उसाची लागण बऱ्याच भागांमध्ये होत असते, परंतु ऊस तोडीच्या वेळी ऊसतोड कामगार सगळ्याच ठिकाणी मिळतातच असे नाही त्यावेळी ऊस तोडणी यंत्र नक्कीच कामे येऊ शकते परंतु या यंत्राची किंमत जास्त असल्याकारणाने प्रत्येक जण हे खरेदी करू शकत नाही. परंतु आता सरकारतर्फे ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी सबसिडी मिळणार आहे.” ऊस तोडणी यंत्र सबसिडी योजना”
या मार्फत ही सबसिडी दिली जाणार आहे त्याबद्दलच अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…
– ऊस तोडणी यंत्रास शासनामार्फत अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (RKVY) देण्यात येणार आहे.
– शासनाकडून राज्यामध्ये अनुक्रमे 450-450 अशाप्रकारे 2022- 23 व 2023 – 24 या दोन वर्षांसाठी 900 ऊस तोडणी यंत्र देण्याचे उद्दिष्ट आहे.
ऊस तोडणी यंत्राचे फायदे –
– ज्या ठिकाणी ऊसतोड कामगार उपलब्ध नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ऊस तोडणी यंत्र वापरल्यामुळे ऊसाची होणारी नासाडी होणार नाही.
– त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त काम करणे शक्य होईल.
– ऊस तोडणी यंत्राला सबसिडी मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे प्रोत्साहनच मिळेल.
– ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस योग्य वेळेमध्ये कारखान्यामध्ये गेल्यामुळे ऊसाला चांगला दर मिळू शकतो.
ऊस तोडणी यंत्र अनुदान मिळवण्यासाठी नक्की कोण अर्ज करू शकतात ?
– वैयक्तिक शेतकरी
– शेतकरी उत्पादक संस्था (FPO)
– उद्योजक
– सहकारी व खाजगी साखर कारखाना
– शेती सहकारी संस्था
ऊस तोडणी यंत्रासाठी किती अनुदान मिळू शकते ?
ज्या लाभार्थ्यास ऊस तोडणी यंत्र खरेदी करायचे आहे त्यास त्या यंत्राच्या किमतीच्या किमान 20 टक्के इतकी रक्कम स्व भांडवल म्हणून गुंतवावी लागेल व ऊस तोडणी यंत्रासाठी पात्र लाभार्थ्यांना पी एफ एम एस प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये ऊस तोडणी यंत्राच्या 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तितके अनुदान जमा होईल.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अटी व पात्रता –
– अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
– खाजगी व सरकारी साखर कारखान्यांना जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान दिले जाईल.
– अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे तसेच प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.
– लाभार्थ्यास कमीत कमी 20 टक्के रक्कम स्व भांडवल म्हणून गुंतवणूक करावी लागेल तर उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात उभी करण्याची जबाबदारी स्वतःची असेल.
– PFMS प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वितरित केली जाते.
– वैयक्तिक शेतकरी, उद्योजक हे एकाच कुटुंबामधील असतील तर योजेनच्या कालावधीमध्ये एकावेळी एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान मिळू शकेल म्हणजेच एकाच कुटुंबात एका यंत्रासाठीच अनुदान मिळू शकते.
– अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करत असताना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.