टिफिन सर्विस व्यवसाय | Tiffin Service Business |कधीही बंद न होणारा व्यवसाय…   

टिफिन सर्विस व्यवसाय | Tiffin Service Business –    

आपल्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज म्हणजे अन्न.

अन्न मिळवण्यासाठीच म्हणजेच पोटापाण्यासाठी माणूस धडपड करत असतो आणि त्यासाठीच नोकरी किंवा व्यवसाय करत असतो. परंतु हीच नोकरी किंवा व्यवसाय करत असताना आपल्या घरापासून दूर किंवा कुटुंबापासून दूर जावे लागते आणि अशावेळी जे व्यक्ती आपल्या घरापासून किंवा कुटुंबापासून दूर राहतात त्यांना जर स्वयंपाक बनवता येत नसेल तर ते बाहेर जेवतात. परंतु रोज रोजच हॉटेलचे खाणे शक्य नसते म्हणूनच अशावेळी लोक ते जिथे राहतात त्या ठिकाणी डबा मागवतात. त्याचबरोबर जे मुलं मुली शिकण्यासाठी बाहेर गावी जातात त्यांना सुद्धा डब्याची आवश्यकता असते.मग तुम्ही सुद्धा घरामधूनच काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्की ह्या व्यवसायाबद्दल विचार करू शकता तो व्यवसाय म्हणजे टिफिन सर्विस

Advertisement
.आज आपण टिफिन सर्विस व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत ….

 १ . व्यवसाय योजना तयार करा –

कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना त्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे. टिफिन सर्विस हा व्यवसाय करण्याचा विचार करत असताना पुढील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे ,त्याचा समावेश व्यवसाय योजनेत होऊ शकतो : –

टिफिन सर्विस व्यवसाय कोठे सुरू करणार आहात ?

टिफिन सर्विस व्यवसायासाठी सामग्री काय लागणार आहे?

टिफिन सर्विस व्यवसाय करण्यासाठी लागणारे परवाने कोणते?

मेनू नक्की काय ठेवाल ?

टिफिनचा दर काय ठरवाल ?

ह्या व्यवसायामध्ये नक्की किती गुंतवणूक करणार ?

अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये केला जाऊ शकतो. 

२ . टिफिन सर्विस व्यवसाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते ठिकाण निवडा.

– जर तुम्ही टिफिन सर्विस हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरामधूनच हा व्यवसाय सुरू करू शकता, जेणेकरून गाळे भाड्यासाठी येणारा खर्च तसेच इतर खर्च सुद्धा वाचेल.

– आणि जर तुम्ही टिफिन सर्विस हा व्यवसाय जास्त गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर तुम्ही हॉस्पिटल्स कॉलेज, हॉस्टेल्स ,गर्दीच्या ठिकाणी चांगले ठिकाण बघून टिफीन सेवा सुरू करू शकता असे केल्याने अधिकचे ग्राहक तुम्हाला मिळू शकतील.

 ३ . टिफिन सर्विस व्यवसाय करण्यासाठी लागणारी भांडी किंवा उपकरणे –

– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांड्यांची नक्कीच आवश्यकता असेल.

– जर हा व्यवसाय घरून सुरू केला गेला तर गॅस, मिक्सर यांसारख्या वस्तू आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात परंतु हा व्यवसाय घराबाहेर सुरू केला तर या वस्तूंबरोबरच इतर वस्तू सुद्धा लागतात, त्या सर्व वस्तूंची यादी बनवून त्या वस्तू खरेदी करा.

– त्याचबरोबर जेवण बनवण्यासाठी किराणा आणि भाजीपाला आवश्यक असेल त्याची सुद्धा यादी बनवा आणि खरेदी करा.

– बनवलेल्या जेवणाचा डबा देण्यासाठी डब्याची आवश्यकता असेल ,त्यामुळे शक्यतो प्लास्टिक किंवा फायबर डबा न वापरता स्टीलचा डबा वापरा.

४ . टिफिन सर्विस व्यवसायासाठी लागणारी परवाने –

जर तुम्ही घरून हा व्यवसाय सुरू केला तर कदाचित काही परवान्यांची गरज नसेल परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती घेऊन कोणती परवाने घेतली पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता, परंतु जर हा व्यवसाय घराबाहेर सुरू करणार असाल तर पुढील परवाने लागू शकतात –

१. शॉप ॲक्ट लायसन्स ( Shop act licence) 

२ . एफ एस एस ए आय FSSAI

३ . ट्रेड लायसन्स

४ . फायर एन ओ सी

५ . सोसायटी एन ओ सी

 ५ . टिफिन सर्विस व्यवसायासाठी मेनू काय ठेवाल ?

– टिफिन सर्विस व्यवसायासाठी तुम्ही मेनू काय ठेवणार आहे हे ठरवा ,त्यामध्ये शाकाहारी जेवण तसेच मांसाहारी जेवण असा समावेश होऊ शकतो.

– तुम्ही नेमकी कोणती जेवण देणार आहात म्हणजेच फक्त शाकाहारी देणार आहात की दोन्हीचाही समावेश ठेवणार आहात हे ठरवा.

– त्याचबरोबर तुम्ही एक टाइम टेबल सुद्धा बनवू शकता ज्यामध्ये कोणत्या दिवशी कुठली भाजी किंवा सुकी किंवा रस्सा भाजी कधी द्यायची हे ठरवू शकता जेणेकरून ऐनवेळी गडबड होणार नाही.

– तसेच आठवड्यातून एखाद्या दिवशी स्पेशल मेनू सुद्धा देऊ शकता.

६ . मार्केटिंग –

– टिफिन व्यवसाय हा माऊथ पब्लिसिटी म्हणजेच जे ग्राहक तुमच्याकडून डब्बा नेतात त्यांना तुम्ही दिलेले जेवण आवडले तर नक्कीच ते इतर ग्राहकांना सुद्धा त्याबद्दल सांगतात. त्यामुळे नेहमीच आपल्या जेवणाची चव आणि गुणवत्ता चांगली ठेवली पाहिजे ,त्यामुळे आपोआपच जास्तीत जास्त ग्राहक तुमच्यासोबत जोडले जातील.

– वेगवेगळ्या ऑफिस जवळ तुमच्या टिफिन सेवेबद्दल माहिती कळवू शकता किंवा जाहिरात करू शकता.

– कॉलेजेस जवळ किंवा कोर्स किंवा इन्स्टिट्यूट जवळ सुद्धा तुमच्या टिफिन सेवेबद्दल माहिती देऊ शकता.

– तसेच पॅम्प्लेटस् छापून ठिकठिकाणी देऊ शकता.

– सोशल मीडिया मार्केटिंग सुद्धा करू शकता.

तुम्ही ज्या परिसरामध्ये हा व्यवसाय सुरू केला असाल त्यानुसार डब्याचा दर ठरवू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment