कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी जागेत सुरू करता येणारा व्यवसाय

पॉपकॉर्न बनवण्याचा व्यवसाय | Popcorn making business – 

    “पॉपकॉर्न” खाणे बरेच लोक पसंत करतात मग ते चित्रपट बघताना असो किंवा टेलिव्हिजन बघताना असो किंवा स्पोर्ट बघत असताना… फक्त असे कार्यक्रम बघतानाच पॉपकॉर्न खाल्ली जातात असे नाही तर इतर वेळी सुद्धा नक्कीच पॉपकॉर्न खाणे सर्वांनाच आवडते. तर मग आपण पॉपकॉर्न बनवण्याचा जर व्यवसाय सुरू केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 

     कमी गुंतवणुकीमध्ये घरून सुद्धा पॉपकॉर्न बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो आणि त्या बदल्यात चांगला नफा सुद्धा कमावता येऊ शकतो कारण थिएटरमध्ये इतर पॉपकॉर्नच्या तुलनेत पॉपकॉर्नची किंमत तिप्पट असते परंतु दोन्ही पॉपकॉर्न मध्ये फारसा फरक आढळत नाही त्यामुळे बरेच लोक पॉपकॉर्न बनवणाऱ्या व्यावसायिकांकडून पॉपकॉर्न खरेदी करणे पसंत करतात.

हा व्यवसाय अगदी कमी जागेमध्ये सुद्धा सुरू करता येऊ शकतो, चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

1 . पॉपकॉर्न बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल | Raw material required for making popcorn –

– पॉपकॉर्न बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चामाल हा उत्तम गुणवत्तेचा असावा जेणेकरून पॉपकॉर्नची चव अगदी सुरेख लागेल.

– पॉपकॉर्न विविध फ्लेवर्स मध्ये बनवता येतात त्यामुळे आपण ज्या फ्लेवर्समध्ये पॉपकॉर्न बनवणार आहोत त्यानुसार सामग्री मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. परंतु साधारणतः पुढील सामग्री पॉपकॉर्न बनवण्यासाठी आवश्यक असते : मीठ, लोणी, साखर, कॉर्न, मसाले, रंग, कॅरमल्स, फ्लेवर्स इत्यादी.

2 . पॉपकॉर्न बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक उपकरणे | Equipments required for popcorn making business –

पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारी उपकरणे पुढीलप्रमाणे:

– पॉपकॉर्न बनवण्याचे यंत्र 

– मिक्सिंग बाऊल्स 

– सीलिंग मशीन  

– पॅकिंग साहित्य 

– वेयींग स्केल 

– इतर आवश्यक विविध उपकरणे 

  3 . Licence required for popcorn making business | पॉपकॉर्न बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवाने –

– FSSAI परवाना 

– फर्म नोंदणी 

–  चालू बँक खाते 

– MSME उद्योग आधार ऑनलाइन नोंदणी 

– GST नोंदणी 

– व्यापार परवाना 

– व्यवसाय पॅन कार्ड 

4 . पॉपकॉर्न बनवण्याची पद्धत | Method of popcorn making – 

 A. पहिली स्टेप म्हणजे मक्यापासून मक्याचे दाणे वेगळे करावे लागतील किंवा बाजारामधून सुद्धा तुम्ही मक्याचे दाणे खरेदी करू शकता. शेतकऱ्यांशी संपर्क साधून होलसेल दराने मका खरेदी करू शकता.

B. पॉपकॉर्नची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी मक्याचे दाणे सूर्यप्रकाशात वाळवणे खूप गरजेचे आहे.

C.त्यानंतर पॉपकॉर्न बनवण्याच्या यंत्राद्वारे मका उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही घेतलेल्या मक्याच्या दाण्याच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार तूप आणि मीठ व्यवस्थित रित्या मिसळा.

D. तयार मिश्रण कॉर्न मशीनमध्ये ओतणे.मकाचे दाणे उष्णतेच्या संपर्कात येऊन पॉपकॉर्नमध्ये रूपांतरित होतात. 

E. पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर पॉपकॉर्नची चव आणि गुणवत्ता व्यवस्थित रित्या ठेवण्यासाठी पॉपकॉर्नची पॅकिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे.

5 . पॉपकॉर्नची मार्केटिंग | Marketing –

– सर्वप्रथम आपण बनवत असलेल्या पॉपकॉर्नचा योग्य तो दर ठरवणे गरजेचे आहे. आपल्या पॉपकॉर्नच्या गुणवत्तेनुसार आणि चवीनुसार योग्य तो दर ठरवला पाहिजे. इतर लोक पॉपकॉर्न जास्त किमतीमध्ये विकतात म्हणून आपण सुद्धा तसे करता कामा नये.

– सुरुवातीला हा व्यवसाय सुरू केल्यानंतर वेगवेगळया फ्लेवर्ड पॉपकॉर्नचे सॅम्पल्स ग्राहकांना देऊ शकता जेणेकरून ग्राहकांना पॉपकॉर्नची चव समजेल.

– पॉपकॉर्नची पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग व्यवस्थित रित्या करा.

– सोशल मीडिया मार्केटिंग ही मार्केटिंग पद्धत वापरा.

– त्याचबरोबर विविध मंगल कार्यालय किंवा हॉल्स यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ – मोठ्या ऑर्डर्स मिळवू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment