SBI Amrut Kalash Yojana | एसबीआय अमृत कलश योजना | Best investment schemes 2025
आर्थिक बचत करणे आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपले पैसे गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण एसबीआय मार्फत सुरू करण्यात आलेली अमृत कलश योजना या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. SBI Amrut Kalash Yojana
SBI Amrut Kalash Yojana | एसबीआय अमृत कलश योजना | Best investment schemes 2025
Table of Contents
SBI Amrut Kalash Yojana Eligibility | एसबीआय अमृत कलश योजना पात्रता :
– एसबीआय अमृत कलश योजनेसाठी वयाची कुठलीही अट नाही.
– एसबीआय अमृत कलश योजनेमध्ये भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात तसेच भारतात राहत नसले तरी भारतीय नागरिकत्व असलेले नागरिक सुद्धा या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
– अल्पवयीन गुंतवणूकदाराचे खाते चालवण्याचा अधिकार आई-वडिलांना आहे.
– एसबीआय अमृत कलर योजनेअंतर्गत संयुक्त खाते सुरू करता येते आणि व्यवहाराचे अधिकार एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना देता येतात.
अमृत कलश योजनेच्या ठेवींचे नियम I SBI Amrut Kalash Yojana :
– किमान गुंतवणूक एक हजार रुपयांची करावी लागते.
– जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
– मुदत : ४०० दिवसांची
– एकरकमी गुंतवणूक या योजनेमध्ये करावी लागते कारण ही फिक्स डिपॉझिट योजनेसारखी योजना आहे.
– जर तुम्ही एकदा पैसे भरून पुन्हा पैसे भरू इच्छित असाल तर त्यासाठी नवीन खाते उघडावे लागेल एक खातेदार अनेक खाते उघडू शकतो.
अमृत कलश योजना व्याजदर I SBI Amrut Kalash Yojana interest rates:
- अमृत कलश योजनेअंतर्गत सामान्य ठेवीदार म्हणजेच साठ वर्षापेक्षा कमी ठेवीदारांसाठी व्याजदर ७.१० टक्के आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच साठ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांसाठी व्याजदर 7.60% आहे.
- व्याजाची पद्धत तिमाही चक्रवाढ पद्धत आहे , परंतु जर तुम्ही व्याज दर महिन्याला किंवा प्रत्येक तीन महिन्याला घेणार असाल तर व्याज सरळ व्याजदर पद्धतीने मिळेल.
- जर तुम्ही व्याज मुदतीच्या शेवटी घेणार असाल तर तिमाही चक्रवाढ या व्याजाच्या पद्धतीने व्याज मिळेल.
- या योजनेअंतर्गत व्याज चार प्रकारे मिळू शकते : दर महिन्याला, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर.
अमृत कलश योजना परतावा
सामान्य नागरिक
| रक्कम | दरमहा व्याज | दर तिमाही व्याज |
| 1,00,000 | 591 | 1775 |
| 5,00,000 | 2958 | 8875 |
| 15,00,000 | 8875 | 26625 |
| 20,00,000 | 11,833 | 35500 |
ज्येष्ठ नागरिक
| रक्कम | दरमहा व्याज | दर तिमाही व्याज |
| 1,00,000 | 633 | 1900 |
| 5,00,000 | 3166 | 9500 |
| 15,00,000 | 9500 | 28500 |
| 20,00,000 | 12666 | 38000 |
| रक्कम | सामान्य गुंतंवणूकदार परतावा | ज्येष्ठ नागरिक परतावा |
| 100000 | 1,08,018 | 1,08,601 |
| 5,00,000 | 5,40,089 | 5,43,003 |
| 10,00,000 | 10,80,178 | 10,86,006 |
अमृत कलश योजना प्राप्ती करत सवलत
- जर सामान्य ठेवीदारांसाठी वार्षिक व्याजाची रक्कम चाळीस हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक व्याजाची रक्कम 50000 रुपये होत असेल तर टीडीएस कपात केली जाते.
- टीडीएस कपात टाळण्यासाठी सामान्य ठेवीदारांनी फॉर्म जी आणि ज्येष्ठ नागरिकांनी फॉर्म एच भरून द्यावा लागेल.
- या योजनेअंतर्गत ठेवीच्या रकमेवर कुठलीही कर सवलत मिळत नाही.
अमृत कलश योजना मुदतपूर्व खाते बंद करण्याबाबत :
- जर खाते मुदतपूर्व बंद करायचे असेल तर दंड भरावा लागतो,
- जर गुंतवणूक पाच लाखापेक्षा कमी असेल तर व्याजाच्या ०.५% रक्कम कपात केली जाते आणि जर गुंतवणूक पाच लाखापेक्षा जास्त असेल तर व्याजाच्या १% इतकी रक्कम कपात केली जाते.
- जर खाते सात दिवसाच्या आत बंद केले तर कुठलेही व्याज मिळत नाही.
- जर या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर ठेवीच्या रकमेच्या ९०% रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
* दंडाबाबत तसेच कर्जाबाबत नियम वेळोवेळी बदलू शकतात तसेच कर संबंधित योग्य माहिती मिळवण्यासाठी बँकेची संपर्क साधू शकता.
अमृत कलश योजनेसाठी खाते कसे उघडावे ?
– या योजनेसाठी एसबीआय बँकेची संपर्क सादर खाते उघडता येऊ शकते.
– मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग मार्फत सुद्धा खाते सुरू करता येऊ शकते.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |