HOW TO START A SOLAR PANEL MANUFACTURING BUSINESS | सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कसा सुरू करावा –
नमस्कार ,जय महाराष्ट्..!
वेगवेगळ्या बिजनेस आयडिया बद्दल माहिती आपण नेहमीच घेवून येत असतो. सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस कसा सुरू करावा ,याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत.
सध्या मोठ्या झपाट्याने वाढणारा व्यवसाय म्हणजे सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय ( Solar panel manufacturing business). सौर ऊर्जेला आपण अक्षय ऊर्जा स्रोत म्हणू शकतो. सोलर पॅनल बसवल्यामुळे ऊर्जेची तर बचत होतेच त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपली बचत होते आणि म्हणूनच सौर पॅनल उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की सोलर पॅनल सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सोलर सेल्स च्या मदतीने इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्व्हर्ट करते. चला तर जाणून घेऊयात सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय बद्दल अधिक माहिती…
Table of Contents
SOLAR PANEL MANUFACTURING BUSINESS | सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय –
सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक रॉ मटेरियलस –
– ॲल्युमिनियम फ्रेम
– ग्लास शीट
– वायर
– प्लेक्सी ग्लास
– सोलर सेल्स
– आणि इतर आवश्यकतेनुसार..
सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशीन –
– सोलर स्ट्रींजर मशीन
– सोलर सेल ले अप मशीन
– सन सिम्युलेटर
– सोलर लॅमिनेटर
– इलेक्ट्रॉलुमिनीसंस टेस्टर
– सिलिकॉन डिस्पेंसर
– ऑटोमॅटिक स्टेशन फॉर मॅन्युअल bussing
– प्लास्टिक कटिंग मशीन
सोलर पॅनल टाईप्स –
– मोनोक्रिस्टलाईन सोलर पॅनल्स
– पॉली क्रिस्टलाईन सोलर पॅनल्स
– थिन फिल्म सोलर पॅनल्स
असे सोलर पॅनलचे वेगवेगळे टाईप आहेत.
आता आपण सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू कसा करायचा याबद्दल जाणून घेऊयात..
1. सर्वप्रथम डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा | Solar panel manufacturing business project report –
– डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा बिझनेस प्लॅन तयार केल्यामुळे आपल्याला बिजनेस बद्दल व्यवस्थित क्लॅरिटी येते.
– त्याचबरोबर सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट साठी किती कॉस्ट गरजेची असेल, प्रॉफिट किती असू शकतो, कोणकोणत्या टेक्नॉलॉजी युज करणार आहोत, मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशा असणार आहेत, त्याचबरोबर सोलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट व्यवस्थित रित्या चालवण्यासाठी इतर कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे या सर्व गोष्टींचा समावेश बिजनेस प्लान मध्ये होतो.
– त्यामुळे मार्केट रीसर्च करून व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा.
2 . भांडवल किंवा गुंतवणूक | Solar panel manufacturing business investment –
– सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे सेविंग असतील तर उत्तमच परंतु जर तसे नसेल तर वेगवेगळ्या गव्हर्मेंट सबसिडी तसेच बँक लोन किंवा फायनान्सर असे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत.
3 . व्यवसाय नोंदणी करा आणि आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवा | Solar panel manufacturing business Licenses –
भारतीय मानक ब्यूरो आणि ऊर्जा मंत्रालयाच्या नवीन आणि नूतनीकरणीय स्त्रोत अनिवार्य नोंदणी योजनेअंतर्गत, पीव्ही मॉड्यूल्सना एनएबीएल चाचणी (NABL testing ) प्रयोगशाळेतून टेस्ट घेणे आवश्यक आहे आणि सर्व टेस्ट पॅरामीटर्स क्लिअर करणे आवश्यक आहे आणि सर्व अटी व शर्तींचे पालन करणे सुद्धा आवश्यक आहे.
यासोबतच इतर आवश्यक परवाने किंवा परवानगी सुद्धा मिळवा.
४ . व्यवसाय कुठे सुरू करणार आहात | Location for Solar panel manufacturing business –
– सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकण्यासाठी योग्य असे ठिकाण निवडा ,ज्या ठिकाणावरून सेल्स आणि मार्केटिंग करणे सोपे जाईल.
५ . रॉ मटेरियल आणि मशिनरीची खरेदी |Raw material and machines for Solar Panel manufacturing business –
– आपण यापूर्वी सांगितलेले आहे की कोणते रॉ मटेरियल आणि मशिनरी सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू करण्यासाठी आवश्यक असते तरीसुद्धा आपण कोणत्या प्रकारचे सोलर पॅनल बनवत आहोत किंवा आपण प्रोडक्शन किती घेणार आहोत यानुसार मशीनरी मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो.
– मॅन्युअल, सेमी ऑटोमेटेड किंवा फुल्ली ऑटोमेटेड असे मशिनरीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
– मशीनची निवड करण्यापूर्वी एखाद्या एक्सपर्ट करून कन्सल्टिंग तुम्ही घेऊ शकता.
६ . मॅनपावर | Manpower for Solar panel manufacturing business –
– सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी नक्कीच ट्रेंड आणि स्किलड मनुष्यबळाची आवश्यकता असेल.
– त्याचबरोबर जे प्लांट्स नव्याने सुरू होत आहेत त्यांना तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी ट्रेनिंग सेशन ठेवणे सुद्धा गरजेचे आहे त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये येणारे एररर्स कमी होतात आणि नवनवीन गोष्टींबद्दल सुद्धा माहिती होते.
७ . मार्केटिंग आणि ब्रँडिंग | Marketing and Branding of Solar Panel manufacturing business –
– कोणत्याही व्यवसायासाठी मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग योग्य रीतीने करणे खूप महत्त्वाचे आहे.
– स्ट्रॉंग ब्रांड आयडेंटिटी तयार करा.
– कन्टेन्ट मार्केटिंग करा.
– एखादी इन्फॉर्मेटिव्ह अशी वेबसाईट तयार करा.
– सोशल मीडिया प्रेझेन्स वाढवा.
– कॉन्ट्रॅक्टर्स तसेच इंस्टॉलर्स सोबत कोलाबोरेट करा.
– विविध इंडस्ट्री इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करा.
– ऑनलाइन ॲडव्हर्टायझिंग तसेच इतर पद्धती वापरा.
अशा रीतीने सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. परंतु तसे तुम्हाला शक्य नसेल तर या इंडस्ट्रीमध्ये पुढील अपॉर्च्युनिटी सुद्धा उपलब्ध आहेत –
– सोलर पॅनल ऑडिटिंग
– सोलर पॅनल इंस्टॉलेशन
– सोलर सिस्टिम असोसिएट्स
– सोलर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर
– सोलर सिस्टिम रिपेरिंग अँड मेंटेनन्स
अशा विविध संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत.
⭕ अगदी घरातील रोज बनणारा पदार्थ,सुरू करा हा व्यवसाय…