Rashtriy Kutumb Labh Yojana | कुटुंबाला २० हजार रुपयांची मदत | जाणून घ्या नक्की योजना काय आहे
आजच्या ब्लॉगमध्ये आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने ( Rashtriy Kutumb Labh Yojana ) बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना नक्की काय आहे, यासाठी पात्रता काय लागते, कागदपत्रे कोणती लागतात तसेच अर्ज कसा करावा ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया…
Rashtriy Kutumb Labh Yojana | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना –
Table of Contents
– कुटुंबामधील 18 ते 59 वर्ष वयोगटामधील कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 20 हजार रुपये आर्थिक सहाय्य राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत केले जाते.
– राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी असून कुटुंबांमधील कमावत्या स्त्री किंवा पुरुष यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले जाते.
– ज्यावेळी कुटुंबांमधील कमावती स्त्री किंवा कमावता पुरुष यांचा मृत्यू होतो त्यावेळी नक्कीच त्या कुटुंबावर मानसिक संकट ओढवते त्यासोबतच आर्थिक संकट सुद्धा उभे राहते त्यामुळे अशावेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही नक्कीच महत्त्वपूर्ण योजना ठरू शकते असे म्हणता येईल.
– आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे असा या योजनेचा उद्देश आहे.
– कुटुंबामधील कमावती व्यक्ती गेल्यामुळे काही कुटुंबांना उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न सुद्धा उभा राहतो अशावेळी या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य नक्कीच त्या कुटुंबासाठी चांगली मदत ठरू शकते.
– राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दिलेली मदत एक रकमी दिली जाते आणि डीबीटी द्वारे प्रदान केली जाते.
– सर्वच प्रवर्गातील व्यक्तींसाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लागू आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
– दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 20 हजार रुपये एक रकमी आर्थिक सहाय्य राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दिले जाते.
– अठरा वर्ष वयोगटातील मुलांपर्यंत : शिक्षण अनुदान.
– 75 वर्षे वयोगटांमधील लाभार्थ्यांसाठी : सहाशे रुपये पेन्शन दर महिना
पुढील कारणांमुळे मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही :
बाळंतपणातील मृत्यू
आत्महत्या
आत्महत्येचा प्रयत्न
स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
मोटार शर्यतीमधील अपघात
गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
सैन्यातील नोकरी
जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
युद्ध
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेकरिता असणारे लाभार्थी –
– 18 ते 59 वर्षे वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामधील व्यक्ती
– घटस्फोटीत महिला किंवा परित्यक्ता महिला, विधवा महिला तसेच एकल महिला प्रमुख असलेली कुटुंब या योजनेकरिता पात्र असतील.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अटी व शर्ती | Rashtriy kutumb Labh Yojana terms and conditions –
– राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
– आत्महत्या केलेली असल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठीच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
– दारिद्र रेषेखालील कुटुंबामधील कमावती स्त्री किंवा पुरुष यांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या मृत्यू तारखेपासून तीन वर्षाच्या आत मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे त्यानंतर अर्ज विचारात घेतला जात नाही.
– जे कुटुंब अर्ज करत आहे त्या कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखाली यादीमध्ये असणे आवश्यक आहे.
– राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाखापेक्षा जास्त नसावे.
– ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ती व्यक्ती कर्मचारी असेल आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळालेला असेल तर अशावेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ या कुटुंबाला घेता येणार नाही.
पुढील कुटुंबे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी पात्र नाहीत:
– कुटुंबप्रमुख केंद्र किंवा राज्य सरकारचा कर्मचारी असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
– जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– कुटुंबामधील कमावत्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | documents required for rashtriya kutumb Labh Yojana –
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
जन्माचे प्रमाणपत्र
बँक अकाउंट डिटेल्स
प्रतिज्ञा पत्र
मृत्यू पत्र
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज | Application for rashtriy kutumb Labh Yojana –
अर्जदार व्यक्तीने तिच्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार /तलाठी कार्यालय येथे जाऊन राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घेऊन अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी आणि नंतर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय यांच्याकडे जमा करावा.
संबंधित अधिकारी जमा केलेल्या अर्जाची व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या तपासणी करून लाभाचे वितरण करतील.
Rashtriy Kutumb Labh Yojana GR | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शासन निर्णय – येथे क्लिक करा.