plan –

मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस साठी सुरुवातीला व्यवसाय योजना तयार करा त्यामध्ये..

– हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात ?

– या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करणार आहात ?

– या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक मशीन किंवा इतर सामग्री?

– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते परवाने किंवा नोंदणी आवश्यक आहे?

– या व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल ?

– कुठल्या डिवाइस वर आपण फोकस करणार आहात तसेच कोणते मोबाईल कव्हर्स किंवा डिझाईन्स कसे करणार आहात

यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश होईल.

२ . व्यवसायाचे ठिकाण | location for mobile cover printing business –

– सुरुवातीला मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर घरामधून सुद्धा सुरू केला जाऊ शकतो आणि ऑनलाइन पद्धतीने व्यवस्थित रित्या मार्केटिंग करून हा व्यवसाय व्यवस्थित चालवला जाऊ शकतो.

– परंतु जर जास्त गुंतवणूक करायची असेल आणि मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मोबाईल मार्केटच्या ठिकाणी किंवा आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या ठिकाणी, या बिझनेसला ज्या ठिकाणी स्कोप असेल त्या ठिकाणी हा बिजनेस सुरू करू शकतो.

३ . मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेससाठी आवश्यक परवाने आणि नोंदणी | Registration and Licence required for Mobile Cover Printing Business –

– मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेस मोठ्या प्रमाणावर सुरू करणार असाल तर यासाठी आपल्या व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर जीएसटी रजिस्ट्रेशन किंवा इतर आवश्यक परवाने काढून घेणे आवश्यक असेल.

४. सप्लायर किंवा होलसेलरची निवड आणि आवश्यक मशिनरी | Selection of supplier or wholesaler and required machinery –

– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोबाईल कव्हर किंवा फोन केसेस निर्माता किंवा सप्लायर किंवा होलसेलर शोधणे आवश्यक आहे आणि योग्य निवड करण्यासाठी फोन केसेसचे प्रकार, त्यांची गुणवत्ता, दर त्याचबरोबर कमीत कमी किती ऑर्डर द्यावी लागते ,शिपिंगचा खर्च या सर्व गोष्टी लक्षात घेऊ शकता.

– तुम्हाला आवश्यक असलेल्या मशिनरीमध्ये हीटिंग प्रेस, सबलिमेशन मोल्ड्स, व्हाईट बॅक केस, ट्रान्सफर पेपर, लॅपटॉप यांचा समावेश असेल.

५ . मोबाईल कव्हर प्रिंटिंग व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी | Important points for mobile cover printing business –

* Mobile कव्हर प्रिंटिंग व्यवसायासाठी आकर्षक असे ब्रॅण्ड नेम निवडा.

* मोबाईल कव्हर वर कोणत्या प्रकारच्या डिझाइन्स आपण बनवून देऊ शकतो हे ठरवा.

*मोबाईलच्या कव्हर कॉलिटी नुसार आणि डिझाईन नुसार योग्य तो दर ठरवा.

*ऑनलाइन ऑर्डर असेल तर मोबाईल कव्हर कसा डिलिव्हर करता येईल यासाठी सुद्धा पर्याय शोधा.

६ . मोबाईल कव्हर प्रिंटिंग व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी | Marketing of Mobile Cover Printing Business –

– मोबाईल कव्हर प्रिंटिंग व्यवसायाची मार्केटिंग ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येऊ शकते.

– या व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग पद्धत वापरू शकतो त्याचबरोबर वेबसाईट तयार करून त्यावर सुद्धा मोबाईल कव्हर प्रिंटिंग व्यवसायाची मार्केटिंग करता येऊ शकते.

– विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर सुद्धा मोबाईल कव्हरची लिस्टिंग करता येऊ शकते तसेच पर्सनलाईज मोबाईल कव्हर बनवून देऊ अशी ऍड सुद्धा करता येऊ शकते.

– विविध एक्जीबिशन्स असतात त्या ठिकाणी सुद्धा या व्यवसायाची चांगली मार्केटिंग करता येऊ शकते तसेच स्टॉल्स सुद्धा लावू शकतो.

    अशा रीतीने मोबाईल कव्हर प्रिंटिंग व्यवसाय ( Mobile Cover Printing Business ) सुरू करता येऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment