RBI Saving Bonds I RBIs Popular Saving Bonds with High Returns and Safety | RBI Saving Bonds 2024 –

RBIs Popular Saving Bonds with High Returns and Safety | RBI Saving Bonds 2024 –

    आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे ऑफर केलेल्या लोकप्रिय सेविंग बाँड बद्दल माहिती बघू. हे बॉंड्स हाय रिटर्न्स देतात आणि सुरक्षित असतात.( RBI Saving Bonds ) या बाँडबद्दलच अधिक डिटेल माहिती आपण जाणून घेवू  त्यांना बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन का मानला जातो ते समजून घेऊ.

RBI saving bonds

व्याज दर |RBI Saving Bonds Interest Rate –

– RBI सेविंग बॉण्ड्स सेविंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट (FDs) या दोन्हीपेक्षा जास्त व्याजदर देतात.

– सध्या, व्याज दर 8.05% आहे आणि दर 6 महिन्यांनी रीसेट केला जातो. व्याज अर्ध-वार्षिक ( semi – annually) जमा केले जाते, म्हणजे दर 6 महिन्यांनी व्याज मिळेल.

– पोस्ट ऑफिसने ऑफर केलेल्या योजनांशी तुलना केल्यास उदाहरणार्थ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेशी तुलना केल्यास, RBI बाँड्स 0.35% जास्त व्याज देतात. 

– ते इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जसे की FD आणि बचत खाती चांगले परतावा देतात .

वैशिष्ट्ये आणि फायदे | Features and Benefits of RBI Saving Bonds –

– आरबीआय सेविंग बॉण्ड्स फिक्सड इन्कम बॉण्ड्स या नावाने ओळखले जाते, आरबीआय सेविंग बॉण्ड्सला गव्हर्मेंट समर्थन असल्याने फिक्स इन्कम साठी बेस्ट इन्वेस्टमेंट ऑप्शन मानला जातो. 

– सध्याचा व्याजदर 8.05% असल्याने, या बॉण्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करून चांगले रिटर्न्स मिळवता येऊ शकतात.

पात्रता | Eligibility Criteria –

जाणून घेऊयात एलिजिबिलिटी क्रायटेरिया…

– कोणतीही भारतीय व्यक्ती, इंडिव्हिज्युअल,जॉईंट अकाउंट होल्डर किंवा अल्पवयीन व्यक्ती या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलांचे खाते केवळ त्यांचे पालकच चालवू शकतात.

– किमान गुंतवणूक रक्कम 1,000 रुपये आहे आणि त्यानंतरची गुंतवणूक रू.1,000 च्या पटीत असावी. म्हणून, 10,000 रू., 50,000 रू., इत्यादी सारख्या रकमेत गुंतवणूक केली जाऊ शकते. रु.1,500 सारख्या गुंतवणुकीला परवानगी नाही.

मॅच्युरिटी पिरेड |  Maturity Period for RBI Saving Bonds –

– या बाँडचा लॉक-इन कालावधी 7 वर्षांचा आहे आणि तुम्ही ते मुदतपूर्तीपूर्वी काढू शकत नाही.

– तथापि, ज्या ज्येष्ठ नागरिकांनी हे बॉण्ड्स इश्यूड केले आहेत त्यांना विशिष्ट परिस्थितीत मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे. 

– जर बाँडधारकाचे वय ६० ते ७० च्या दरम्यान असेल तर ते ६ वर्षांनंतर पैसे काढू शकतात. 

– वय 70 ते 80 दरम्यान असल्यास, 5 वर्षांनंतर पैसे काढण्याची परवानगी आहे. 

– 80 वर्षांवरील व्यक्तींसाठी, 4 वर्षांनंतर काढता येतात.

Calculating Returns –

गुंतवणूक व्याज दर वर्षे नंबर ऑफ इंटरव्हल्स एकूण रक्कम
(रुपये )
इंटरेस्ट अमाऊंट
(रुपये )
५०,००० रुपये ८.०५%८६,८७५.६७३६,८७५.६७
१०,००,००० रुपये ८.०५%१७,३७,५१३.३२ ७,३७,५१३.३२

टॅक्स बेनिफिट्स | Tax Benefits – 

– या बॉण्ड्सशी संबंधित कोणतेही कर लाभ नाहीत,मिळालेले व्याज करपात्र आहे. 

– तुम्ही टॅक्स ब्रॅकेट मध्ये येत नसल्यास, तुम्ही कर भरण्यास जबाबदार राहणार नाही. परंतु जर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर मिळवलेले व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल आणि तुम्हाला त्यानुसार कर भरावा लागेल.

बॉंड्स खरेदी | Purchasing the Bonds –

– तुम्ही या बॉण्ड्स साठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अर्ज करू शकता.

– अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमिट केला जाऊ शकतो. 

– अर्जासाठी मूळ कागदपत्रे जसे की फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक आहे.

– हे बॉण्ड्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केले जातात, ज्यांना बाँड लेजर अकाउंट (BLA) असेही म्हणतात. 

– हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या बॉंड्सची सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी-विक्री करता येत नाही आणि केवळ बॉण्डधारकाच्या मृत्यूच्या बाबतीतच ट्रान्सफर केले जाऊ शकते, नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

आरबीआय सेविंग बॉण्ड्स मध्ये इन्व्हेस्ट का करावे |Why Invest in RBI Saving Bonds?

आरबीआय सेविंग बॉण्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे विविध कारणे आहेत, ते पुढील प्रमाणे :

– हे बॉल्स आरबीआय द्वारे जारी केलेले असतात त्यामुळे सेफ्टी वाटते.

– इंडियन बॉण्ड मार्केट विविध संधी उपलब्ध करून देते.

– RBI सेविंग बॉण्ड्स सेविंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट (FDs) या दोन्हीपेक्षा जास्त व्याजदर देतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment