ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग बिसनेस विथ मोबाईल | कोणतीही गुंतवणूक न करता सुरु करता येणारा बिसनेस

ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग बिसनेस विथ मोबाईल

प्रस्तावना(introduction) :-

मित्रांनो आजच्या सोशल मिडीयाच्या युगामध्ये लोकांचे पोर्टफ़ोलिओ खूप updated असतात. आपण जर बघितल तर कोणाचे लग्न असेल, birthday असेल, विशेष सणाच्या शुभेच्छा असतील, श्रद्धांजली असेल, निवडणुका असतील. अनेक असे काही ना काही events असतील. तर त्याचे एकदम प्रोफेशनल फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात.

Advertisement

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे फोटो किंवा व्हिडिओ एवढे प्रोफेशनल आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा आपण एडीट करू शकतो. आणि तिथून निर्माण होतो एक बिसनेस.

 

फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग साठी खूप सारे softwares आहेत. जिथून आपण प्रोफेशनल Quality चे content export करू शकतो. आणि समोरच्या क्लायंटला हेच पाहिजे असत. मग तो फोटो किंवा व्हिडिओ मोबाईल मधून एडीट केला असो वा computer मधून त्यांना त्याच्याशी काहीच घेणे नसते.

आणि आता खूप चांगले एडिटिंग software प्ले-स्टोर वर available असतात. जेथून आपण  Quality Content export करू शकतो.  आणि एडीट केलेल्या फोटो किंवा व्हिडिओ मधून पैसे कमवू शकतो.

 

ग्राफिक्स डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग कुठून शिकायची(How to Learn) :-

ग्राफिक्स डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी youtube हे सर्वात मोठे साधन आहे. जेथून तुम्ही फ्री मध्ये सर्व काही शिकून तुम्हाला एडिटिंग साठी लागणाऱ्या material पासून प्रो-लेवलच्या preset पर्यंत सर्व काही मिळवू शकतात.

 

गुंतवणूक(investment) :-

आजच्या स्थितीला जवळ जवळ प्रत्येकाकडे किंवा कुटुंबात एक तरी Android मोबाईल असतो. आणि त्यात इंटरनेट कनेक्शन असत. आणि म्हणूनच तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तर  ग्राफिक्स डिझाईन and व्हिडिओ एडिटिंग या बिसनेस साठी कोणताही खर्च किंवा investment करावी लागणार नाही, जर तुमच्या कडे एक मोबाईल आणि त्यात इंटरनेट कनेक्शन असेल तर.

 

काम काय असेल(work) :-

1.       birthday banner फोटो किंवा व्हिडिओ

2.      शुभेच्छा banner फोटो किंवा व्हिडिओ

3.      श्रद्धांजली फोटो किंवा व्हिडिओ

4.     लग्न पत्रिका डिझाईन

5.     निमंत्रण पत्रिका डिझाईन

6.     लग्न आमंत्रण व्हिडिओ

7.      निवडणूक फोटो किंवा व्हिडिओ

8.     सोशल मिडिया पोस्ट

9.     सोशल मिडिया शोर्ट व्हिडिओ/reels एडिटिंग

10.  फोटो रीटच(साध्या फोटोला प्रोफेशनल लुक देणे)

11.   background change फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंग

12.  सुविचार पोस्ट

13.  मराठी उत्सव/सण फोटो किंवा व्हिडिओ

14. मॉडेल फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंग

15.  बिसनेस मार्केटिंग फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंग

 

नफा(Profit) :-

आपल्याला यात एक रुपयाही खर्च न करावा लागल्यामुळे जे पण आपल्याला order मिळतील तेथून मिळणारे पूर्ण margin हे profitच असेल. जे profit आपल्याला मिळेल. ते आपल्या कामावर अवलंबून आहे. एका फोटोच्या एडिटिंग साठी 50/-रुपये पासून तर 150/- रुपये पर्यंत घेऊ शकतो. आणि व्हिडिओचे 100/- रुपये पासून 250 ते 300/- रुपये पर्यंत घेऊ शकतो. क्लायंटच्या एडिटिंग मागणी वरच चार्जेस अवलंबून असतील. सुरुवातीला आपल्याला कमी order भेटतील कधी-कधी एका आठवड्यातून एक order पण सुरुवातीला येऊ शकते. पण जसा-जसा आपला बिसनेस आपले contact वाढत जातील. तसे-तसे आपले रोजचे order सुद्धा वाढत जातील. एक दिवस असा पण येऊ शकतो. ज्यादिवशी आपल्याला आलेल्या orderला cancel पण करावे लागू शकते. म्हणून हे digital क्षेत्र आहे. याचा अंत नाहीये. दिवसेदिवस मागणी वाढत चालली आहे. फक्त तुम्हाला Patience ठेवून काम करावे लागेल.

 

तरी 300ते500/- रुपये रोज म्हणजेच 10ते15 हजार रुपये महिन्या पर्यंत आपली कमाई होऊ शकते. आणि पुढेही याची डिमांड वाढेलच त्यानुसार,आपल्या कामानुसार, आपल्याला मिळणाऱ्या order नुसार आपले profit अवलंबून आहे.

 

Upgrade Your Quality & Service – तुम्ही मोबाईल मधून computer software एडिटिंग मध्ये स्वतःला upgrade जर केल तर तुमचे काम लवकर होतील व तुम्ही जास्त order घेऊ शकतात.

 

 

 

मार्केटिंग(Marketing) :-

1.       सुरुवातीला तुमच network कमी असेल तर रोज तुम्ही 2-3 तरी फोटो किंवा व्हिडिओ फ्री मध्ये एडीट करावे लागतील. पण तुम्ही जे फ्री content देणार आहात त्याच्यासोबत तुमचा ब्रांडचा लोगो आवर्जून लावा. तेथूनच तुमची मार्केटिंग होईल आणि order तुम्हाला येतील.

2.      तुमचे instagram पेज बनवून त्यात तुम्ही एडीट केलेले फोटो/व्हिडिओ अपलोड करा. आणि जेवढे तुमचे instagram वर फॉलोअर्स असतील तेवढेच तुमचे order जास्त मिळतील.

3.      instagram वर story ठेवून तुमच्या paid serviceच्या Rate Boardची मार्केटिंग करू शकतात.

4.     सुरुवातीला Rate पूर्ण मार्केट पेक्षा कमी तुमचेच असले पाहिजेत. पण rate जरी कमी असले तरी Quality तुमचीच 1 no. पाहिजे. तेव्हा लोक तुमच्या कडे येतील.

 

 

Advertisement

Leave a Comment