मसाल्यांचा व्यवसाय | Spices Business

        आपले भारतीय मसाले फक्त आपल्या भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. भारतीय मसाले हे फक्त जेवणाची चवच वाढवत नाहीत तर काही मसाले औषधी सुद्धा आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहेत.आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गावानुसार,राज्यानुसार , वेगवेगळ्या परिसरानुसार खाद्यपदार्थाची चव बदलत असते ज्या त्या भागानुसार मसाल्यांचे प्रमाण, मसाल्यांचे प्रकार यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होत असतात. भारतामध्ये जेवण बनवत असताना जिरे पावडर, हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर त्याचबरोबर तमालपत्र, मीरे ,दालचिनी यांसारख्या अनेक मसाल्यांचा समावेश होतो. आपला देश मसाल्यांचे उत्पादन चांगल्या प्रमाणावर करत असून मसाले निर्यात सुद्धा करतो त्यामुळे मसाल्यांचा व्यवसाय करणे फायदेशीर ठरू शकते. चला तर बघुयात हा व्यवसाय कसा सुरु करावा…

१ . मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करा  ( Business plan )-

– व्यवसाय योजना तयार केली की व्यवसायाचा एक आराखडा आपल्याकडे उपलब्ध असतो आणि त्यामुळे कोणते काम कधी झाले पाहिजे याची आपल्याला कल्पना येऊन जाते आणि सगळे कामे करणे सोपे होतात आणि येणाऱ्या अडचणी सुद्धा कमी होतात.

– व्यवसाय योजनेमध्ये साधारणतः पुढील गोष्टींचा सामावेश होऊ शकतो :

मसाल्यांच्या व्यवसायासाठी ठिकाण, मसाल्यांच्या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवाने, मसाल्याच्या व्यवसायासाठी कोणते मशीन लागतात, तसेच या व्यवसायासाठी कच्चा माल किंवा इतर कोणती सामग्री लागेल …

अशा विविध मुद्द्यांचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये होऊ शकतो.

२ . मसाल्यांच्या व्यवसायासाठी योग्य ठिकाणी निवडा.

 ( Business Location )-

– जर तुम्ही छोट्या स्तरावर म्हणजेच कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करणार असाल तर अगदी घरामधून अगदी एखाद्या रूम मधून हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

– परंतु जर हा व्यवसाय तुम्ही मोठ्या स्तरावर म्हणजेच जास्त गुंतवणूक करून सुरू करणार असाल तर या व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यामध्ये मशीन, मसाला साठवण्यासाठी जागा याचा विचार करून जागा निवडा. जर तुमच्याकडे तुमची स्वतःची जागा उपलब्ध असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे परंतु जर नसेल तर अशा वेळी इतर ठिकाणी तुम्ही जागा भाड्याने घेऊ शकता.

३ . मसाल्यांच्या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवाने (Licenses)-

– रजिस्ट्रेशन 

– व्यापार परवाना

– उद्योग आधार

– FSSAI परवाना 

– एम एस एम इ नोंदणी

– आयात निर्यात कोड ( जागतिक बाजारपेठेमध्ये जर मसाले निर्यात करायचे असतील तर अशावेळी या कोडची आवश्यकता असते. )

४ . मसाल्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक मशीन –

– ग्राइंडिंग मशीन (Grinding machine)

– गिरणी (Spice mill)

– पाउंडिंग मशीन ( Pounding machine )

– हॅमरमिल मसाला (Hammermill)

– इम्पॅक्ट पल्व्हरायझर (Impact pulverizer)

– डबल स्टेज पल्व्हरायझर (Double stage pulverizer)

इतर काही आवश्यक मशिन्स –

– वजनकाटा (Weighing scale)

– कंप्रेसर ( Compressor )

– पॅकेजिंग मशीन (Packaging machine)

– रोस्टर (Roster)

– विघटन करणारा (Disintegrator)

– हिट सीलिंग मशीन (Heat sealing machine)

– चाळणी (Sieves) 

– मसाला ग्राइंडर (Spice grinder)

५ . कच्चा माल ( Raw material ) –

– तुम्ही ज्या कोणत्या मसाल्यांची पावडर विकणार आहात त्यानुसार तुम्ही कच्चा मालाची खरेदी करू शकता.

– शक्यतो कच्चा माल हा होलसेल दराने खरेदी करावा.

पुढील मसाल्यांची खरेदी करू शकता.

मिरची,हळद,मिरी,कोथिंबीर,मोहरी,जिरे किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार इतर मसाल्यांची खरेदी.

– त्याच बरोबर परवानगी असलेले खाद्य रंग आणि संरक्षक /preservatives 

– परवानगी असलेले किंवा अन्न-दर्जाचे पॅकिंग साहित्य 

६ . मार्केटींग ( Marketing ) –

– मसाल्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग ट्रॅडिशनल मार्केटिंग पद्धत वापरून करता येऊ शकते म्हणजेच पॅम्प्लेट वाटप करून,एफएम/रेडिओ जाहिरात,वर्तमानपत्र जाहिरात.

– तसेच सोशल मीडिया मार्केटिंग हे सुद्धा मार्केटिंगचे प्रभावी माध्यम आहे.

–  त्याच बरोबर यूट्यूब वरील कुकींग चॅनल सोबत कोलॅबरेट करून सुद्धा चांगली मार्केटिंग केली जाऊ शकते.

    आपल्या देशामध्ये मसाल्यांची मागणी कधीही कमी होणारी नाही ,त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment