सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय |Organic fruits and vegetables business| | How to start an organic fruits and vegetables business

सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय |Organic fruits and vegetables business| | How to start an organic fruits and vegetables business –

     पूर्वी तर लोक आरोग्याबाबत जागृत होतेच परंतु आता आरोग्य बाबतीत लोक अधिकच जागृत झालेले आहेत. पूर्वीच्या काळी लोकांना रसायन विरहित, एकदम शुद्ध असे फळे आणि भाजीपाला खाण्यास मिळत असे आणि त्यामुळेच त्याकाळी आणि आत्तासुद्धा तेव्हाच्या पिढीमधील लोकांचे आरोग्य उत्तम आहे, तेव्हाच्या लोकांना चांगले आयुर्मान सुद्धा प्राप्त होते. परंतु हल्ली रसायनांचा उपयोग वाढला असल्याकारणाने सेंद्रिय फळे आणि भाजीपाला मिळणे दुर्मिळ झाले आहे. परंतु जे कोणी सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन घेतात त्यांच्या फळांना आणि भाजीपाल्याला भाव देखील उत्तम मिळतो. आज आपण सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

Advertisement

१ . व्यवसाय योजना तयार करा –

– व्यवसाय सुरू करत असताना योजना आखणे खूप महत्त्वाचे आहे.

– व्यवसायाचे प्लॅनिंग उत्तमरीत्या केल्यामुळे व्यवसायामध्ये येणारे अडथळे नक्कीच कमी होतात.

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करत असताना सुद्धा व्यवसाय योजना नक्कीच तयार केली पाहिजे, यामध्ये साधारणतः पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो : 

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करत असताना सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याची शेती आपण स्वतः करणार का की सेंद्रिय फळे आणि भाजीपाला दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घेऊन मग त्याची विक्री करणार हे सर्वप्रथम ठरवा.

– हा व्यवसाय नक्की कुठे सुरू करणार?

– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या परवान्यांची आवश्यकता आहे ?

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी ?

२.सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी ठिकाण –

– जर तुम्ही हा व्यवसाय छोट्या गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर स्वतःच्या घरामधून सुद्धा हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. ग्राहकांना घरपोच ऑर्डरची सुविधा सुद्धा देता येऊ शकते.

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय मोठ्या स्तरावर म्हणजेच जास्त गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन तेथे हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

– हा व्यवसाय जास्त गर्दीच्या ठिकाणी सुरू केला तर अधिक फायदेशीर ठरू शकतो.

 ३. सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने –

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते आवश्यक परवाने लागू शकतात याबद्दलची माहिती नक्कीच घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुठलीही अडचण येता कामा नये.

– फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्डस ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( FSSAI ) हा परवाना सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागू शकतो.

४ . सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याच्या व्यवसायाची मार्केटिंग

– हल्ली सोशल मीडिया मार्केटिंग मुळे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करता येऊ शकते त्यामुळे सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याच्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा ही मार्केटिंग पद्धत अवलंबली पाहिजे.

– सोशल मीडिया मार्केटिंग करून आपल्या सेंद्रिय फळे आणि भाजीपाला व्यवसायाबद्दलची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.

– तसेच एकदा की ग्राहकांचा बेस तुमच्याकडे तयार झाला की त्यानंतर बिल्डिंग नुसार किंवा एरिया वाईज त्या त्या ग्राहकांचे ग्रुप तयार करून त्यावर सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर्स घेऊ शकतात जेणेकरून घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी तुम्हाला सुद्धा सोपे जाईल.

– माऊथ पब्लिसिटी सुद्धा या व्यवसायामध्ये खूप महत्त्वाची आहे, सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याची क्वालिटी जर चांगली असेल तर नक्कीच ग्राहक एकमेकांना सांगतात आणि त्या मार्फत सुद्धा अधिक ग्राहक मिळवण्यामध्ये मदत होते.

– तसेच रसायन युक्त फळे आणि भाजीपाला हे आरोग्यास कसे हानिकारक आहेत आणि सेंद्रिय फळे आणि भाजीपाला आपल्या आरोग्यास कसा चांगला आहे याबद्दलचे महत्त्व सुद्धा ग्राहकांना पटवून दिले पाहिजे.

– जस जसा व्यवसाय वाढत जाईल त्यानुसार वेबसाईट तयार करणे, रेडिओ वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देणे किंवा बॅनर लावणे अशा वेगवेगळ्या मार्केटिंग पद्धती वापरता येऊ शकतात.

     अशा रीतीने सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment