फोटोग्राफी बिसनेस आयडिया | Photography Business Idea
प्रस्तावना(Introduction) :-
मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील लहान – मोठे असे सगळे movments capture करतो. ते त्याच्या मोबाईल मध्ये असो किंवा कॅमेरा मध्ये. आणि ते capture झालेले movment सोशल मिडिया वर शेर करत असतो. मग याच्यात आपला फायदा कसा होऊ शकतो. यामधून आपण आपले बिसनेस कसे स्टार्ट करू शकतो.
एक चांगला फोटो क्लिक करणे ही आजची जणू काही trending fashionच झाली आहे. याच्यामध्ये आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. photoshoot करून photography business आयडिया हा आजच्या सोशल मिडीयाच्या युगामध्ये खूप यशस्वी असा बिसनेस आयडिया आहे. 138 कोटी भारतीयांपैकी 51 कोटी भारतीय हे सोशल मिडियावर आहेत. ते त्यांच्या जीवनातील काही ना काही क्षणचित्रे हे सोशल मिडियावर share करत असतात. यांच्या साठी आपण photography करू शकतो. आता लग्नाचा सिझन सुरु आहे. तर wedding photography सुद्धा करू शकतो. अनेक असे photographyचे प्रकार आहेत. आपण सुरुवात जर केली तर हळूहळू ज्या photography topik मध्ये आपली आवड असेल किंवा ज्यात आपण expert होऊन जाऊ त्याला आपण पुढे continue करू शकतो. पण सुरुवातीला आपल्याला सर्व प्रकारची photography करावी लागेल.
गुंतवणूक(Investment) :-
1. सुरुवातीला आपल्या कडे कोणताही अनुभव नसेल अश्या वेळेस आपण नवीन camera घेण्या मध्ये जास्त पैसे न गुंतवता रेंटने camera घेऊन सुरुवात करू शकतो. हळूहळू तुमचा अनुभव वाढेल तुम्हाला चांगली knowledge येईल. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल कि आता आपल्या स्वतःच्या cameraची आवश्यकता आहे. त्यावेळेस तुम्ही घेऊ शकतात. आणि रेंटने बिसनेस सुरु करत असाल, तर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत तुम्हाला एका दिवसासाठी camera मिळत असतो. त्या रेंटने घेतलेल्या कॅमेराने तुम्ही कोणत्याही प्रकारची shoot करून तुमचा profit काढू शकतात. ते तुमच्यावर अवलंबून आहे.
2. तुम्ही जर घेऊ शकत असाल तर मिड-level camera घेऊन सुरुवात करा. तो camera फक्त 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. त्यातही वेगवेगळे कंपनीचे कॅमेरे आहेत. cannon, nikon, sony ई.
3. पुढे जसे जसे तुमचे work वाढत जाईल त्या-त्या नुसार तुम्हाला तुमच्याकडे असणारे साहित्य upgrade करावे लागेल. जसे, लेन्स, flash, रिफ्लेक्टर, ई.
फोटोग्राफी कुठून शिकायची(Learning) :-
1. तर फोटोग्राफी शिकण्यासाठी 3 मार्ग तुमच्याकडे आहेत. पहिले youtube किंवा अनेक असे learning platforms जेथून फ्री मध्ये Quality Content तुम्हाला मिळेल.
2. दुसरे म्हणजे आधीपासून ज्यांच्या फोटोग्राफी बिसनेस आहे. आणि ज्यांना फोटोग्राफी क्षेत्रातला खूप अनुभव आहे. अश्या व्यक्तींकडून आपण जर शिकलो तर असे शिक्षण आपल्याला कुठेच मिळणार नाही ते अश्या अनुभवी व्यक्तींकडून मिळू शकते. तुम्ही या फिल्ड मध्ये नवीन असल्यामुळे सुरुवातीला ज्यांच्याकडे तुम्ही शिकणार आहात, आणि ज्यांच्या सोबत काम करणार आहात. तेव्हा तुम्ही कामाचे कोणतेही पैसे नाही घेतले तरी चालतील त्याचा मोबदला भविष्यात खूप मोठ्याप्रमाणावर तुम्हाला परत मिळेल. त्यासाठी तुम्ही पैसे न घेता काम करून पुढील वाटचाल करू शकतात.
3. तिसरा पर्याय म्हणजे कोणतीही कोचिंग/इंस्टीट्युट जॉईन करून. तुमच्या परिसरात/गावात कोणतीही कोचिंग/इंस्टीट्युट नसेल तर तुम्ही बाहेरगावी सुरत, पुणे, मुंबई, नाशिक अश्या ठिकाणी जाऊन सुद्धा एक महिन्याचे क्लास असतात ते पूर्ण करून फोटोग्राफी शिकू शकतात. त्या क्लासेसची फीस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. 10 हजारा पासून 30 हजारांपर्यंत त्याची फीस असू शकते. तुमच्या जवळच्या परिसरात असेल तर तिथेही तुम्ही करू शकतात. जर तुम्ही बाहेरगावी शिकण्यासाठी जाणार असाल तर काही इंस्टीट्युट त्यांच्याकडे संपूर्ण राहण्या-खाण्याची सोय उपलब्ध करून देत असतात. तर काही ठिकाणी आपल्याला करावी. लागते.
मार्केटिंग(Marketing) :-
1. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बिसनेसच्या लोगो बनवून घ्यावा लागेल. तेथूनच तुमची ओळख ही जगप्रसिद्ध होईल.
2. तुमचा फोटोग्राफी बिसनेसची मार्केटिंग करण्यासाठी एकच गोष्ट खूप महत्त्वाची असेल ती म्हणजे तुमच network ते म्हणतात ना कि, “Your Network Is Your Net worth” जेवढ्या जास्त लोकांकडे तुमचा contact असेल तेवढेच तुमच्या बिसनेसचे ग्रो होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि तेथूनच तुमची खरी कमाई होणार आहे.
3. सुरुवातीला तुम्ही अश्या लोकांना फ्री सर्विस द्या ज्या लोकांचे संपर्क खूप जास्त आहेत. आणि तुम्ही काढलेल्या फोटोवर तुमचा लोगो टाकून तो फोटो त्यांना द्या. जेव्हाही ते कोणत्याही सोशल मिडियावर त्यांच्या फोटो अपलोड करतील तर तिथे तुमच्या लोगो बघतील तर 80% चान्स तुम्हाला तेथून order येण्याचे आहेत. पण लोगोसोबत तुमचा मोबाईल नंबरसुद्धा पाहिजे. आणि जे लोगोवर नाव असेल त्या नावाने instagram बिसनेस पेज बनवा. त्या पेजला तुमचा contact no. ऍड करा. जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करतील. आणि त्या पेज वर जे फोटो तुम्ही शूट केले आहेत ते अपलोड करा, त्याच्यामुळे तुमचा एक पोर्टफ़ोलिओ तयार होईल.
4. ज्यांच्याही तुम्ही फोटोशूट केला त्यांना तुम्ही visiting card नक्की द्या. त्याच्याने तुमची professionality दिसते.
5. आता जरी तुमचे whatsapp बघितले तर कमीत कमी 500 लोकांचा संपर्क आरामाने कोणाचाही मोबाईल मध्ये असतात. तर आपल्या संपर्कातील लोकांकडून सुद्धा आपल्याला order येऊ शकतात. त्यासाठी जे आपण shoot करत असतो. तर शूट करत असतांनाचे किंवा आपण शूटसाठी कुठेतरी जात असतांनाचे status whatsapp वर ठेवल्याने जे लोक बघतील तेथूनही आपल्याला order येऊ शकतात.
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम