प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना | Pradhan Mantri Vishwakarma Kaushal Samman Yojana

       भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणारी योजना म्हणजे विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना.13,000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत समाविष्ट कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान केले जाईल,यासाठी नोंदणी करणे मोफत आहे.17 सप्टेंबर 2023 ह्या दिवशी ही योजना लॉन्च करण्यात आली.’विश्वकर्मा जयंती’ निमित्त ‘ प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ’ योजना सुरू केली.ह्या योजने अंतर्गत पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना तारण न घेता कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

Advertisement

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभ | Benefits of Pradhan Mantri Vishwakarma Kaushal Samman Yojana –

– 15 दिवसांच्या (120 तासांच्या ) प्रगत प्रशिक्षणासाठी देखील इच्छा असेलेले उमेदवार नावनोंदणी करू शकतात.

– या योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या लोकांना फक्त प्रशिक्षणच दिले जाणार नाही, तर त्यांना कमी व्याजदरात कर्जही मिळू शकेल.

– ट्रेनिंग स्टायपेंड 500 रुपये प्रतिदिन,प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये टूल्स खरेदीसाठी दिले जातील.

– याशिवाय पहिले 1 लाख रुपये 5 टक्के व्याजाने दिले जातील, त्यानंतर गरज पडल्यास 2 लाख रुपयांचे कर्ज दुसऱ्या हप्त्यात दिले जाईल.

– या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना आर्थिक सहाय्य करून ते बनवत असलेल्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढवणे त्याचबरोबर त्यांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेची जोडणे, त्यांना आत्मनिर्भर आणि स्वतंत्र बनवणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

– सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

– मिस्त्री,शिंपी, न्हावी, धोबी,दगड कोरणारे, दगड तोडणारे, मोची/ बूट बनवणारे ,बोट मेकर,टोपली/चटई/झाडू मेकर ,बाहुली आणि खेळणी उत्पादक, हातोडा आणि टूलकिट निर्माता, फिशिंग नेट निर्माता,आर्मरर ,लोहार ,हॅमर आणि टूल किट मेकर यांसारख्या विविध क्षेत्रातील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी पात्रता | Eligibility –

– नोंदणी करण्यासाठी किमान 18 वर्षे वय असणे गरजेचे आहे.

– या योजनेसाठी फक्त भारतीय रहिवासी अर्ज करू शकतात.

– जे लोक सरकारी सेवेमध्ये आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी नोंदणी करू शकत नाही.

– नोंदणी करत असताना ज्या व्यवसायाबद्दल माहिती दिलेली आहे तोच व्यवसाय करणे गरजेचे आहे.

– केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या PMEGP, PM स्वानिधी, मुद्रा यांसारख्या क्रेडिट-आधारित योजना अंतर्गत मागील 5 वर्षांत कोणतेही कर्ज घेतलेले नसावे,जर तसे असेल तर ह्या योजनेसाठी पात्र नसाल.

– या योजनेचा एका कुटुंबांमधील एका व्यक्तीलाच लाभ घेता येणार आहे.

– या योजनेसाठी विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या 140 जाती अर्ज करण्यास पात्र असतील. या योजनमध्ये नमूद केलेल्या अठरा कुटुंब-आधारित पारंपारिक व्यवसायांपैकी कोणत्याही व्यवसायामध्ये गुंतलेल्या आणि असंघटित क्षेत्रामध्ये हात आणि साधनांनी काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, ज्यांना त्यांचा स्वयंरोजगार सुरू करायचा आहे, ते पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत कारागीर म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहेत.

पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Necessary Documents for PM Vishwakarma Yojana –

– आधार कार्ड

– रेशन कार्ड

– जात प्रमाणपत्र

– अधिवास प्रमाणपत्र

– पासपोर्ट साईज फोटो

– फोन नंबर

– मेल आयडी

– बँक डिटेल्स

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?

Online Registration –

स्टेप-1: सर्वप्रथम पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in वर जा.त्या नंतर मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा उपयोग करून येथे नोंदणी करा. 

स्टेप-2: नंतर OTP द्वारे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड verify करा. 

स्टेप-3: पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर आता नोंदणी फॉर्म भरायचा आहे,ह्यामध्ये  नाव, पत्ता आणि व्यवसायाशी संबंधित माहिती सर्व माहिती टाकावी लागेल.नंतर नोंदणी फॉर्म सबमिट करा.

स्टेप-4: आता तुम्ही डिजिटल आयडी आणि विश्वकर्मा योजना प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. 

स्टेप-५: यानंतर, क्रेडेन्शियल वापरून पीएम विश्वकर्मा योजना पोर्टलवर लॉग इन करा. तुम्हाला वाटल्यास/गरज असल्यास पोर्टलवर वेगवेगळ्या योजना घटकांसाठी अर्ज करू शकता. आता तुम्हाला योजनेच्या तपशीलानुसार कागदपत्रे येथे अपलोड करावी लागणार आहेत. 

स्टेप-6: यानंतर अर्जाचा फॉर्म विचारार्थ (for consideration) सादर करावा लागेल. 

स्टेप-7: आता तुमच्या प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी संबधित अधिकारी करतील.पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच, कर्ज मिळू शकणार आहे.

      आपल्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वर विजिट करून पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी आणि अर्ज करू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment