Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना | महिलांना महिन्याला मिळणार १५०० रुपये…
आपल्या देशामध्ये तसेच राज्यामध्ये विविध योजना वेगवेगळ्या हेतूने राबवल्या जात असतात, या योजनांमध्ये काही योजना व्यवसायासाठी असतात ,काही योजना महिलांसाठी असतात तर इतरही अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती योजना खास महिलांसाठी असून या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये केली आहे आणि ही योजना आहे ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ( Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana )”.
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना –
Table of Contents
– मुलींना व महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी हातभार लागावा यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने 26 जानेवारी 2023 पासून ‘लाडली बहना योजना’ सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला एक हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. अशाच प्रकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
– अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी 46 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेची जुलै 2024 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता –
– अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
– महाराष्ट्र राज्यांमधील विवाहित, घटस्फोटीत, निराधार आणि परित्यक्त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी वयाची किमान अट 21 वर्षे पूर्ण आणि कमाल 60 वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच वयाच्या साठ वर्षापर्यंत असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला पात्र आहेत.
कोण अपात्र ठरेल ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुढील गोष्टी असणाऱ्या महिला पात्र नसणार आहेत :
१. ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकूण एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
२. ज्या कुटुंबामधील सदस्य आयकर दाता आहेत त्या कुटुंबांमधील महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
४. ज्या महिला शासनाच्या इतर आर्थिक योजनांद्वारे १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला पात्र ठरणार नाहीत.
५. ज्या महिलांच्या कुटुंबांमधील व्यक्ती विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.
६. ज्या महिलांच्या कुटुंबांमधील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही
७. ज्या महिलांच्या कुटुंबांमधील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
८. ज्या महिलांच्या कडे किंवा कुटुंबीयांकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
* सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana documents | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आवश्यक कागदपत्रे –
– आधार कार्ड
– महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
– सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
– बँक अकाउंट पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यासाठीचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.
– या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
– ऑनलाइन अर्ज करता येत नसल्यास अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रामध्ये तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
– भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती दिली जाईल.
– अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल.
– अर्जदार महिलेने स्वतः प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून अर्जदार महिलेचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी पुढील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.