सायकल वाटप अनुदान योजना महाराष्ट्र | Saykal Vatap anudan Yojana Maharashtra | सायकल वाटप योजना –
बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना शाळा ही घरापासून दूर असल्याकारणाने शिक्षण घेण्यामध्ये अडथळे येऊ लागतात काही तर शिक्षणापासून दूर सुद्धा होतात… परंतु आता शासनाने आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत…
सायकल वाटप अनुदान योजना महाराष्ट्र | Saykal Vatap anudan Yojana Maharashtra –
– सायकल वाटप अनुदान योजनेमुळे गरजू विद्यार्थिनींना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी साधन उपलब्ध होईल आणि वेळ सुद्धा वाचेल.
– मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे, हे देखील उद्दिष्ट सायकल वाटप अनुदान योजनेचे आहे.
– ही योजना आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आहे.
– सायकल घेण्यासाठी जे अनुदान मिळणार आहे ते Direct Benefit Transfer DBT च्या माध्यमातून मुलींच्या अकाउंट वर जमा होते.
सायकल वाटप अनुदान योजनेचे फायदे | Benefits of Saykal Vatap anudan Yojana Maharashtra –
– शासनाकडून या योजनेअंतर्गत ५ हजार रुपयाचे अनुदान सायकल घेण्यासाठी दिले जाणार आहे.
( गरजू मुलींना पहिला टप्यात डी.बी.टी. (Direct Benefit Transfer) द्वारे राष्ट्रीयकृत बँक खात्यात 3500/- रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.
तर दुसऱ्या टप्प्यात सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1500 रुपये देण्यात येतील )
– गरजू मुलींना सायकल मिळाल्यामुळे नक्कीच त्यांचा वेळ वाचेल परिणामी जास्तीत जास्त वेळ त्या अभ्यासासाठी वापरू शकतात आणि नक्कीच पुढे जाऊन चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात.
– सायकल नसल्यामुळे ज्या मुली पायी शाळेमध्ये जात असत त्यांना ती आवश्यकता आता राहणार नाही आणि त्या सायकलने शाळेमध्ये ये जा करू शकतात.
– या योजनेमुळे मुलींचा विकास होण्यामध्ये आणि त्या आत्मनिर्भर बनण्यामध्ये मदत होऊ शकते.
सायकल वाटप अनुदान योजनेची पात्रता | Eligibility –
– अर्जदार विद्यार्थिनी ही आठवी ते बारावी इयत्तेत शिकत असणे आवश्यक आहे.
– अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
– या योजनेचा लाभ त्याच विद्यार्थिनी घेऊ शकतात ज्यांची शाळा घरापासून पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा दूर आहे.
– आठवी ते बारावी या इयत्तेमध्ये शिक्षण घेत असताना फक्त एकदाच सायकल वाटप अनुदान योजनेचा लाभ घेता येईल.
– खेड्यापाड्यामधील तसेच दुर्गम भागांमधील व कच्चे रस्ते असणाऱ्या भागामधील मुलींना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाईल.
– फक्त मुलींनाच सायकल वाटप अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सायकल वाटप अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Saykal Vatap Anudan Yojana –
– पासपोर्ट साईज फोटो
– आधार कार्ड
– रेशन कार्ड
– रहिवासी प्रमाणपत्र
– विद्यार्थिनी इयत्ता ८वी ते १२वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
– बँक अकाऊंट डिटेल्स
– सायकल खरेदी पावती
सायकल वाटप अनुदान योजनेचा लाभ कोणत्या शाळेमधील विद्यार्थिनी घेऊ शकतात ?
– जिल्हा परिषद शाळा
– खाजगी शाळा
– अनुदानित शासकीय आश्रम शाळा
– विनाअनुदानित शाळा
सायकल वाटप अनुदान योजनेसाठी अर्ज | Application –
– ज्या शाळेमध्ये या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे त्या शाळेमधील मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांकडून हा फॉर्म घेऊन व्यवस्थित रित्या माहिती भरून शाळेमध्ये हा फॉर्म जमा करावा.
– किंवा जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागांमध्ये चौकशी करून त्यांच्याकडून फॉर्म घेऊन व्यवस्थित रित्या माहिती भरून त्या कार्यालयामध्ये फॉर्म जमा करू शकतात.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |