Online Ration card | ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याची प्रक्रिया | Ration card withdrawal process online –
रेशन कार्डचा उपयोग बऱ्याच योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून होत असतो. परंतु बऱ्याच लोकांना रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड मध्ये काही बदल करण्यासाठी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात ,परंतु आता ही प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा होणार आहे, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत…
या रेशन कार्डचे फायदे | Benefits –
– हे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळत असल्यामुळे आपल्या मोबाईल मध्ये सहजरीत्या आपल्याला फोटो स्वरूपात किंवा मेलद्वारे प्राप्त होईल.
– डीजी लॉकर या ॲप मध्ये सुद्धा हे रेशन कार्ड ऑनलाइन दिसेल.
– आपल्याला हवं तेव्हा आपण या रेशन कार्ड ची प्रिंट काढू शकतो.
इतर पूर्वीपासून मिळत असलेले फायदे तर आहेच –
– रेशन कार्ड हे ओळखीचा व रहिवासी पुरावा म्हणून बऱ्याच ठिकाणी काम येते.
– राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत अनुदानित खाद्यपदार्थ जसे की गहू ,तांदूळ ,साखर स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतात.
– स्वस्त दरामध्ये धान्य मिळाल्यामुळे रेशन कार्ड धारकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे जाते.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी पात्रता | Eligibility –
– अर्जदाराकडे इतर कुठलेही रेशन कार्ड नसावे.
– अर्जदार हे पंधरा वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
– सरकारी निकषानुसार अर्जदाराची उत्पन्न मर्यादा असावी.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents –
– कुटुंबामधील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड
(कुटुंबप्रमुख यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
– उत्पन्नाचा दाखला
– वीज बिल / टेलिफोन बिल
– गॅस कनेक्शन details
– पॅन कार्ड
– पासपोर्ट साईज फोटो
– मोबाईल नंबर
– अपंग असल्यास प्रमाणपत्र
– जात प्रमाणपत्र असल्यास
– रहिवासी दाखला/निवासी दाखला
– बँड डिटेल्स/passbook
रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया | Online process of Application
स्टेप 1. पुढील वेबसाईट वर जा. http://rcms.mahafood.gov.in
स्टेप 2. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आता sign in करायचे आहे.
स्टेप 3.त्या नंतर public login हा ऑप्शन सिलेक्ट करा.
स्टेप 4. त्या नंतर New User Sign Up Here या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 5. नवीन रेशन कार्डसाठी Want to apply for New Ration Card या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 6. त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी आणि युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
स्टेप 7.आता Register User या वर क्लिक करा व यूजर आयडी , पासवर्ड किंवा आधार नंबर टाका आणि लॉगिन करा.
स्टेप 8. लॉगिन करून झाल्यावर Apply For New Ration card या ऑप्शनवर क्लिक करा सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरा.
स्टेप 9. हे रेशन कार्ड काढण्यासाठी काही फी शासनाकडून आकारले जाते ती फी भरा.
स्टेप 10. ह्या नंतर गाव, तालुका आणि जिल्हा निवडा
स्टेप 11. आता रेशन कार्ड वर मेंबर्स ऍड करायचे आहेत.Add Member वर क्लिक करा आणि सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती भरा, ही माहिती आधार कार्ड नुसार भरा.
स्टेप 12. रेशन कार्ड मध्ये इतर घरातील व्यक्ती ॲड करायचे असल्यास Add Member ऑप्शन वर त्या त्या व्यक्तींची माहिती भरावी.
स्टेप 13. संपूर्ण फॉर्म व्यवस्थित रित्या भरून झाल्यावर जमा /Submit करा.
स्टेप 14 . ऑनलाइन फी जमा केल्यानंतर रेशन कार्ड वेरीफाय करण्यासाठी तहसिलकडे जाईल.त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्या लॉगिन वर आपल्याला शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.
अशा रीतीने आपण रेशन कार्ड डाउनलोड करू शकतो.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |