Pradhanmantri Mudra Loan |प्रधानमंत्री मुद्रा लोन | Mudra Loan –

Pradhanmantri Mudra Loan |प्रधानमंत्री मुद्रा लोन | Mudra Loan –

     बऱ्याच लोकांना काही ना काहीतरी व्यवसाय सुरू करावासा वाटतो तसेच काही लोकांचा छोटा व्यवसाय असतो सुद्धा आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करायचा असतो. परंतु अशावेळी प्रश्न उभा राहतो तो गुंतवणुकीचा,भांडवलाचा ? बऱ्याचदा कर्जासाठी अप्लाय करून सुद्धा कर्ज मिळत नाही. परंतु आता सरकारतर्फे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याद्वारे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता… चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Pradhanmantri Mudra Loan | प्रधानमंत्री मुद्रा लोन –

– प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे वैशिष्ट्य तरुण तरुणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा देणे /प्रोत्साहित करणे असे आहे.

– प्रधानमंत्री मुद्रा लोन या योजने अंतर्गत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेला उद्योग वाढवण्यासाठी कर्ज मिळू शकते.

– आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

– सोल प्रोपराइटर,पार्टनरशिप,सूक्ष्म उद्योग, अन्नासंबंधित व्यवसाय,दुरुस्तीची दुकाने,माइक्रो मेनूफैक्चरिंग फर्म, व इतर सेवा क्षेत्रातील कंपन्या ह्या योजनेचा लाभ घेवू शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे| Benefits of PMMY –

– प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज परतफेड करण्याचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

– कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी घेतली जात नाही.

– ज्यांना ह्या योजने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल त्यांना कुठल्याही हमी शिवाय कर्ज दिले जाते 

– अगदी कुणीही ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे ते ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

– कर्ज घेणाऱ्या लाभार्थीला मुद्रा कार्ड मिळते आणि ह्याच्या मदतीने व्यावसायिक गरजांवर खर्च करता येतो.

प्रधानमंत्री मुद्रा लोन पात्रता | Eligibility –

– अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

– कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

– अर्ज करणारी व्यक्ती ही कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी.

– प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही फक्त सरकारी बँकेतच मिळणार.

प्रधानमंत्री मुद्रा लोन कागदपत्रे | Necessary documents required for Pradhanmantri Mudra Loan –

– पासपोर्ट साईज फोटो

– पॅन कार्ड

– आधार कार्ड

– अर्जदाराचा कायमचा पत्ता

– व्यवसाय पत्ता आणि स्थापनेचा पुरावा

– मागील तीन वर्षांचे Balance Sheet

–  टॅक्स रिटर्न 

– व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे बिले व कोटेशन

प्रधानमंत्री मुद्रा लोन कर्जाचे प्रकार 

१ . शिशू – कर्ज वाटपाची रक्कम 50,000 रुपयांपर्यंत

२ . किशोर – कर्ज वाटपाची रक्कम  50,000 ते 5,00,000 रूपयांपर्यंत

३ . तरुण  – कर्ज वाटपाची रक्कम 5,00,000 ते ₹10,00,000  रुपयांपर्यंत

प्रधानमंत्री मुद्रा लोन अर्ज प्रक्रिया –

प्रधानमंत्री मुद्रा लोनसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाईन पध्दतीने अर्ज करत येतो.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा ?

– सर्वप्रथम सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून या योजनेसाठी आवश्यक असणारा अर्ज डाउनलोड करा.

– त्या नंतर अर्ज व्यवस्थित भरून घ्या आणि  सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.

– अधिकृत बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सबमिट करा आणि Reference ID  मिळवा.

– बँकेचा प्रतिनिधी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधेल. Reference ID  ह्या वेळी उपयोगात येऊ शकतो त्यामुळे हा आयडी जपून ठेवा.

–  अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर, कर्जाची रक्कम मंजूर केली जाते आणि त्या नंतर बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात रक्कम मिळते.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा ?

–  तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या जी PMMY अंतर्गत मुद्रा कर्ज देण्यासाठी पात्र असेल.

– अर्ज व्यवस्थित भरून  सर्व आवश्यक कागदपत्रांसह  जमा करा.

– सर्व कागदपत्रे  पडताळणी केल्यानंतर अर्ज मंजूर केले  जाते.

Advertisement

Leave a Comment