What is mutual fund ?  म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार ? Best investment ways 2024

What is mutual fund ?  म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार ?

       आजच्या ब्लॉगमध्ये आपण म्युच्युअल फंड ( mutual fund ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच लोकांनी हा शब्द तर ऐकलेला आहे परंतु म्युच्युअल फंड म्हणजे नेमकी काय? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची? असे प्रश्न बऱ्याच व्यक्तींना असतील. म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये आपण म्युच्युअल फंड ( Mutual Fund ) ही सर्व माहिती बघणार आहोत…

Advertisement

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? What is mutual fund ?

mutual fund

– म्युच्युअल फंडस् म्हणजे अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड होय. या फंडमध्ये गुंतवलेले पैसे विविध ठिकाणी गुंतवण्यासाठी वापरले जातात आणि गुंतवणूकदाराला त्याच्या रकमेमधून जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न केला जातो.

– म्युच्युअल फंड हा एएमसी  ( AMC – Asset Management Company ) म्हणजेच मालमत्ता व्यवस्थापन कंपनी द्वारे चालवला जातो. 

– अनेक लोकांनी गुंतवलेला पैसा म्युच्युअल फंडा मार्फत विविध ठिकाणी गुंतवला जातो जसे की शेअर्स, बॉण्ड, इक्विटी,सोने आणि इतर.

– फंड मॅनेजर हा सुरक्षित पद्धतीने फंड विविध ठिकाणी गुंतवतो आणि त्या बदल्यात गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.

– भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट वर लक्ष ठेवण्यासाठी रेग्युलेटर असतो आणि ते म्हणजेच सेबी ( SEBI – Securities and Exchange Board of India).

 – जी व्यक्ती म्युच्युअल फंडची संकल्पना आणते तसेच सुरुवात करते त्या व्यक्तीला म्युच्युअल फंडमध्ये स्पॉन्सर ( प्रमोटर ) म्हणतात.

उदाहरणार्थ, एचडीएफसी ने सुरु केलेला एचडीएफसी म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड कसे कार्य करते ? How mutual fund works ?

– समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करायचे आहे परंतु त्या शेअरची किंमत 20 हजार रुपये आहे परंतु त्या व्यक्तीकडे गुंतवणूक करण्यासाठी एवढी रक्कम उपलब्ध नाही. मग अशावेळी म्युच्युअल फंड फायदेशीर ठरते ते कसे तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता पडत नाही. अगदी 500रुपये पासून सुद्धा गुंतवणूक केली जाऊ शकते. म्युच्युअल फंड काय करते तर अनेक गुंतवणूकदारांकडून 500 रुपये प्रमाणे पैसे जमा करून अशा मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा किंवा नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करते.

म्युच्युअल फंड बद्दल अजून काही..I Mutual fund information –

– पैसे गुंतवणूक करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत त्यामध्ये सेविंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट, प्रॉपर्टी, गोल्ड, स्टॉक मार्केट इतरही अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गामध्ये गुंतवणूक करताना तीन मुद्दे खूप महत्त्वाचे असतात : 

– रिस्क 

– टाईम 

– रिटर्न्स 

– गुंतवणुकीच्या विविध मार्गांमधून येणारे रिटर्न्स कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतात परंतु असे म्हणतात की रिस्क आणि टाईम जेवढा जास्त तेवढे रिटर्न्स जास्त… उदाहरणार्थ सेविंग अकाउंट मध्ये रिस्क कमी असते तर रिटर्न्स सुद्धा कमी असतात.

– काही लोक पैशांची बचत करणे म्हणजे पैसे बँकेमध्ये तसेच ठेवणे असे समजतात परंतु चलनवाढीचा दर जसजसा वाढत राहतो तसतशी त्या पैशांची किंमत कमी होत राहते म्हणूनच पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे आणि या गुंतवणुकीमध्ये येणारे रिटर्न्स नक्कीच चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त असावेत.

– गुंतवणूक करत असताना एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता गुंतवणुकीच्या विविध मार्गांमध्ये गुंतवणूक केलेली चांगली कारण एकाच ठिकाणी गुंतवणूक केली आणि जर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर आपले पैसे गमावण्याची शक्यता असते त्यापेक्षा विविध ठिकाणी गुंतवणूक केलेली चांगली आणि यालाच “डायव्हर्सिफिकेशन” असे म्हणतात. 

– अशीच विविध ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी आपल्याला मिळते ती म्युच्युअल फंड मार्फत… ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्युच्युअल फंड मार्फत अनेक लोकांनी जमा केलेल्या पैशांची गुंतवणूक एक्स्पर्टच्या सल्ल्यानुसार योग्य ठिकाणी करते आणि मिळालेल्या परताव्यामधील छोटीशी रक्कम ( अंदाजे १-२ टक्के ) स्वतःकडे ठेवते आणि उर्वरित सर्व रक्कम गुंतवणूकदारांना परताव्यासहित परत करते. 

– एचडीएफसी, एचएसबीसी, आयसीआयसीआय, आदित्य बिर्ला, रिलायन्स, टाटा, ह्या काही कंपन्या आणि बँकांची उदाहरणे आहेत ज्यांनी स्वतःची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी सुरू केली आहे.

– प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी विविध म्युच्युअल फंड सुरू करते उदाहरणार्थ आयसीआयसीआय बँक ने 1200 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड सुरू केले आहेत.

– आपण कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो त्यावरून आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकते हे ठरते.

म्युच्युअल फंड 4%-30% पर्यंत रिटर्न्स देऊ शकतात.

म्युच्युअल फंडचे प्रकार | types of mutual fund –

– ए एम सी मधील एक्सपर्ट्स कुठे कुठे इन्व्हेस्ट करत आहेत यानुसार विविध म्युच्युअल फंड्स असतात परंतु बेसिकली म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत :

१. इक्विटी म्युच्युअल फंड 

२. डेट म्युच्युअल फंड 

३. हायब्रीड म्युच्युअल फंड

१. इक्विटी म्युच्युअल फंड –

– इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. 

– या ठिकाणी रिस्क सुद्धा जास्त असते आणि रिटर्न्स सुद्धा जास्त असतात.

A. लार्ज/ स्मॉल/ मिड कॅप इक्विटी फंड्स –

जर या ठिकाणी पैसे मोठ्या कंपनीमध्ये इन्वेस्ट करत असू तर त्याला लार्ज कॅप इक्विटी फंड्स म्हणतात, छोट्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असल्यास स्मॉल कॅप इक्विटी फंड्स म्हणतात आणि याच प्रकारे मध्यम कंपनीमध्ये गुंतवणूक करत असल्यास मिडकॅप इक्विटी फंड्स असतात.

पॅरामीटरलार्ज कॅपमिडकॅपस्मॉल कॅप
रिस्क (नेगेटिव्ह रिटर्न्स येण्याची शक्यता )कमी जास्त खूप जास्त
जास्त रिटर्न्स येण्याची शक्यताकमी जास्त जास्त
लिक्विडीटी खूप चांगली चांगली कमी
कंपनी इन्फॉर्मशन उपलब्धता खूप चांगलीचांगलीकमी
B.डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड –

लार्ज/ स्मॉल/ मिड कॅप अशा सर्व कंपन्यांमध्ये थोडी गुंतवणूक केली जाते यालाच डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड असे म्हणतात.

C. इक्विटी लिंकड सेविंग स्कीम ( ELSS ) –

या प्रकारामध्ये आपण दीड लाखांपर्यंत टॅक्स वाचवू शकतो.

D. सेक्टर म्युच्युअल फंड –

स्पेसिफिक सेक्टरमध्ये गुंतवणूक केली जाते उदाहरणार्थ एग्रीकल्चरल सेक्टर, फार्मा सेक्टर आणि इतर. हे फंडस् जास्त रिस्की असतात कारण एकाच सेक्टर मधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जात आहे, त्यामुळे फायदा किंवा तोटा जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते.

E. इंडेक्स फंड्स –

हे फंड्स पॅसिवली मॅनेज होतात म्हणजे ह्या ठिकाणी ए एम सी मधील कुठलाही मॅनेजर किंवा इतर व्यक्ती हे मॅनेज करत नसून सेन्सेक्स किंवा निफ्टी निफ्टीनुसार थोडक्यात मार्केट नुसार हे वर खाली होत राहतात.

२. डेट म्युच्युअल फंड्स –

– डेट म्युच्युअल फंड्स डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इन्व्हेस्ट करतात.

– बॉण्ड्स, डीबेंचर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत.

A. लिक्विड फंड्स –

– जे फंड्स सहजरीत्या कॅश मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात त्यांना लिक्विड फंड्स म्हणतात.

– अगदी एक ते दोन दिवसांमध्ये हे लिक्विड फंड सहज रित्या कॅश मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. सेविंग अकाउंट आणि लिक्विड फंड्स बऱ्यापैकी सारखे आहे असे म्हणता येऊ शकते कारण या ठिकाणी सुद्धा कमी रिस्क असते.

B. गिल्ट फंड्स –

हे असे फंड्स आहेत की ज्यामध्ये गव्हर्मेंट इश्यूड बॉण्ड्समध्ये इन्व्हेस्ट केले जाते. यामध्ये सुद्धा कमी risk आहे कारण सरकार द्वारे हे पैसे घेतले जात आहेत.

C. फिक्सड मॅच्युरिटी प्लॅन –

– याला आपण एफडीचाच अल्टरनेटिव्ह समजू शकतो. कारण हा सुद्धा तितकाच कमी रिस्की असून एका स्पेसिफिक टाइम पिरियड साठी यामध्ये गुंतवणूक केली जाते.

३. हायब्रीड म्युच्युअल फंड्स –

– इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड्सचे मिक्चर म्हणजेच हायब्रीड म्युच्युअल फंड्स होय.

– काही लोकांना स्टॉक मार्केट सोबतच इतर ठिकाणी म्हणजेच डेट म्युच्युअल फंड्स मध्ये सुद्धा इन्वेस्ट करायचे असते तर अशावेळी हायब्रीड म्युच्युअल फंड्स उपयोगी ठरतात.

*विविध फॅक्टर्स नुसार mutual funds चे विविध प्रकार पडतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment