शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती | Sharad Pawar Gram Samruddhi Yojana

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती | Sharad Pawar Gram Samruddhi Yojana – 

    गावाकडील ज्या लोकांना उपजीविकेसाठी काही साधन उपलब्ध नाही असे लोक शहराच्या दिशेने वळतात त्यामुळे गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर सुद्धा वाढत चालले आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु जर त्या लोकांना गावाकडेच रोजगार उपलब्ध झाला, त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण झाले तर ते लोक आहे त्याच ठिकाणी स्थायिक होऊ शकतात. परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने काही लोक उत्पन्नाचे साधन सुद्धा निर्माण करू शकत नाही. आज आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजना 

Advertisement
या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती | Sharad Pawar Gram Samruddhi Yojana – 

– शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2020 या दिवशी मंत्रिमंडळामध्ये शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

– शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देणे आणि गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर रोखणे हा आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कशासाठी अनुदान मिळणार आहे ?

१.गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे.

२.कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री शेड बांधणे.

३.भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

४.शेळीसाठी शेड बांधणे

१.गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे – 

गावाकडे बऱ्याच शेतकऱ्यांकडे गाय व म्हशी असतात परंतु त्यांच्या निवाऱ्यासाठी व्यवस्थित रित्या जागा किंवा व्यवस्थित सोय त्यांच्याकडे नसते. मग अशावेळी गाय व म्हशींना ऊन,वारा,पाऊस यांचा सामना करावा लागतो व त्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. पण आता गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

    दोन ते सहा गुरे यांच्यासाठी एक गोठा तर त्यापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीमध्ये म्हणजेच बारा गुरांसाठी दुप्पट तर अठरा गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान शासनामार्फत दिले जाणार आहे, एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येऊ शकतो.

२ .कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री शेड बांधणे – 

    बरेचसे शेतकरी शेतीला जोडून काहीतरी जोडधंदा करतात. कुक्कुटपालन हा व्यवसाय सुद्धा बरेचसे शेतकरी करतात. कुक्कुटपालन करण्याकरता किंवा पोल्ट्री साठी शेड बांधण्याकरता ४९ हजार ७६० रुपये खर्च येऊ शकतो. शंभर ते दीडशे कोंबड्या सांभाळण्याकरता जितके शेड लागेल त्यासाठी वेगळा निधी तर शेड साठी ची जागा वाढल्यानंतर त्यासाठी सुद्धा अधिक निधी सरकारतर्फे दिला जाऊ शकतो.

३ . भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग –

        शेतीसाठी कंपोस्ट खत हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. शेतीमधील कचरा कंपोस्टिंग द्वारे प्रक्रिया करून शेतीमधील पिकाची उत्पादकता वाढण्यामध्ये मदत होते आणि म्हणूनच  नाडेप कंपोस्टिंग केली जाते. यामध्ये कचरा, शेणखत, सेंद्रिय पदार्थ आणि माती यांचे एकावर एक असे थर रचले जातात ,त्यानंतर साधारणतः दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांचे रूपांतर कंपोस्ट मध्ये होते.नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च होऊ शकतो, यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे.

४ . शेळीपालन करण्याकरता शेड बांधणे –

   बरेचसे लोक शेळीपालन हा व्यवसाय सुद्धा करतात परंतु शेळ्यांसाठी निवारा म्हणून त्यांच्याकडे व्यवस्थित रित्या शेड किंवा इतर सोय उपलब्ध नसते. परंतु जर शेळ्यांसाठी शेड बांधले तर नक्कीच शेळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहील, त्यांचे ऊन ,वारा ,पाऊस यांपासून संरक्षण होईल. शेळीपालन करण्याकरता शेड बांधण्यासाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येऊ शकतो, यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –

– अर्जदार शेतकरी असणे व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

– शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी आहे म्हणूनच लाभार्थी हा कोणत्याही संघटनेचा भाग असू नये.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

– आधार कार्ड

– रेशन कार्ड

– रहिवासी पुरावा

– पासपोर्ट साइज फोटो

– मोबाइल नंबर

– उत्पन्न प्रमाणपत्र

– बँक अकाउंट डिटेल्स

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज –

शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही योजना सध्या सरकारने फक्त जाहीर केली आहे,जर तुम्हाला शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया कदाचित सरकार स्पष्ट करू शकते. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment