Union Budget 2025 | अर्थसंकल्प 2025 | अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या | Union Budget 2025 Nirmala Sitharaman I Which points in budget are good

Union Budget 2025 | अर्थसंकल्प 2025 | अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या | Union Budget 2025 Nirmala Sitharaman 

    शनिवारी दिनांक एक फेब्रुवारी 2025 या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राशी निगडित, उद्योग क्षेत्राशी निगडित तसेच शिक्षण आणि इतरही अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण अशा घोषणा आणि अनेक मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत. अर्थसंकल्प 2025 (Union Budget 2025) मध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले तसेच काय घोषणा करण्यात आल्या याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…

Advertisement

Union Budget 2025 | अर्थसंकल्प 2025 | अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या | Union Budget 2025 Nirmala Sitharaman 

Table of Contents

Union Budget 2025

Income Tax Slabs |  कररचना 

12 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. 

  • 4 लाखांपर्यंत उत्पन्न – 0 टक्के
  • 4 ते 8 लाख रुपयांवर – 5 टक्के
  • 8 ते 12 लाख रुपयांवर – 10 टक्के
  • 12 ते 16 लाख रुपयांवर – 15 टक्के
  • 16 ते 20 लाख रुपयांवर –  20 टक्के
  • 20 ते 24 लाख रुपयांवर – 25 टक्के
  • 24 पेक्षा जास्त – 30 टक्के

१. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

  अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही 3 लाख रुपयांवरून आता 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे.

२. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा..

अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून ७५ हजार जागा वाढवण्यात येणार आहेत.

३. करा संबंधात महत्वाची घोषणा

 सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा अशी आहे की १२ लाख रुपयांपर्यंत आता कोणताही कर नाही.

४. स्टार्टअप साठी घोषणा 

सरकारच्या दहा हजार कोटी रुपयांच्या योगदानामधून स्टार्टअप साठी निधीची व्यवस्था केली जाणार आहे तर एससी आणि एसटी उद्योजकांना तसेच पाच लाख महिलांना दोन कोटी रुपयांची कर्ज सरकारमार्फत दिले जाणार आहे.

५. मेक इन इंडिया बाबतची घोषणा 

मेक इन इंडिया या प्रोग्राम ला पुढे नेण्याकरिता मॅन्युफॅक्चरिंग मिशन हे लहान, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना धोरण समर्थन आणि तपशीलवार फ्रेमवर्कद्वारे कव्हर करेल.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

६. मत्स्य व्यवसाय क्षेत्रासंबंधी घोषणा 

मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे उत्पन्न टिकून राहावे याकरता एक कार्यक्षम असे फ्रेमवर्क आणण्यात येणार आहे.

७. आयआयटी संदर्भातील घोषणा 

देशामधील पाच आयआयटीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार असून आयआयटीची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

८. इंडिया पोस्ट बाबत

इंडिया पोस्टचे मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. 

९. औषधासंदर्भात

कॅन्सरचे सर्व औषधे हे करमुक्त करण्यात येणार असून या आजाराशी संबंधित 36 औषधे हे पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेले आहे. याचबरोबर इतर जीवनावश्यक औषधांच्या किमती सुद्धा कमी करण्यात येणार आहे.

१०. क्रेडिट कार्ड संबंधात..

एम एस एम इ क्रेडिट गॅरंटी कव्हर हा सूक्ष्म उद्योगांसाठी ५ कोटी वरून १० कोटी रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे तर पुढील पाच वर्षांमध्ये १.५ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे.

११. पादत्राणांसाठी योजना..

  • पादत्राणे तसेच चामड्याच्या क्षेत्रासाठी मदती व्यतिरिक्त सुद्धा चामड्याशिवाय पादत्राणांकरिता एक योजना आहे.
  • 22 लाख रोजगार तसेच 4 लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि 1.1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निर्यात अपेक्षित असणार आहे.

१२. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा 

 ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा अशी आहे की टीडीएसची मर्यादा ही 1 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

१३. काय होणार स्वस्त 

  • टीव्ही
  •  मोबाईल
  • औषध आणि इलेक्ट्रिक कार 
  • मोबाईल फोन
  • एलईडी, एलसीडी टीव्ही 
  • चामड्याच्या वस्तू 

१४. अणुऊर्जा मिशन 

100 GW अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे 2047 पर्यंत लक्ष असून 20000 कोटी रुपयांचे अणुऊर्जा मिशन तयार करण्यात येणार आहे.

१६.व्हिजासाठीचे नियम सोपे होणार

व्हिजा साठीचे नियम सोपे होणार असून त्याची पद्धत सुद्धा सोपी होणार आहे तर भारतामध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींकरता व्हिजा सहज उपलब्ध होणार.

१७.सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना 

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजनेअंतर्गत आठ कोटींपेक्षा जास्त मुलांना पोषक आहार पुरवण्यात येणार आहे.

१८. ब्रॉडबँड सेवा 

प्रायमरी आरोग्य केंद्र आणि सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड सेवा सेवा पुरवण्यात येणार आहे.

१९. धनधान्य कृषी योजना

  • कृषीक्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर भर.
  • 100 जिल्ह्यांकरता धनधान्य कृषी योजना
  • 1.7 कोटी शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनांचा लाभ 
व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version