Union Budget 2024 | केंद्रिय अर्थसंकल्प २०२४ | केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले ?

Union Budget 2024

Union Budget 2024 | केंद्रिय अर्थसंकल्प २०२४ | केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले ?

   आज म्हणजेच २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण  यांनी सकाळी ११ वाजता आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.जाणून घेऊयात केंद्रीय अर्थसंकल्पामधील मुद्दे :

Advertisement

Union Budget 2024 | केंद्रिय अर्थसंकल्प २०२४ | केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले ?

Union Budget 2024 :

इन्कम टॅक्स मध्ये झालेले बदल ( Income tax budget  changes ) : 

० ते ३ लाख उत्पन्न – ० % कर

३ ते ७ लाख उत्पन्न – ५ % कर

७ ते १० लाख उत्पन्न – १० % कर

१० ते १२ लाख उत्पन्न – १५ % कर

१२ ते १५ लाख उत्पन्न – २० % कर

१५ लाखांवर उत्पन्न – ३० % कर

PM आवास योजना – शहरांमधील गरीब लोकांसाठी महत्त्वाची घोषणा –

– दहा लाख कोटी रुपयांची शहरी आवास योजनेसाठी तरतूद.

– शहरी गरिबांसाठी १ कोटी घरे बांधणार.

– पीएम आवास योजनेचा फायदा मध्यमवर्गीयांना सुद्धा घेता येईल.

पेन्शन धारकांसाठी सुद्धा चांगली बातमी :

– नवीन टॅक्स रिजीममध्ये स्टँडर्ड डिडक्शनचे लिमिट वाढवण्यात आले आहे. 

– पेन्शनधारकांना एक्स्ट्रा बेनिफिट सरकारने दिला आहे.

– कौटुंबिक पेन्शनवर पेन्शनधारकांना 25 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल, ही लिमिट यापूर्वी 15 हजार रुपये इतकी होती.

कॅपिटल गेन टॅक्स हा 20 टक्क्यावरुन 12.5 टक्के करण्यात आला आहे.

विदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स 40% वरून 35 % टॅक्स करण्यात आला आहे,टॅक्स मध्ये कपात करण्यात आली आहे.

एजंट टॅक्स सुद्धा स्टार्ट अपला  चालना देण्यासाठी बंद करण्यात आला आहे.

पुढील वस्तू / उत्पादनं स्वस्त होणार आहे :

केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये (Union Budget 2024 ) मांडण्यात आलेले इतर काही मुद्दे :

कॅन्सरची औषधे सुद्धा स्वस्त होणार असून या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.

सोने-चांदी स्वस्त होणार असून सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला.

महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा बदल करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागामधील जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायजेशन करण्यात येणार आहे.

1 लाखापेक्षा कमी सॅलरी असणाऱ्या व्यक्तींना EPFO मध्ये पहिल्यांदा रजिस्टर होणाऱ्यांना तीन टप्प्यामध्ये15 हजार रुपये मिळणार आहे.

राज्यांना 15 हजार कोटी रुपयांचीकर्ज देण्यात येणार आहे.

देशभरामध्ये बारा नवीन इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत.

 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल सूर्य घर योजने अंतर्गत देण्यात येणार आहे, त्यामुळे 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे.

विष्णुपद मंदिर आणि महाबोधी मंदिराला काशी विश्वनाथच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे,या ठिकाणी कॉरिडोर बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे.

 11 लाख कोटींचा निधी पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणार आहे.

1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी विशेष आणि अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे.

नालंदा विद्यापीठामध्ये टुरिरस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कृषी क्षेत्राकरता 1.52 लाख कोटींची तरतुद करण्यात येणार आहे.

खाद्य गुणवत्ता तपासणीकरता 100 लॅब उघडण्यात येणार आहे.

3O लाख तरुणांच्या रोजगाराकरता केंद्र सरकारतर्फे योजना.

500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देण्यात येणार, 5 हजार महिना मिळणार.

नवीन व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे 

शंभर शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.

मुद्रा लोनची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात आली आहे.

महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.

2 लाख कोटींची तरतुद रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी  करण्यात आली आहे. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून मदत करण्यात येणार आहे.

15 हजार कोटीचा अतिरिक्त निधी आंध्र प्रदेशला  देणार. चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार. बिहारमध्ये रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी देण्यात येणार.

तसेच बिहारमध्ये मेडीकल कॉलेज होणार आहे.

अशा प्रकारे केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये ( Union Budget 2024 ) विविध विषयावर मुद्दे मांडण्यात आले आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version