प्रधानमंत्री पिक विमा योजना | Pradhanmantri Fasal Bima Yojana PMFBY| Pradhan Mantri Pik Bima Yojana | Pradhanmantri Pik Vima Yojana –

प्रधानमंत्री पिक विमा योजना | Pradhanmantri Fasal Bima Yojana PMFBY| Pradhan Mantri Pik Bima Yojana | Pradhanmantri Pik Vima Yojana –

      आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारतामधील बहुतांश लोकसंख्या शेती हा व्यवसाय करतात. शेतीमुळे बऱ्याच कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो तसेच बऱ्याच ठिकाणी पूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असते परंतु जर अशातच काही कारणांमुळे जसे की अतिवृष्टी ,दुष्काळ, गारपीट या अशा कारणांमुळे शेतीचे नुकसान होते. जर असे नुकसान झाले आणि ज्यांचे नुकसान झाले आहे ते कुटुंबीय पूर्ण शेतीवर अवलंबून असले तर त्यांच्यापुढे नेमके काय करावे हा मोठा प्रश्न उभा राहतो… आज आपण प्रधानमंत्री पिक विमा योजनेबद्दल माहिती बघणार आहोत.

Advertisement

प्रधानमंत्री पिक विमा योजना |Pradhan Mantri Pik Bima Yojana | Pradhanmantri Pik Vima Yojana –

– प्रधानमंत्री पिक विमा योजना ही 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे.

– दुष्काळ ,गारपीट, अतिवृष्टी, वादळ तसेच पूर या अशा आपत्ती मुळे शेतीचे जे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या हातभार लागावा या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली.

 – शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

– प्रधानमंत्री पिक विमा या योजनेअंतर्गत प्रीमियम सुद्धा कमी असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी १.५ टक्के प्रीमियम तर खरीप पिकासाठी २ टक्के इतका प्रीमियम भरावा लागतो.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल :

कारणे –

– अपुऱ्या पावसामुळे तसेच हवामानांमधील काही बदलामुळे जर शेतीमध्ये लागवड किंवा पेरणी होऊ न शकल्यास

– शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्यापासून ते पिकाची काढणी पर्यंत जर समजा काही रोग पडल्यामुळे किंवा कीड लागल्यामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या उत्पादनात घट झालेली असल्यास

– हंगामा मधील प्रतिकूल परिस्थितीमुळे जसे की दुष्काळ किंवा पूर यामुळे जर अपेक्षित उत्पन्नापेक्षा उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट जर अपेक्षित असेल तर

– जर विमा संरक्षित असलेले क्षेत्र जलमय झाले तर

– गारपिटीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी वैयक्तिक स्तरावर पंचनामे करावे लागतात.

– व्यापारी तसेच बागायती पिकांना सुध्दा प्रधानमंत्री पिक विमा योजना विमा संरक्षण पुरवते परंतु यासाठी ५ टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतो.

– जर चक्रीवादळामुळे किंवा अवकाळी पावसामुळे पिकाच्या कापणी किंवा काढणीनंतर पिकाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी वैयक्तिक स्तरावर पंचनामे करावे लागतात आणि कापणी किंवा काढणीनंतर जे काही नुकसान झाले आहे ते कापणी किंवा काढणीनंतर जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंतच पात्र राहते.

– वित्तीय संस्थेमार्फत या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचे जर नुकसान झाले तर नुकसान झाल्यानंतर 48 तासांच्या आत जे काही नुकसान झाले आहे त्याबद्दलची सर्व माहिती कळवणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक पात्रता |

Essential Eligibility for Pradhan Mantri Pik Bima Yojana –

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही शेतकरी असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

Necessary documents required for Pradhan Mantri Crop Insurance Yojana –

Pradhanmantri Pik Vima Yojana Documents –

– पासपोर्ट साईज फोटो

– ७/१२ उतारा

– आधार कार्ड

– रहिवासी पुरावा

– रेशन कार्ड

– बँक खात्याची माहिती

– बँकेचा रद्द केलेला चेक

– मोबाईल नंबर

– ई-मेल आयडी

– शपथपत्र

– घोषणापत्र

– शेतात पिकाची पेरणी झालेली असल्याचा पुरावा (पीक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे पत्र सादर करू शकतो)

– जर समजा शेतकऱ्याने दुसऱ्याची शेती करायला घेतली असेल तर , पिकाची पेरणी झाली असेल तर जो त्या जमिनीचा मूळ मालक आहे त्यांच्या सोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी आवश्यक आहे. त्या करारामध्ये शेताचा ७/१२ उतारा ,नंबर असावा.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म | Pradhanmantri Pik Vima Yojana Form –

– प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी  

ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

– ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास एखाद्या विमा कंपनीशी संपर्क साधून कृषी विभागाकडून अर्ज मिळवू शकता.

– ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे.नंतर होम पेज वर Farmer Corner वर क्लिक करून पुढील प्रोसिजर पूर्ण करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment