संजय गांधी निराधार योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana –
देशामध्ये असे बरेच लोक असतात की जे निराधार असतात, त्यांचा कोणीही आधार नसते. निराधार लोकांना रोजचे जीवन जगण्यासाठी सुद्धा कष्ट सोसावे लागतात आणि अशा लोकांचे वय जर जास्त असेल तर मात्र अधिकच कठीण होऊन जाते. सरकारतर्फे वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या उद्दिष्टांनी जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. आज आपण “संजय गांधी निराधार योजना” या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत…
संजय गांधी निराधार योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana –
– संजय गांधी निराधार योजनेचे मुख्य उद्दिष्ट निराधार व गरजवंत लोकांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे हा आहे.
– संजय गांधी निराधार योजनेसाठी जे लोक पात्र असतील त्यांना दरमहा काही ठराविक रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाते. ( काही ठिकाणी बाराशे रुपये तर काही ठिकाणी पंधराशे रुपये असा उल्लेख आहे, कुटुंबाची परिस्थिती किंवा उत्पन्न पाहून हा लाभ मिळत असावा. तर अशी सुद्धा माहिती बघायला मिळते की कुटुंबामध्ये एकच व्यक्ती निराधार असेल तर 600 रुपये आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती निराधार असतील तर 900 रुपये मिळतात. )
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कुणाला मिळू शकतो ?
– अठरा वर्षाखालील अनाथ मुले
– निराधार महिला
– शेतमजूर महिला
– निराधार विधवा
– अंध, कर्णबधिर ,मूकबधिर ,मतिमंद अशा प्रवर्गामधील स्त्री आणि पुरुष
– पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री
– घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला
– आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा पत्नी
– देवदासी
– कर्करोग, क्षयरोग ,एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे दैनंदिन जीवन चालवण्यासाठी शकणाऱ्या महिला व पुरुष
– वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला,तृतीयपंथी
संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्रता –
– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
– अर्जदाराच्या नावे जमीन नसावी तसेच उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसावा.
– अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे.
– अर्जदार कमीत कमी 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
– अर्जदाराचे नाव दारिद्र्यरेषेखाली असणे गरजेचे आहे.
– लाभार्थ्याची मुले एकवीस वर्षाची होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी लागेपर्यंतच अर्जदार या योजनेसाठी पात्र.
– लाभार्थ्यांना फक्त मुलीच असतील आणि मुलीचे वय 25 वर्षे झाले, तिला नोकरी लागली किंवा तिचे लग्न झाले तरी सुद्धा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहील.
– कुटुंबाचे उत्पन्न 21 हजार रुपये पेक्षा कमी असावे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
– रहिवासी दाखला
– उत्पन्नाचा दाखला
– दारिद्र रेषेखालील यादीमध्ये समावेश असल्याचा पुरावा
– वयाचा दाखला
– पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला
– अपंगत्व किंवा रोगग्रस्त असल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा दाखला
संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन अर्ज –
– संजय गांधी निराधार योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.