Income Idea: Social Media Manager Freelance work / work-from-home jobs
Need of social Media Manager-
सध्या सर्वच व्यवसायांमध्ये पारंपारिक मार्केटिंग पद्धती सोबतच डिजिटल मार्केटिंगला सुद्धा खूप महत्त्व आहे. अगदी कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करता येऊ शकते आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडियाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, असे म्हणता येईल. त्यामुळेच अगदी छोट्या व्यवसायापासून ते मोठ्या व्यवसायापर्यंत सोशल मीडिया मॅनेजरची
आवश्यकता असते. त्यामुळे या क्षेत्राला भरपूर स्कोप आहे आणि त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत…
Social media manager job Profile :
सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे अशी एक व्यक्ती जी पूर्ण सोशल मीडिया व्यवस्थित रित्या मॅनेज करण्याचे काम करते म्हणजेच सोशल मीडिया सर्विसेस प्रोव्हाइड करते.
सोशल मीडिया मॅनेजर हे फ्रीलान्सर असू शकतात म्हणजेच स्वतःच्या वेळेनुसार विविध कंपन्यांची कामे करू शकतात किंवा सोशल मीडिया मॅनेजरला विविध कंपन्यांमध्ये सुद्धा वेळोवेळी व्हॅकन्सीज निघत असतात म्हणजेच सोशल मीडिया मॅनेजर म्हणून आपण नोकरी सुद्धा करू शकतो.
फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजर हे एकाच वेळी विविध कंपन्यांची कामे घेऊ शकतात.
तुम्हाला सुद्धा जर सोशल मीडिया मॅनेजर व्हायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने एखादा कोर्स करू शकता.
सोशल मीडिया मॅनेजर कडे कोणते स्किल्स असणे आवश्यक आहे ?
Skill required for social Media manager work
तुमच्याकडे जर चांगले स्किल्स असतील तर नक्कीच विविध क्लायंट्स तुम्हाला भेटू शकतात किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये सोशल मीडिया मॅनेजर म्हणून जॉब सुद्धा करता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात असे कोणते स्किल्स सोशल मीडिया मॅनेजर कडे असणे आवश्यक आहे…
१. कन्टेन्टरायटिंग –
सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करण्यासाठी कंटेंट रायटिंग येणे खूप गरजेचे आहे.
विविध पोस्टला आकर्षक असे टॅग्ज देता आले पाहिजे. टॅग्ज हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
तसेच शॉर्ट पण आकर्षक अशी catchy पोस्ट बनवता आली पाहिजे.
२ . कन्टेन्टक्रिएशन –
ज्या व्यवसायासाठी सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करत आहोत त्यासाठी विविध आकर्षक इमेजेस, ग्राफिक्स, व्हिडिओज यांसारखे कंटेंट तयार करता आले पाहिजे त्यासाठी फोटोशॉप एक्सपर्ट असले पाहिजे असे नाही Canva जरी तुम्हाला उत्तम रित्या येत असेल तरीसुद्धा बऱ्यापैकी काम Canva मुळे होते.
३ . कम्युनिटीमॅनेजमेंट –
बऱ्याच मोठ्या ब्रँड सोबत काम करत असताना विविध सोशल मीडिया अकाउंट वर कमेंट्स, DMs तसेच काही क्वेरीज येत असतात त्यामुळे या सर्व गोष्टींना रिप्लाय देणे ही सुद्धा सोशल मीडिया मॅनेजरची जबाबदारी असते. यासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट व्यवस्थित रित्या फोकस्ड आणि ऑर्गनाईज असली पाहिजे.
४ . एनालिसिसअँडरिपोर्टिंग –
सोशल नेटवर्क खूप मोठे असल्याकारणाने सर्व डेटाचे व्यवस्थितरित्या एनालिसिसकरून रिपोर्ट बनवून क्लाइंटला देणे आवश्यक आहे. यामध्ये एंगेजमेंट रेट,रीच, डायरेक्ट सेल्स अँड कन्वर्जन, तसेच ऑडियन्स ग्रोथ यांसारखे इतर काही मुद्द्यांचा समावेश रिपोर्ट मध्ये होऊ शकतो. हा रिपोर्ट क्लाइंटला देऊन आपण करत असलेले काम सुद्धा दाखवून दिले पाहिजे, जेणेकरून क्लाइंटचा आपल्यावरील विश्वास वाढेल आणि क्लाइंटला सुद्धा आपण नेमकी महिनाभर काय काम करतो हे समजेल.
५ . प्रोजेक्टमॅनेजमेंट –
जर तुम्ही फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करत असाल तर तुमच्याकडे विविध प्रोजेक्ट्स येणे अपेक्षित आहे.
ज्यावेळी तुमच्याकडे जास्त प्रोजेक्ट्स असतील त्यावेळी कोणत्या प्रोजेक्टसाठी किती वेळ दिला गेला पाहिजे याचे व्यवस्थित रित्या नियोजन आखणे आणि प्रत्येक प्रोजेक्टला योग्य तो वेळ देणे खूप गरजेचे आहे.
कंटेंट क्रिएशन त्यामध्ये फोटोग्राफी, डिझाईन किंवा इतर
कन्टेन्ट कॅलेंडर तयार करणे आणि मॅनेज करणे.
तसेच पोस्ट शेड्युल करणे तसेच पब्लिश करणे.
कम्युनिटी मॅनेजमेंट
एनालिसिसआणि रिपोर्टिंग
सोशल मीडिया स्ट्रॅटेजी
सोशल मीडिया मॅनेजर म्हणून तुम्ही नोकरी करू शकता किंवा जर तुम्हाला स्वतःचाबिजनेस सुरू करायचा असेल तर पुढील प्रमाणे स्टेप्स फॉलो करून तुम्ही बिझनेस सुरु करू शकता –
तुमचा व्यवसाय सेटअप करा म्हणजेच त्यामध्ये व्यवसायाला नाव देणे, लायसन्स मिळवणे किंवा यांसारखे जे काही डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे असते ते सर्व करून घेणे.
त्यानंतर पोर्टफोलिओ तयार करा.
तुम्ही ज्या काही सर्विसेस देतात त्यासाठी प्रायसिंग ठरवा.
आणि सर्वात महत्त्वाचे वेळोवेळी आपली स्किल्स अपग्रेड करत रहा.
अशा रीतीने सोशल मीडिया मॅनेजरला सर्वच क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध असल्याने यामध्ये नक्कीच करिअर करता येऊ शकते त्यासाठी फक्त स्किल्स असणे आणि मेहनत घेणे आवश्यक आहे.