Mobile accessories business | मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेस कसा सुरू करायचा ?

       बऱ्याच व्यक्तींना व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु व्यवसाय नेमकी कोणता सुरू करावा यामध्ये कन्फ्युजन असते. आपण आपल्या वेबसाईटवर त्याचबरोबर यूट्यूब चॅनल वर नवनवीन बिझनेस आयडियाज घेऊन येत असतो आज आपण मोबाईल ॲक्सेसरीज व्यवसाय कसा सुरू करायचा हे बघणार आहोत…

      सध्या  मोबाईल ही लोकांची मूलभूत गरज बनली आहे. मोबाईल शिवाय जीवन लोक इमॅजिनच नाही करू शकत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मोबाईलसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीजची मागणी देखील वाढत आहे. मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच मोबाईलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोबाईल फोन्सना बऱ्याच ॲक्सेसरीजची आवश्यकता असते. मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेसमध्ये कॉम्पिटिशन देखील आहे त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य लोकेशन शोधणे हे देखील गरजेचे आहे.मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

Advertisement

Mobile accessories business | मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेस कसा सुरू करायचा ?

सर्वप्रथम तुम्ही विकत असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज बद्दल अधिक जाणून घ्या | Know more about mobile accessories – 

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोबाईल ॲक्सेसरीजच्या ब्रँड बद्दल किंवा त्या ॲक्सेसरीज बद्दल चांगले ज्ञान असतेच असे नाही. तर इतरांपेक्षा जर वेगळे व्हायचे असेल तर तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज बद्दलची माहिती तसेच ब्रँड बद्दलची माहिती अधिक जाणून घ्या, या सर्व माहितीचा फायदा तुम्हाला मोबाईल ॲक्सेसरीज सेल करताने नक्कीच होईल.

मोबाईल ॲक्सेसरीज/कोणकोणत्या Mobile accessories आपण आपल्या स्टोअर मध्ये ठेवू शकतो-

Types of mobile accessories –

– केसेस/कव्हर्स

– इअरफोन (वायर्ड किंवा वायरलेस)

– फोन कॅमेरा लेन्स आणि स्मार्ट फ्लॅश 

– हेडफोन (वायर्ड किंवा वायरलेस) 

– मोबाइल स्क्रीन टेम्पर्ड ग्लास 

– सेल्फी स्टिक

– ट्रायपॉड 

– मोबाइल स्क्रीन लॅमिनेशन 

– बॅटरीज आणि चार्जर

– HDMI केबल्स 

– चार्जिंग ब्रिक

– ब्लूटूथ

–  ब्लूटूथ केबल 

– पॉवर बँक्स 

– कार चार्जिंग ब्रिक

– ब्लूटूथ स्पीकर

या सर्व Mobile accessories चा समावेश आपण आपल्या मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेस मध्ये करू शकता. वेगवेगळ्या ॲक्सेसरीजचे प्रॉफिट मार्जिन वेगवेगळे असते परंतु काही व्यावसायिकांच्या मतानुसार मोबाईल फोन विकण्यापेक्षा मोबाईल ॲक्सेसरीज मध्ये जास्त नफा असतो.

मार्केटचा अभ्यास करा | Research/Analyse the market –

     मोबाईल ॲक्सेसरीज मार्केटमध्ये अनेक स्पर्धा असतील परंतु जास्त मोठी दुकाने किंवा दुकानांची संख्या जास्त दिसल्यानंतर निराश होऊन आपली योजना बदलण्याचा विचार करू नका कारण या व्यवसायामध्ये खूप स्कोप आहे आणि प्रॉफिट मार्जिन देखील आहे. फक्त इतर स्पर्धकांपेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळ्या ॲक्सेसरीज देखील ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तसेच mobile accessories चे योग्य दर ठरवले पाहिजेत.

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते लोकेशन निवडा | Location for Mobile accessories – 

– ज्या ठिकाणी मोबाईल ॲक्सेसरीजचे कमी शॉप्स आहेत ती जागा तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी निवडू शकता.

– तसेच जास्त गर्दी असणाऱ्या मार्केटच्या ठिकाणी देखील तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज व्यवसाय सुरू करू शकता. 

– Mobile accessories व्यवसाय सुरू करताना जी जागा निवडली आहे ती जागा जास्त costly तर नाही ना याचा सुद्धा विचार करा.

गुंतवणूक – भांडवल |Capital –

– कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असतेच. तुमच्याकडे जर काही सेविंगज असतील, तर ते पैसे वापरून तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज व्यवसाय सुरू करू शकता.

– तसेच तुम्ही बिझनेस लोन साठी देखील अप्लाय करू शकता किंवा क्रेडिट लोनसाठी देखील अप्लाय करू शकता, क्रेडिट लोनसाठीची प्रोसिजर फास्ट होते परंतु याचा ड्रॉ बॅक म्हणजे इंटरेस्ट रेट जरा जास्त असू शकतो.

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने | Licence required for starting mobile accessories business –

– जर तुम्हाला एखादे शॉप उघडायचे असेल तर तुम्हाला शॉप अँड इस्टेब्लिशमेंट ॲक्ट अंतर्गत दुकानाची नोंदणी करावी लागेल.

– जीएसटी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे राहील.

– व्यापार परवाना काढणे

–  पॅन नोंदणी 

–  आधार नोंदणी करणे सुद्धा गरजेचे आहे.

योग्य पुरवठादार निवडा | Choose right supplier of Mobile accessories –

– मोबाईल ॲक्सेसरीज चांगल्या क्वालिटीच्या आणि वेळेवर मिळण्यासाठी योग्य तो सप्लायर शोधणे गरजेचे आहे जर स्थानिक डीलर कडून ही उत्पादने घेतली तर वेळेची बचत होईल आणि खर्च सुद्धा वाचू शकतो.

– जर समजा थेट मोबाईल ॲक्सेसरीज बनवणाऱ्या व्यवसायिकांशी संपर्क झाला तर त्यांच्याकडून सुद्धा खरेदी करू शकता असे केल्यामुळे नफा जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतो.

Mobile accessories Marketing | मोबाईल ॲक्सेसरीजची मार्केटिंग –

– सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता.

– फेसबुक लाईव्ह / यूट्यूब चॅनलच्या साहाय्याने मार्केटींग करू शकता.

– विविध वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज विकू शकता.

– स्वतःची वेबसाईट सुरू करून त्यावर देखील मोबाईल ॲक्सेसरीजची मार्केटिंग करून विकू शकता.

– तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज वर वेगवेगळ्या ऑफर्स किंवा सूट देऊ शकता.

अशा रीतीने Mobile accessories व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment