प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana 2023

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana 2023 | जीवन ज्योती विमा योजना अर्ज |  सरकारी योजना | PMJJBY – 

      केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या उद्दिष्टाने वेगवेगळ्या योजना जनतेसाठी राबवल्या जात असतात. कधी कुठलीही आपत्ती किंवा संकट अचानकपणे येऊ शकते आणि अशावेळी विमा काढलेला असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु काही कंपन्यांची विमा प्रीमियम अत्यंत महागडे असतात आणि यासाठीच सरकारने कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त सुरक्षा जनतेला मिळावी यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही योजना सुरू केली आहे. याबद्दलच आज सविस्तर माहिती आपण बघणार आहोत… 

Advertisement

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana –

– प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही ९ मे २०१५ रोजी संपूर्ण देशात राबविण्यास सुरुवात केली.

– प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही आपल्या देशातील नागरिकांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि सार्वजनिक व खाजगी विमा कंपन्या व खाजगी क्षेत्रामधील बँका यांच्या माध्यमातून राबवली जात आहे.

–  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमा धारकाला एक वर्ष विमा संरक्षण मिळते तसेच विमा धारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याला जीवन विमा संरक्षण देते.

– प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत समजा एखाद्या विमाधारकाचा वयाच्या ५५ व्या वर्षाच्या आधी काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्या विमाधारकाच्या कुटुंबीयांस जे कोणी नॉमिनी असतील त्यांना दोन लाख रुपयांची रक्कम मिळते.

– मुख्य म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक हप्ता किंवा प्रीमियम ४३६ रुपये असणार आहे त्यामुळे अगदी सर्वांना हा प्रीमियम परवडणारा असू शकतो.

– प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष असणे गरजेचे आहे.

– दरवर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम भरणे गरजेचे आहे म्हणजेच नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता | Eligibility criteria for Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana –

– प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे बँके मध्ये बचत खाते असणे गरजेचे आहे.

– तसेच लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्ष असणे गरजेचे आहे.

– विमाधारकास दरवर्षी ३१ मे पूर्वी ४३६ रुपये प्रीमियम भरण्यासाठी बचत खात्यामध्ये तेवढी रक्कम ठेवणे गरजेचे आहे.

– दरवर्षी या पॉलिसीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

– बँकेमध्ये आधार कार्ड द्वारे केवायसी केलेली असणे सुद्धा गरजेचे आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आवश्यक कागदपत्रे | Documents necessary for Pradhanmantri Jivan Jyoti Bima Yojana –

– पासपोर्ट साईज फोटो

– ओळखपत्र

– अर्जदाराचे आधार कार्ड

– बचत बँक खाते क्रमांक

– अर्जदाराचा मोबाईल क्रमांक

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अर्ज | Pradhanmantri Jivan Jyoti Bima Yojana Application –

– प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता किंवा फॉर्म भरण्याबद्दलची माहिती तुम्ही तुमचे बचत खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा चौकशी करू शकता किंवा पुढे अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यावरून सुद्धा हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढू शकता.

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा.

– फॉर्मची प्रिंट काढल्यावर तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो फॉर्म बँकेमध्ये जमा करावा.

फॉर्म – येथे download करा.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा क्लेम कसा करावा | How to Claim for Pradhanmantri Jivan Jyoti Bima Yojana –

– जर समजा विमाधारकाचे निधन झाले तर जे कोणी नॉमिनी असतील त्यांनी विमाधारकाचे बचत खाते ज्या बँकेमध्ये होते आणि जे बचत खाते या योजनेशी जोडलेले होते त्या बँकेमध्ये जावे.

– वेबसाईटवरून वारसदाराने या योजनेचा क्लेम फॉर्म डाउनलोड करावा ,सर्व माहिती व्यवस्थित भरावी आणि त्यासोबत विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.

( बँकेकडून किंवा विमा कंपनीकडून सुद्धा क्लेम फॉर्म घेवू शकता)

– बँक अकाउंट डिटेल्स, विमाधारकाचे मृत्युपत्र, डिस्चार्ज पावती,नॉमिनीचे बँक डिटेल्स व इतर आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म विमा कंपनीमध्ये किंवा बँकेमध्ये जमा करावा.

– संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व पडताळणी झाल्यानंतर नॉमिनीच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version