उद्योग क्षेत्रातील “तारा” आणि समाजकार्यामध्ये अग्रेसर : रतनजी टाटा | Ratan Tata | Ratan Tata information in Marathi –
उद्योग क्षेत्रामध्ये आणि समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारे असे ,रतनजी टाटा. रतन टाटा यांनी जनतेच्या मनावर विविध कार्यांमधून राज्य केलं. रतन टाटा यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखे आहेत त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्ती कितीही मोठी झाली तरी नेहमी आपले पाय जमिनीवर रोऊन असावेत हे रतन टाटा यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. मनाने आणि धनाने सुद्धा एवढी श्रीमंत असलेली व्यक्ती असून रतन टाटा हे एक उत्कृष्ठ व्यक्ति होते.
रतनजी टाटा | Ratan Tata
Table of Contents
रतन टाटा यांचा जन्म/बालपण I Birth/Childhood of Ratan Tata
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश भारतामधील बॉम्बे म्हणजेच सध्याचे मुंबई या ठिकाणी झाला. नवल टाटा आणि सुनी कमिशनर यांचे रतन टाटा हे पुत्र होते. रतन टाटा ज्यावेळी दहा वर्षाचे होते त्यावेळी त्यांचे आई-वडील विभक्त झाले. रतन टाटा यांना त्यांची आजी नवाज बाई टाटा यांनी औपचारिकपणे जेएन पेटिट पारसी अनाथ आश्रमामधून दत्तक घेतले.
रतन टाटा यांचे शिक्षण I Education of Ratan Tata-
रतन टाटा यांचे शिक्षण पुढील विद्यालय/महाविद्यालयामध्ये झाले.
– कॅम्पियन स्कूल, मुंबई
– कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई
– शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्क
– कॉर्नेल विद्यापीठ
– हार्वर्ड बिजनेस स्कूल
रतन टाटा यांची कारकीर्द I Career of Ratan Tata –
– जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर रतन टाटा यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
– ज्यावेळी रतन टाटा हे उत्तराधिकारी बनले त्यावेळी त्यांना बऱ्याच कंपनी प्रमुखांचा प्रतिकाराचा सामना करावा लागला होता.
– रतन टाटा यांनी निवृत्तीचे वय निश्चित करून निवृत्त झालेल्या लोकांऐवजी नवीन भरती करण्यास सुरुवात केली तसेच समूह कार्यालयामध्ये प्रत्येक कंपनीने अहवाल देणे सुद्धा बंधनकारक केले.
– रतन टाटा यांनी त्यांच्या 21 वर्षाच्या कार्य काळामध्ये टाटा सन्सचा महसूल चाळीस पटीने तर नफा 50 पटीने वाढवला.
रतनजी टाटा यांचे थोडक्यात कार्य I Ratanji Tata work –
रतन टाटा यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे आणि ते कमी शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण आहे तरीसुद्धा काही कार्य पुढील प्रमाणे आहेत :
– रतन टाटा हे शिक्षण, औषधे आणि ग्रामीण विकासाचे समर्थक होते, त्यांनी आव्हानात्मक भागांमध्ये चांगले पाणी उपलब्ध करून देण्याकरिता न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेला पाठिंबा दिला.
– टाटा समूहामार्फत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा मोठे योगदान आहे. $28 दशलक्षचा शिष्यवृत्ती निधी टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टने दिला त्यामुळे कॉर्नेल विद्यापीठाला भारतामधील पदवीधर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करता येईल आणि ठराविक वेळेमध्ये वार्षिक शिष्यवृत्ती अंदाजे 20 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करेल.
– टाटा धर्मादाय संस्थांनी तसेच टाटा समूहाच्या कंपन्यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूलला कार्यकारी केंद्राच्या बांधकामासाठी $50 दशलक्ष देणगी देऊ केली.
– कोरोना काळामध्ये ज्यावेळी मोठे संकट आले होते त्यावेळी रतन टाटा यांनी त्यांचे हॉटेल्स राज्य सरकारला सुपूर्त केली आणि रुग्णांना मोफत कॉरंटाईन करण्याची परवानगी दिली, यामुळे बऱ्याच नागरिकांना मदत झाली.
– मध्यमवर्गीय लोकांना परवडेल अशा टाटा नॅनो या कारची संकल्पना सुद्धा रतनजी टाटा यांनी तयार केली होती.
अशी असंख्य उदाहरणे आहेत की रतनजी टाटा किंवा टाटा समूह यांनी विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी तसेच विविध लोकांना मदत केलेली आहे.
रतनजी टाटा हे उद्योग क्षेत्रामधील बापमाणूस तर होतेच परंतु सामान्य जनतेच्या मनावर सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यातून तसेच त्यांच्या स्वभावामधून राज्य केले त्यामुळेच रतनजी टाटा आहे जवळपास प्रत्येक व्यक्तीचे आदर्श आहेत.
रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार I Awards received by Ratan Tata
रतन टाटा यांना पद्मभूषण पुरस्काराने 2000 मध्ये गौरविण्यात आले तर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने 2006 मध्ये गौरविण्यात आले. तसेच केंद्र सरकारमार्फत पद्मविभूषण या पुरस्काराने रतन टाटा यांना 2008 मध्ये गौरविण्यात आले. ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर नेम 2014 मध्ये रतन टाटा यांना गौरविण्यात आले. तसेच आसाम वैभव पुरस्काराने 2021 मध्ये तर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने 2023 मध्ये रतनजी टाटा यांना गौरविण्यात आले. अशा विविध पुरस्कारांनी देशात तसेच परदेशात रतनजी टाटा यांना गौरविण्यात आले होते.
असे महान व्यक्ती रतनजी टाटा यांचे निधन बुधवारी 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी वयाच्या 86 व्या वर्षी झाले.
रतनजी टाटा यांचे काही प्रेरणादायी वाक्य I Some Inspirational Quotes by Ratan Tata –
” मी कधीही योग्य निर्णय यावर विश्वास ठेवत नाही तर मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो.”
” ये दुनिया जरुरत के हिसाब से चलती है,
सर्दियो मे जिस सुरज का इंतजार होता है,
गर्मीओ मे उसी सुरज का तिरस्कार |
आपकी कीमत तब तक है, जब तक आपकी जरूरत |”
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |