मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana | CM Vayoshree Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी…|Best Government schemes 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana | CM Vayoshree Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी…

    केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे जनतेच्या हितासाठी विविध योजना वेगवेगळ्या उद्दिष्टांनी राबवल्या जात असतात त्यामध्ये काही योजना उद्योजकांसाठी असतात तर काही योजना महिलांसाठी असतात तर काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात तर इतरही अनेक योजना असतात. भारतामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना ही योजना सुरू होती आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshree Yojana) या योजनेस मान्यता मिळालेली आहे, या योजनेसाठी अर्ज सुद्धा कदाचित लवकरच सुरू होऊ शकतात. या योजनेबद्दलच अधिक माहिती जाणून घेऊया…

Advertisement

– महाराष्ट्र राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी योजना “मुख्यमंत्री वयोश्री योजना ” या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

– 5 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. 

–  राष्ट्रीय वयोश्री योजना ही केंद्राची योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते,परंतु मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामधील सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येईल.

– मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आणि 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लाभ होणार आहे.

– ज्येष्ठांमध्ये अशक्तपणा तसेच अपंगत्व यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करणे तसेच ज्येष्ठांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.

–  ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य विभागांमार्फत सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

– मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता निकष असे असू शकतात | Mukhyamantri Vayoshree Yojana Eligibility criteria –

– अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

– काही शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेले ज्येष्ठ नागरिक पात्र असावेत.

 – अर्जदाराचे किमान वय 65 वर्षे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत मिळणारा लाभ | Mukhyamantri Vayoshree Yojana Benefits –

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत महाराष्ट्रामधील 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली जाईल आणि जे पात्र आढळतील त्यांना 3,000 रु. मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज | Mukhyamantri Vayoshree Yojana Application –

5 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे,त्यामुळे अर्जा बद्दल माहिती अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. कदाचित लवकरच मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील ,पात्रता काय याबद्दलची माहिती कळू शकेल.

⭕ लखपती दीदी योजना 

⭕जाणून घ्या या योजनेबद्दल अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/lakhpati-didi-yojana/?amp=1

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version