Pradhanmantri Suryodaya Yojana | प्रधानमंत्री सूर्योदय योजना –
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिराच्या खास प्रसंगी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारतामध्ये सौरऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी ” प्रधानमंत्री सूर्योदय योजना ( Pradhanmantri Suryodaya Yojana )” सुरू होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत भारतामधील एक कोटी घरावर रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे ऊर्जा क्षेत्रामधील भारताची सेल्फ सफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न आहे.
Table of Contents
Pradhanmantri Suryodaya Yojana | प्रधानमंत्री सूर्योदय योजना –
– प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम मंदिराच्या खास महोत्सवानिमित्त केली.
– प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय 1 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ देऊन विज बिल कमी यावे असा प्रयत्न आहे.
– या योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर सिस्टीम इंस्टॉल करून, या योजनेचे उद्दिष्ट भारताचे पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे आणि शाश्वत ऊर्जा पद्धतींच्या दिशेने वाटचाल करणे आहे.
– या प्रोजेक्टमुळे सौर पॅनेलचे इन्स्टॉलेशन आणि संबंधित पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या कंपन्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि ह्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या संधी मिळतील.
Pradhanmantri Suryodaya Yojana Eligibility Criteria | प्रधानमंत्री सूर्योदय योजना पात्रता –
– अर्जदार भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
– गरजूंना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाचे निकष असू शकतात.
– जिथे सोलर पॅनल बसवायचे आहेत त्या मालमत्तेची मालकी हा सुद्धा एक निकष असू शकतो.
– ज्यांना यापूर्वी यासारख्या सरकारी सौरऊर्जा योजनांचा लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
Pradhanmantri Suryodaya Yojana Necessary Documents | प्रधानमंत्री सूर्योदय योजना आवश्यक कागदपत्रे –
– ओळखीचा पुरावा
– पत्ता पुरावा
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र
– व इतर
Pradhanmantri Suryodaya Yojana Application | प्रधानमंत्री सूर्योदय योजना अर्ज प्रक्रिया –
– प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही आत्ताच घोषित करण्यात आलेली असल्यामुळे अद्याप अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही परंतु अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर होण्याची शक्यता आहे.
– अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज पडताळणी केली जाऊ शकते.
– अर्ज पडताळणी नंतर जर अर्जदार प्रधान मंत्री सूर्योदय योजनेसाठी पात्र असेल तर या योजनेसाठी मंजुरी मिळू शकते आणि त्यानंतर सोलर पॅनल सिस्टीम इन्स्टॉल केली जाऊ शकते.
शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी सरकारची कमिटमेंट अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषे मधून असे लिहिले आहे की, “सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि हमारी सरकार 1 करोड़ घरों पर रूफटॉप सोलर लगाने के लक्ष्य के साथ “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” प्रारंभ करेगी।
इससे गरीब और मध्यम वर्ग का बिजली बिल तो कम होगा ही, साथ ही भारत ऊर्जा के क्षेत्र में आत्मनिर्भर भी बनेगा। “
⭕ अगदी घरातील रोज बनणारा पदार्थ,सुरू करा हा व्यवसाय…
⭕जाणून घ्या अधिक माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |