SIP ( Systematic Investment Plan ) | सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे काय? SIP म्हणजे काय ? खरचं एसआयपी करून श्रीमंत कसं बनायचं?Best Investment Ways 2024

SIP ( Systematic Investment Plan ) | सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे काय? SIP म्हणजे काय ? खरचं एसआयपी करून श्रीमंत कसं बनायचं? 

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण SIP ( Systematic Investment Plan ) याबद्दल माहिती बघणार आहोत. खरंच एसआयपी करून श्रीमंत होता येते का? एसआयपी म्हणजे नक्की काय ? चला तर जाणून घेऊयात…

एसआयपी म्हणजे काय ? What is SIP ( Systematic Investment Plan ) ?
Advertisement

– एसआयपी ( systematic investment plan ) म्हणजे म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणुकीसाठी सुरू केलेला एक मार्ग असून ज्यामध्ये आपण म्युच्युअल फंड मध्ये नियमित कालावधीने निच्छित रक्कम गुंतवू शकतो. उदाहरणार्थ, महिन्यातून एकदा, तीन महिन्यातून एकदा अशा रीतीने  रक्कम आपल्याला गुंतवणूक करावी लागते. 

– एस आय पी ची लोकप्रियता भारतामधील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये वाढत असल्याचे कारण यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते.

– मार्केट कंडीशन तसेच मार्केटमध्ये होणारे चढ-उतार याबद्दल काळजी करण्याची गरज भासत नाही. 

– सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याकरिता अतिशय चांगला असा मार्ग आहे.

– शेवटी चांगला परतावा मिळण्यासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जितक्या लवकर गुंतवणूक करणे शक्य होईल तितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे त्यामुळे शेवटी मिळणारा परतावा नक्कीच अधिक मिळतो.

– एसआयपी मार्फत अप्रत्यक्षरीत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते तसेच सोन्यामध्ये किंवा इतर ठिकाणी म्युच्युअल फंड मार्फत गुंतवणूक करता येऊ शकते. 

SIP करून श्रीमंत बनता येते का ?

– एस आय पी मध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे असे म्हणता येईल. 

– एस आय पी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर चक्रवाढ व्याजामुळे चांगला परतावा मिळतो, त्यामुळे ठराविक कालावधीनंतर म्हणजेच दीर्घकाळ गुंतवणुकीनंतर आपल्याला मिळणारा परतावा नक्कीच चांगला असू शकतो. 

– दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. 

– एस आय पी द्वारे गुंतवणूक केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो याचे कारणच चक्रवाढ व्याज आहे. एस आय पी मध्ये आपण जी मुद्दल गुंतवणूक करतो ती तर वाढत जाते परंतु त्यामध्ये जोडणारा परतावा सुद्धा वाढत जातो.

एसआयपी द्वारे अधिक परतावा मिळवायचा असल्यास पुढील सूत्रे महत्त्वाचे आहेत –  

– एसआयपी सुरू करण्याचा निर्णय हा चांगलाच आहे परंतु एसआयपी दीर्घकाळ पर्यंत सुरू ठेवली तर अधिक फायदा मिळू शकतो त्यामुळे 20 ते 25 वर्षांसाठी एसआयपी सुरू करावी. 

– तसेच एसआयपी मध्ये दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली तर अधिक फायदा मिळू शकतो.

  • उदाहरणार्थ ,समजा एस आय पी 12 टक्के परतावा देते असे गृहीत धरू, यापेक्षा सुद्धा अधिक परतावा मिळू शकतो.

एसआयपी मध्ये दर महा गुंतवणूक – 5000 रुपये

ह्या गुंतवणुकीत दरवर्षी 10 टक्के वाढ केली

गुंतवणुकीचा कालावधी – 21 वर्ष.

 21 वर्षातील एकूण गुंतवणूक 38,40,150 रुपये  परंतु  12 टक्के दराने व्याज – 77,96,275 रुपये . 

21 वर्षांनंतर मिळणारी एकूण रक्कम -1,16,36,425 रुपये.

जर हीच गुंतवणूक आपण 25 वर्षे चालू ठेवली तर एकूण गुंतवणूक 59,00,824 रुपये होईल आणि 1,54,76,907 रुपये 25 वर्षांत व्याज म्हणून मिळू शकतील. अशा वेळी 25 वर्षांनंतर आपल्याला एकूण 2,13,77,731 रुपये मिळतील.

एसआयपी गुंतवणुकीचे फायदे | Benefits of sip – 

– आपल्याला जर चांगले आर्थिक ज्ञान नसेल तर मार्केटमध्ये कशा रीतीने वाटचाल होते हे लवकर समजत नाही तसेच मार्केटमध्ये होणाऱ्या हालचालींचे विश्लेषण करण्यासाठी जास्त वेळ खर्च करावा लागत नाही. दर महिन्याला किंवा आपण ठरवलेल्या कालावधीनुसार आपल्या बँक अकाउंट मधून ठराविक रक्कम कापली जाते आणि म्युच्युअल फंड मार्फत ती रक्कम योग्य ठिकाणी गुंतवली जाते. एस आय पी मुळे आपण शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनतो असे म्हणू शकतो.

कंपाउंडिंग:

एस आय पी मुळे जी रक्कम आपण वर्षानुवर्ष गुंतवतो त्या रकमेवर चांगला परतावा मिळतो याचे कारण म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट.

– एस आय पी 500 ते हजार रुपये गुंतवणुकीपासून सुरुवात करण्यास परवानगी देतात.

– एस आय पी मधील काही इन्वेस्टमेंट मुळे टॅक्स डिडक्शन चा फायदा सुद्धा मिळू शकतो .

– दोन किंवा अधिक फंडांमध्ये एसआयपी सुरू करून आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणू शकतो.

– एसआयपी मध्ये दीर्घकाळपर्यंत गुंतवणूक केल्यामुळे अधिक परतावा मिळण्यामध्ये मदत होते.

एस आय पी साठी फ्रिक्वेन्सीचे प्रकार | Types of SIP frequencies –

१. Daily SIP 

२. Weekly SIP 

३. Monthly SIP 

४.Quarterly SIP 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे प्रकार | Types of SIP –

१. टॉप अप एसआयपी – टॉप अप एसआयपी मुळे गुंतवणूकदारांना नियमित ठराविक अंतराने एस आय पी रक्कम वाढवता येते म्हणजेच टॉप अप करता येते.

२. फ्लेक्झिबल एस आय पी – गुंतवणूकदारांना एसआयपी रक्कम बदलण्याची फ्लेक्सिबिलिटी असते.

३. पर्पेचुअल एसआईपी – पर्पेच्युअल एसआयपी हा एस आय पी चा असा प्रकार आहे जो आपल्याला पाहिजे तोपर्यंत अनिश्चित काळासाठी गुंतवणूक करून देतो. पर्पेचुअल SIP मुळे आपण आपली गुंतवणूक आपल्याला हवी तेव्हा आपल्या आर्थिक ध्येयानुसार काढू शकतो. एसआयपी क्लोजर फॉर्म ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला (AMC)  सबमिट करून पर्पेचुअल एसआयपी थांबवू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version