Tata Capital Pankh Scholarship Program 2024 | मिळवा १० ते १२ हजारांपर्यंत स्कॉलरशिप | जाणून घ्या अधिक माहिती…| Best Scholarships 2024 

Tata Capital Pankh Scholarship Program

Tata Capital Pankh Scholarship Program 2024 | मिळवा १० ते १२ हजारांपर्यंत स्कॉलरशिप | जाणून घ्या अधिक माहिती…| Best Scholarships 2024 

       आपल्या देशामध्ये बरेच असे विद्यार्थी असतात की ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही, परंतु हे विद्यार्थी जर हुशार असतील तर विविध स्कॉलरशिप मार्फत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लागतो आणि हे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती प्रोग्रॅम 2024-25 हा टाटा कॅपिटल लिमिटेडचा समाजामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एक चांगला असा उपक्रम आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत, इयत्ता 11 आणि 12 मध्ये शिकणाऱ्या किंवा जनरल पदवी/डिप्लोमा/ITI कोर्सेस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्सच्या फीच्या 80% पर्यंत किंवा 10,000 रुपये ते 12,000 रुपयांपर्यंतची वन टाइम स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिप मुळे नक्कीच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना हातभार लागत असेल. जाणून घेऊयात टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती…

Advertisement

Tata Capital Pankh Scholarship Program 2024 |टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम –

Tata Capital Pankh Scholarship Programme 2024-25  Eligibility | टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25  पात्रता  –

*अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  :

–  भारतातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत इयत्ता 11 आणि 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. 

– अर्जदारांना आधीच्या वर्गात किमान ६०% गुण मिळालेले असावेत. 

–  अर्जदाराचे सर्व स्त्रोतांकडून येणारे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे

– Tata Capital च्या कर्मचाऱ्यांची मुले पात्र नाहीत.

– टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम फक्त भारतीय नागरिकांसाठी खुला आहे.

* ग्रॅज्युएशन/ डिप्लोमा/ आयटीआय विद्यार्थ्यांसाठी :

– जे विद्यार्थी सध्या अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम जसे की B.Com., B.Sc., BA, इ. किंवा भारतातील मान्यताप्राप्त संस्थांमधील डिप्लोमा/ITI कोर्स करत आहेत ते अर्ज करू शकतात. 

– अर्जदारांनी आधीच्या वर्ग/सेमिस्टर/वर्षात किमान 60% गुण मिळवलेले असावेत.

–  अर्जदाराचे सर्व स्त्रोतांकडून येणारे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.

– Tata Capital च्या कर्मचाऱ्यांची मुले पात्र नाहीत.

– टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम फक्त भारतीय नागरिकांसाठी खुला आहे.

Tata Capital Pankh Scholarship |टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप –

*अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  :

80% पर्यंत कोर्स फी किंवा 10,000 रुपयांपर्यंत (जे कमी असेल ते)

* जनरल ग्रॅज्युएशन/ डिप्लोमा/ आयटीआय विद्यार्थ्यांसाठी :

 80% पर्यंत कोर्स फी किंवा 12,000 रुपयांपर्यंत (जे कमी असेल)

टीप:

– स्कॉलरशिप फंड स्कॉलर्सला  केवळ कोर्स फी साठी दिले जातात.

– 2024-25 साठी हा वन टाइम स्कॉलरशिप प्रोग्रॅम आहे आणि त्याच्या नूतनीकरणाबाबत कोणताही निर्णय स्कॉलरशिप प्रोव्हायडर वर अवलंबून आहे.

Tata Capital Pankh Scholarship Programme 2024-25  Documents | टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी आवश्यक असणारी कागदपत्रे –

*अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  :

* जनरल ग्रॅज्युएशन/ डिप्लोमा/ आयटीआय विद्यार्थ्यांसाठी :

Tata Capital Pankh Scholarship Programme – Selection Process | टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम निवड प्रक्रिया –

सुचना: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि अपंग व्यक्तींसह अल्पभूधारक पार्श्वभूमीतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींना अतिरिक्त वेटेज दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024 ( तारखेमध्ये बदल होऊ शकतो )

Tata Capital Pankh Scholarship Programme 2024-25 – Application | टाटा कॅपिटल पंकज स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी एप्लीकेशन करण्यासाठी – येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version