Post office Schemes | पोस्ट ऑफीस योजना | Best post office Schemes 2025 

Post office Schemes | पोस्ट ऑफीस योजना | Best post office Schemes 2025 

   आजच्या ब्लॉगमध्ये आपण पोस्ट ऑफिस मार्फत ज्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या कारणांसाठी उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण सुकन्या समृद्धी, महिला सन्मान बचत पत्र योजना,किसान विकास पत्र योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना या पाच (Post office Schemes) योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Post office Schemes | पोस्ट ऑफीस योजना | Best post office Schemes 2025 

Post office Schemes
Post office Schemes

१. Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना –

  • सुकन्या समृद्धी योजना ही 2015 मध्ये सुरू झालेली आहे. 
  • सुकन्या समृद्धी योजना ही खास करून मुलींसाठी असून या योजनेमुळे पालकांना त्यांचे मुलींचे शिक्षण तसेच भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत होते. 
  • सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे. 
  • पालकांमार्फत मुलीचे वय दहा वर्ष पूर्ण होण्याआधीच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले जाणे गरजेचे असते. 
  • सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वार्षिक गुंतवणूक 250 रुपये ते 1,50,000 रुपये इतकी करता येते.
  •  सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एका मुलीच्या नावे एकच खाते सुरू करता येते तर कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन मुलींसाठी या योजनेअंतर्गत खाते सुरू करता येऊ शकते.
  • सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते नजीकच्या पोस्ट ऑफिस मार्फत किंवा बँकेमधून उघडले जाऊ शकते. 

२. Mahila Sanman Bachat Patra Yojana | महिला सन्मान बचत पत्र योजना –

  • महिला सन्मान बचत पत्र योजना ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू झालेली असून खास महिलांसाठी आहे. 
  • या योजने मध्ये १,००० रुपये आणि १०० च्या पटीत २,००,००० रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते. 
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी मॅच्युअर होते. खातेधारक खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेच्या ४०% पर्यंत रक्कम काढू शकतो. 
  • व्याज तिमाहीत वाढवले जाते. 
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा सध्याचा व्याजदर 7.2% आहे.
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकांमार्फत उघडता येते.
  • महिला सन्मान बचत पत्र योजनेची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. 

३. Kisan Vikas Patra | किसान विकास पत्र योजना :

  • किसान विकास पत्र योजनेचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे. 
  • किसान विकास पत्र योजना ही योजना पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते. 
  • ही योजना 115 महिन्यांनी म्हणजेच 9 वर्ष आणि 6 महिन्यांनी मॅच्युअर होते.
  • किसान विकास पत्र योजनेमध्ये किमान 1 हजार रुपये गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकतो तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.
  • किसान विकास पत्र योजनेसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मधून किंवा बँकेमधून खाते उघडले जाऊ शकते. 
  • किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एका व्यक्तीच्या नावे कितीही खाते उघडले जाऊ शकतात.

४. Senior citizen saving scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना :

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना निवृत्त झालेल्या लोकांसाठी आहे.
  • या योजनेसाठी खातेदाराचे वय वय किमान ६० वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल परंतु काही केसेस मध्ये ही अट शिथिल केलेली आहे जसे की व्हीआरएस किंवा स्पेशल व्हीआरएस अंतर्गत निवृत्त असाल तर 55 ते 60 वर्ष वय असलेले व्यक्ती सुद्धा SCSS खाते उघडू शकता. जर तुम्ही संरक्षण सेवेतून निवृत्त असाल आणि तुमचे वय 50 ते 60 वर्षे असेल तर तुम्ही सुद्धा SCSS खाते उघडू शकता.
  • किमान ठेव १,००० रुपये आहे आणि १,००० रुपयांच्या पटीत जास्तीत जास्त ठेव ३० लाख रुपये आहे.
  • व्याज तिमाही दिले जाते.
  • या योजनेची मुदत ५ पाच वर्षांची आहे. 
  • या योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2% इतका आहे.
  • तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडू शकता.
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पोस्ट ऑफिस मार्फत किंवा बँकेमार्फत खाते सुरू करता येऊ शकते. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

५. Post office Term deposit | पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना :

  • पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना ही योजना पोस्ट ऑफिसची एफडी म्हणून सुद्धा ओळखली जाते. 
  • पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेमध्ये एक रकमी गुंतवणूक करावी लागत असून याचे व्याज मात्र दरवर्षी दिले जाते. 
  • पोस्ट ऑफिस मदत ठेव योजनाही वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे जसे की १ वर्ष,२ वर्ष,३ वर्ष आणि ५ वर्ष. या कालावधींसाठी व्याजदर सुद्धा वेगवेगळे आहेत ते पुढील प्रमाणे :
कालावधीव्याजदर
१ वर्ष ६.९%
२ वर्ष ७ %
३ वर्ष ७.१%
५ वर्ष ७.५ %
  • पोस्ट ऑफिस मोदक ठेव योजनेमध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.
व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment