NHRC Winter Internship 2024 | एन एच आर सी इंटर्नशिप I Best Internships 2024
आजच्या ब्लॉगमध्ये आपण नॅशनल ह्युमन राइट्स कमिशन मार्फत जी इंटर्नशिप विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाते त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि ती इंटर्नशिप आहे, एन एच आर सी इंटर्नशिप ( NHRC Winter Internship 2024 ).
– मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या गरजेबद्दल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने , आयोग 1998 आणि 2000 पासून नियमितपणे हिवाळी ( winter ) आणि उन्हाळी ( summer ) इंटर्नशिप आयोजित केली जाते.
– 2024 या वर्षासाठी, 16 डिसेंबर 2024 (सोमवार) ते 10 जानेवारी 2025 (शुक्रवार) या कालावधीत चार आठवड्यांचा “विंटर इंटर्नशिप प्रोग्राम (WIP) 2024” सुरू होणार आहे, यासाठी देशातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) ज्या विद्यार्थ्यांनी 1ले वर्ष पूर्ण केले आहेत आणि 2 रे किंवा 3ऱ्या वर्षाचे एलएलबी (3 वर्षे) अभ्यासक्रम शिकत आहे असे विद्यार्थी या इंटर्नशिप साठी अर्ज करू शकतात.
2 ) ज्या विद्यार्थ्यांनी BA/BA LLB इत्यादीच्या 5 वर्षांच्या अभ्यासक्रमाची 3 वर्षे किंवा सेमिस्टर VI पूर्ण केलेले आहेत आणि चौथ्या आणि पाचव्या वर्षात शिक्षण घेत आहेत असे उमेदवार अर्ज करू शकतात.
3 ) L.L.M करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
4 ) पीजी डिप्लोमा इन ह्युमन राइट्स, एमए इन ह्युमन राइट्स, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक कार्य (MSW), क्रिमिनोलॉजी, सार्वजनिक प्रशासन, ग्रामीण विकास, इतिहास, अर्थशास्त्र, वाणिज्य, मानववंशशास्त्र, जनसंवाद, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेचा प्राधान्याने विचार केला जाईल त्यांच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
5 ) केवळ UGC मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या नियमित अभ्यासक्रमांचे विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी पात्र असतील.
6 ) विद्यार्थ्यांनी बारावी आणि त्यानंतरच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टरमध्ये किमान ६५% गुण प्राप्त केलेले असावेत.
7 ) अर्जदाराचे वय 1 नोव्हेंबर 2024 रोजी 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
8 ) दहावीपासून पुढील सर्व वर्षांसाठी प्रत्येक वर्षाच्या/सेमिस्टरसाठी गुणपत्रिकांच्या अटेस्टेड फोटोकॉपीज (हेड ऑफ डिपार्टमेंट, जेथे विद्यार्थी सध्या शिकत आहे) सादर करावयाच्या आहेत.
9) सर्व अर्जांसोबत शिफारस पत्र (LOR) सोबत असणे आवश्यक आहे ज्यात अर्जदार परिशिष्ट I नुसार शिक्षण घेत असलेल्या संस्थेच्या प्राचार्य / HOD / डीनचे नाव, स्वाक्षरी, तारीख आणि रबर स्टॅम्प / शिक्का असले पाहिजे.
10 ) SC/ST/OBC/PWD श्रेणीसाठी भारत सरकारच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरक्षण लागू केले जाईल. उमेदवाराने साक्षांकित जात प्रमाणपत्र / अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) जोडणे आवश्यक आहे. विशिष्ट आरक्षित प्रवर्गातील अर्जांची अपुरी संख्या प्राप्त झाल्यास, सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार आयोगाकडे असेल.
11 ) संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून पुरेशा संख्येने अर्ज मिळाल्यानंतर आणि गुणवत्तेनुसार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
12 ) “NHRC मध्ये इंटर्न म्हणून सामील होण्याचे कारण” या विषयावर 250 शब्दांचे लेखन (ऑनलाइन फॉर्ममध्ये) अर्जदारांनी सादर करणे आवश्यक असेल जे उद्देशाचे विधान (SOP – statement of purpose ) म्हणून देखील मानले जाईल. ऑनलाइन अर्जासह जे निवडीचा आधार म्हणून सुद्धा काम करेल. ज्या विद्यार्थ्यांना मानवी हक्कांशी संबंधित क्षेत्रात संशोधन करण्याची क्षमता आहे त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
13 ) बारावीच्या @ 30 गुण, पदवी @ 40 गुण आणि 30 गुण @ 300-500 शब्दांच्या लेखनात मिळालेल्या गुणांच्या एकूण 100 गुणांपैकी गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल.
14 ) जे विद्यार्थी NHRC द्वारे आयोजित नियमित एक महिन्याच्या हिवाळी/उन्हाळी इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये सहभागी झाले आहेत ते अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा अकाउंट ओपन झाल की मेसेज करा. मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील http://t.me/iconik_NN
एन एच आर सी इंटर्नशिप number of interns
– या वर्षी विंटर इंटर्नशिप प्रोग्राम 2024 साठी जास्तीत जास्त 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
– याशिवाय, दिल्ली आणि NCR विभागातील 5 विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवले जाऊ शकते.
– इंटर्नशिपमधून बाहेर पडल्यास, ज्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवले गेले आहे त्यांना विंटर इंटर्नशिप प्रोग्राम 2024 च्या दुसऱ्या दिवसाच्या आत इंटर्नशिपमध्ये सामील होण्यासाठी बोलावले जाऊ शकणार आहे.
– अटेंडन्स, वक्तशीरपणा, शिस्त आणि सेशन्स मधील सहभाग यावरून दिले जाईल.
– तसेच ग्रुप प्रोजेक्ट प्रेसेंटेशन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तसेच बुक रिव्ह्यू वेळेवर सबमिट करणे आवश्यक असेल.
– ग्रुप रिसर्च प्रोजेक्टमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या इंटर्नला अनुक्रमे 15000 रुपये , 10000 रुपये आणि 5000 रुपये अशी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.
– ज्या पाच इन्टर्नला बुक रिव्ह्यू साठी जास्त मार्क मिळवले आहेत त्यांना पुस्तकांच्या स्वरूपात ज्यांची किंमत 1000 पेक्षा जास्त नसेल अशी पुस्तके दिली जाणार आहेत .
– डिक्लेमेषण काँटेस्ट मधील टॉप तीन इन्टर्नला पुस्तकांच्या स्वरूपात ज्यांची किंमत 1000 पेक्षा जास्त नसेल अशी पुस्तके दिली जाणार आहेत .